शिनोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?शिनोली

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर आंबेगाव
जिल्हा पुणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

शिनोली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

गावामध्ये शिनोली हे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी वसले असून गावामध्ये अठरापगड जातीची लोक गुण्यागोविंदाने नांदतात. गावाच्या इतिहासात कै. टी. एस. दादा बोऱ्हाडे(कामगार नेते) व श्री. पी.के. शेठ बोऱ्हाडे(थोर समाजसेवक) यांच्या माध्यमातून कनिष्ठ महाविद्यालय स्थापन झाले आणि शिक्षण गंगा गावातून वाहू लागली. गावा मध्ये अनेक विकास कामे या दोन्ही थोर व्यक्तींच्या माध्यमातून झालेली असून यामध्ये वैकुंठ स्मशानभूमी- पांडुरंग मुक्तिधाम अधिक प्रकर्षाने दिसते.


हवामान[संपादन]

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन[संपादन]

शिनोली गावातील लोकांचा व्यवसाय हा प्रामुख्याने शेती हा आहे. गावातील अनेक होतकरू तरुण हे मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये पोटापाण्याच्या निमित्ताने स्थायिक आहेत. गावातील अनेक तरुण हे आज वैद्यकीय,अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊन मोठ्या हुद्द्यावर आहेत.

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

गावामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे असून प्रमुख आकर्षण - श्री भैरवनाथ मंदिर (ग्रामदैवत ), हनुमान मंदिर , दत्त मंदिर , मुक्ताई मंदिर , बाळाजीबाबा मंदिर तसेच आजूबाजूचा परिसरामध्ये अनेक नैसर्गिक धबधबे पावसाळ्यात दिसून येतात.

प्रमुख आदरणीय व्यक्ती[संपादन]

कै. टी. एस. दादा बोऱ्हाडे(कामगार नेते) श्री. पी.के. शेठ बोऱ्हाडे(थोर समाजसेवक)


नागरी सुविधा[संपादन]

जवळपासची गावे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate