Jump to content

शीबा चड्ढा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Sheeba Chaddha; Sheeba Chaddha; شیبا چڈھا; Sheeba Chaddha; Шиба Чадха; शीबा चड्ढा; Sheeba Chaddha; شبا چادها; 希巴·查达; シェーダ・チャッダ; Sheeba Chaddha; Sheeba Chaddha; Sheeba Chaddha; 席芭・查達; शीबा चड्ढा; షీబా చద్దా; ਸ਼ੀਬਾ ਚੱਡਾ; শ্বীবা চাদ্ধা; Sheeba Chaddha; Sheeba Chaddha; শীবা চাড্ডা; Sheeba Chaddha; Sheeba Chaddha; शीबा चड्ढा; Sheeba Chaddha; Sheeba Chaddha; Sheeba Chaddha; Sheeba Chaddha; Sheeba Chaddha; Sheeba Chaddha; Sheeba Chaddha; Sheeba Chaddha; Sheeba Chaddha; Sheeba Chaddha; شبا چادها; Sheeba Chaddha; Sheeba Chaddha; شیبا چڈھا; شيبا تشادها; ᱥᱤᱵᱟ ᱪᱟᱰᱰᱟ; actriz india; indiar aktorea; ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ; actriz india; индийская актриса; indische Film-, Fernseh- und Theaterschauspielerin; ban-aisteoir Indiach; بازیگر هندی; indisk skuespiller; actriță indiană; indisk skådespelare; індійська акторка; onye na-eme ihe nkiri si India; 印度女演員; भारतीय अभिनेत्री; intialainen näyttelijä; ভাৰতীয় অভিনেত্ৰী; Indian actress; இந்திய நடிகை; attrice indiana; ভারতীয় অভিনেত্রী; actrice indienne; indijska glumica; Indian actress; actriz indiana; pemeran asal India; indisk skodespelar; ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേത്രി; Indiaas actrice; actriz india; שחקנית הודית; actriu índia; actores a aned yn 1973; Indian actress; ممثلة هندية; India näitleja; Indian actress; シェーバ・チャッダ
शीबा चड्ढा 
Indian actress
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखइ.स. १९७३
सहारनपूर
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९९८
नागरिकत्व
निवासस्थान
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q16200046
व्हीआयएएफ ओळखण: 6150565474306251703
जीएनडी ओळखण: 1139792113
आय.एम.डी.बी. दुवा: nm0149441
विकिडाटावर माहिती संपादित करा

शीबा चड्ढा (जन्म १९६३) एक भारतीय चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन अभिनेत्री आहेत.[] त्यांना २०२२ मधील बधाई दो आणि डॉक्टर जी या चित्रपटांमधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यांनी बधाई दो चित्रपटासाठी हा पुरस्कार जिंकला.[][]

सुरुवातीचे जीवन आणि करकीर्द

[संपादन]

चड्ढा दिल्लीत लहानाच्या मोठ्या झाल्या, जिथे त्यांना नाटकामध्ये रस निर्माण झाला आणि त्यांनी नाटकाचा अभ्यास सुरू केला.[] त्यांनी हंसराज कॉलेज (दिल्ली विद्यापीठ) मधून इंग्रजी साहित्यात शिक्षण घेतले.[] त्या अनुराग कश्यपसोबत वर्गमित्र होत्या.

चड्ढा यांनी हम दिल दे चुके सनम (१९९९), परजानिया (२००७), दिल्ली ६ (२००९), लक बाय चान्स (२००९) आणि तलाश (२०१२) यांसारख्या चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेता म्हणून काम केले आहे. [] २०११ मध्ये, त्या अभिनेता ऋतुराज सिंगसोबत, प्रकता हेत याड या लघुपटातही दिसल्या. रिव्हर टू रिव्हर या फ्लॉरेन्स इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये लघुपट प्रकारात या चित्रपटाला ऑडियन्स चॉइस पुरस्कार मिळाला.[] त्या २०१२ मध्ये तलाश: द आन्सर लाईज विदीन मध्ये निर्मलाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. २०१५ मध्ये शरत कटारियाच्या दम लगा के हैशामध्ये नैन तारा तिवारी (बुआजी) म्हणून त्यांनी काम केले.

दूरचित्रवाणीवर त्यांचे सुरुवातीचे काम हे लव्ह मॅरेज (२००२) मध्ये होते, ज्यानंतर त्यांनी २००७ मध्ये कस्तुरीमध्ये एका बिझनेस टायकूनच्या भूमिकेत दूरचित्रवाणीवर पुनरागमन केले.[] यानंतर ना आना इस देस लाडो (२००९-१२), कितनी मोहब्बत है (२००९), कहानी सात फिरों की (२००७), कुछ तो लोग कहेंगे (२०११-१३) आणि लाखों में एक (२०१२) सारख्या त्यांच्या अनेक मालिका आल्या.[] जून २०१२ मध्ये, त्या झी टीव्हीवरील हिटलर दीदी या लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकेच्या कलाकारांमध्ये सामील होत्या.[]

त्यांनी रजत कपूरच्या सी फॉर क्लाउन (२००७) या नाटकात काम केले.[] मुनीष भारद्वाज, विनय पाठक, कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरे यांच्यासोबत अतुल कुमारचा द ब्लू मग (२०१०) या नाटकामध्येही त्यांनी काम केले आहे.[] रॉयस्टेन एबेलच्या ऑथेलो इन ब्लॅक अँड व्हाईट मध्ये डेस्डिमोना (ऑथेलोची बायको) या प्रमुख भूमीकेत त्या होत्या. २०१२ मध्ये हेन्रिक इब्सेनच्या हेड्डा गॅबलर या नाटकात त्यांनी हेड्डाची मुख्य भूमिका केली होती.[] मुंबईत ‘द कंपनी थिएटर’ हा नाटक गट चालवण्यातही त्यांचा सहभाग आहे.[] त्या द व्हायरल फीव्हर (TVF) च्या बॅनरखाली असलेल्या परमनंट रूममेट्स या इंटरनेट दूरचित्रवाणी मालिकेत आहे.

फिल्मोग्राफी

[संपादन]
अद्याप प्रदर्शित न झालेल्या चित्रपट/शो/मालिका दर्शवते

चित्रपट

[संपादन]
वर्ष चित्रपट भूमिका
१९९८ दिल से.. मोईनाची बहीण
१९९९ हम दिल दे चुके सनम अनुपमा त्रिपाठी
२००० फिर भी दिल है हिंदुस्तानी जुही आनंद
२००२ काली सलवार रुखसाना
२००३ जिस्म शीबा
इन ऑथेलो करीना
२००४ एक हसीना थी शिल्पा शर्मा
मर्डर नर्गिस
२००७ परझानिया अनामिका
२००९ दिल्ली ६ रज्जो
लक बाय चान्स कविता
२०१० वेस्ट इज वेस्ट रेहाना खान
२०११ झोक्कोमोन राजराणी
२०१२ लव्ह यू टू डेथ माया कुमारी
तलाश निर्मला
२०१५ दम लगा के हईशा नयनतारा
२०१७ रईस अमिना आलम
इंदू सरकार मेखला
व्हॉट वील पिपल से अर्चना भोसले
२०१८ राजमा चाळ नीतू
रेड प्रभा देवी
बधाई हो संगीता शर्मा
झीरो बीना सिंग
२०१९ गल्ली बॉय झोया फिरदौसी
जबरिया जोडी बीना सिंग
बेबाक शीला
२०२० शकुंतला देवी ताराबाई
२०२१ हाती मेरे साथी न्यायाधीश इमरती
पॅग्ग्लिट उषा [१०]
२०२२ बधाई दो मीनाक्षी [११]
मजा मा पम्मी हंसराज
शर्माजी नमकीन आरती शर्मा
फोन भूत चिकनी चुडैल
खुदा हाफिज २ शीला ठाकूर [१२]
डॉक्टर जी शोभा गुप्ता [१३]
२०२३ राबिया अँड ऑलिव्हिया राबियाची आई
ट्रायल पिरेड मामीजी
द टेनंट श्रीमती मिश्रा
२०२४ ऑल इंडिया रॅन्क

दूरदर्शन

[संपादन]
वर्ष कार्यक्रम भूमिका
१९९८ - २००१हिप हिप हुर्रे
१९९९-२०००गुब्बरेअनु
२००२लव्ह मॅरेजसोनाली
२००७कस्तुरी
२००९-१२ना आना इस देस लाडो
२००९कितनी मोहब्बत है
२००९कहानी सात फेरों की
२०११-१३कुछ तो लोग कहेंगे[]
२०१२हिटलर दीदीदुलारी बुवा
२०१२लाखों में एक
२०१३-१४पवित्र रिश्ता
२०१५हॅलो प्रतिभापुष्पा चाची

वेब सिरीज

[संपादन]
वर्ष कार्यक्रम भूमिका
ऐसा वैसा प्यारसुनीता
२०१४परमनंट रूममेट्सलता चौधरी
२०१८मिर्झापूर वसुधा पंडित
२०२०बंदिश बॅन्डीटमोहिनी
२०२०ताजमहाल १९८९" मुमताज

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 Dipti Nagpaul D'souza (15 March 2012). "Language no bar". 15 July 2013 रोजी पाहिले. ..renowned theater artiste Sheeba Chaddha
  2. "Nominations for the 68th Hyundai Filmfare Awards 2023 with Maharashtra Tourism". Filmfare. 24 April 2023. 24 April 2023 रोजी पाहिले.
  3. "Winners of the 68th Hyundai Filmfare Awards 2023". Filmfare. 28 April 2023. 28 April 2023 रोजी पाहिले.
  4. 1 2 3 "Sheeba's brotherly love!". द टाइम्स ऑफ इंडिया. 6 October 2011. 17 July 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 July 2013 रोजी पाहिले.
  5. 1 2 "Sheeba Chadha — artist details". MumbaiTheatreGuide. 15 July 2013 रोजी पाहिले.
  6. 1 2 "Essaying conflicts". 11 February 2010. 17 July 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 July 2013 रोजी पाहिले.
  7. 1 2 Kimi Dangor (11 June 2007). "Back with a bang: Sheeba Chadha". India Today. 15 July 2013 रोजी पाहिले.
  8. "Sheeba Chaddha enters Hitler Didi". Sify.com News. 19 June 2012. 17 November 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 July 2013 रोजी पाहिले.
  9. Piyasree Dasgupta (31 March 2010). "Memory Central". 15 July 2013 रोजी पाहिले.
  10. Kambam, Saichaitanya (16 September 2020). "Netflix picks up "Pagglait" starring Sanya Malhotra and Shruti Sharma". OnlyTech. 16 September 2020 रोजी पाहिले.
  11. "Sheeba Chadha opens up on playing a mother in Rajkummar Rao and Bhumi Pednekar's Badhaai Do". Pinkvilla. 7 May 2021. 6 September 2021 रोजी पाहिले.
  12. "Khuda Haafiz Chapter 2 Agnipariksha trailer: Vidyut Jammwal stars in actioner inspired by Taken, watch". Indian Express. 8 June 2022. 8 June 2022 रोजी पाहिले.
  13. "Ayushmann Khurrana Celebrates Film Wrap With This Oh-So-Cute Cake". NDTV Food. 5 September 2021. 6 September 2021 रोजी पाहिले.[permanent dead link]
  14. "Nominations For The 68th Hyundai Filmfare Awards 2023 With Maharashtra Tourism". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 2023-06-08 रोजी पाहिले.