शिक्षण प्रसारक संस्था (संगमनेर)
शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर ही महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील शिक्षणसंस्था आहे. संगमनेर, अकोले, भंडारदरा, सिन्नर, प्रवरानगर आणि इतर परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे या हेतूने शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना १९६० साली करण्यात आली. संगमनेरच्या ग्रामीण परिसरात उच्चशिक्षण देणारे महाविद्यालय सुरू करणारी ही पहिली संस्था आहे. १९६० च्या दशकात या परिसरात एकही महाविद्यालय नव्हते.[१] संगमनेर महाविद्यालय, संगमनेर ही या संस्थेची पहिली निर्मिती आहे.[२]
पूर्वपीठिका
[संपादन]स्वातंत्र्यपूर्वकाळात संगमनेर, अकोले शहर व तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या सोयी झाल्या होत्या. 'स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाची झपाट्याने वाढ झाली. उच्च शिक्षणाकडे ओढा सुरू झाला होता. पण मुंबई, पुणे, नाशिकसारख्या ठिकाणी संगमनेर व अकोले येथील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे कठीण, खर्चिक झाले होते. या विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची सोय कमी खर्चात व जवळपास व्हावी' अशा आशयाची पत्रे, लेख, मनोगते येथील राजकीय कार्यकर्ते, समाजसेवक व बहुश्रुत माहितगार शंकरराव गंगाधर जोशी यांनी त्यावेळी लोकसत्ता, गावकरी इत्यादी वृत्तपत्रातून लिहिली. त्याची दखल संगमनेर नगरपालिकेने घेतली.[३]
संस्थेने १९६१ साली कला व वाणिज्य महाविद्यालय सुरू केले. महाविद्यालयाची स्थापना २३ जानेवारी इ.स. १९६१ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्म शताब्दीदिनास करण्यात आली. संगेमनेरातील सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह शंकरराव जोशी यांच्या पाठपुराव्याने महाविद्यालय सुरू झाले. १९६५ साली विज्ञान शाखा सुरू केली. प्रा. मधुसूदन विष्णू कौंडिण्य हे पहिले प्राचार्य होते. त्यांनी १९६१ ते १९९३ अशी ३३ वर्षांची प्रदीर्घ प्रचालकीय कारकीर्द महाविद्यालयासोबत पार पाडली.[४]
डिसेंबर १९६०ला संगमनेर नगरपालिकेस शंभर वर्षे पूर्ण झाली होती. १९६०-६१ हे शताब्दी वर्ष होते. ०३ मे १९६२ रोजी संगमनेर नगरपालिकेची शताब्दी साजरी करण्यात आली. तत्कालिन संरक्षणमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी संगमनेर येथे महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आणि "संगमनेर नगरपालिकेने गेल्या शंभर वर्षात केलेल्या कार्याचे प्रतिक म्हणून संगमनेर येथे महाविद्यालय काढण्यात यावे" असा ठराव पास केला.[३](शताब्दी) स्मृती ग्रंथ, संगमनेर नगरपालिका (१८६०-१९६०), पान ५१, ५७-५८, शतसांवत्सरिक महोत्सव ०३ मे १९६२, प्रकाशक : चिन्नप्पा व्यंकप्पा झुंजुर, अध्यक्ष, संगमनेर नगरपालिका, २२ ऑक्टोबर १९६२, मूल्यः पांच रुपये, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२११, संगमनेर</ref> त्यानुसार सर्वानुमते 'शिक्षण प्रसारक संस्था' स्थापन करण्याकरीता घटना समिती नियुक्त केली गेली.[५]
घटना समितीचे सभासद
[संपादन]- शंकरराव गंगाधर जोशी
- भिकाजीराव जिजाबा खताळ पाटील (बी. ए. ऑनर्स, एल.एल.बी.)
- हिंमतलाल मगनलाल शहा (बी. ए., एल.एल.बी.)
- दत्तात्रय काशीनाथ गणपुले (बी. ए., एल.एल.बी.)
- भा. शं. धुमाळ (बी. ए. ऑनर्स, एल.एल.बी.)
- द. मा. पिंगळे, वकील
- प. शि. लाहोटी
चार महिन्यात या समितीने घटना तयार केली. २३ जानेवारी १९६१ रोजी सोसायटीज् रजिस्ट्रेशन ॲक्ट १८६० व बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५० अन्वये 'शिक्षण प्रसारक संस्था' स्थापन केली गेली.
पहिले पदाधिकारी
[संपादन]- अध्यक्ष : शंकरराव रंगनाथ ठाकूर, पुणे
- उपाध्यक्ष : त्र्यंबक शिवराम भारदे (बी. ए., एल.एल.बी.), सभापती, विधानसभा
- सभासद : देवकिसन बस्तीराम सारडा, सिन्नर
- मोतीलाल शिवनारायण नावंदर, संगमनेर
- पनालाल परशराम लोहे, संगमनेर
कार्यकारी मंडळ
[संपादन]- कार्याध्यक्ष : हिंमतलाल मगनलाल शाह, वकील (बी. ए., एल.एल.बी.),
- सचिव : शंकरराव गंगाधर जोशी
- सहसचिव : दिनकरराव यमनाजी शेलार, वकील (बी. ए., एल.एल.बी.)
- खजिनदार : ओंकारनाथ दामोदर मालपाणी, अध्यक्ष, संगमनेर नगरपालिका
विश्वस्त
[संपादन]- बाबूलाल केशवराव शाह, संगमनेर
- प्रल्हादसा लहानुसा क्षत्रिय, संगमनेर
- मधुकर सिताराम डांगरे, संगमनेर
सल्लागार
[संपादन]- प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, फर्ग्युसन कॉलेज, पुणे
- प्राचार्य, टी. बर्नाबस, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर
- प्राचार्य अे. बी. शाह ,एस. आय. ई. एस. कॉलेज, मुंबई
- रावबहादुर नामदेवराव एकनाथ नवले, वकील (बी. ए., एल.एल.बी.), अहमदनगर
- खासदार अण्णासाहेब पांडुरंग शिंदे, (बी. ए., एल.एल.बी.), संसदीय चिटणीस, नवी दिल्ली
- पंढरीनाथ लक्ष्मण कानवडे, वकील (बी. ए., एल.एल.बी.), अहमदनगर
- गणपतराव लक्ष्मण कोकणे, संगमनेर
- डॉ. काशीनाथ अमृत देशपांडे, संगमनेर
- कृ. श्री. मराठे, (बी.ए. बी.टी.), पेटीट विद्यालय, संगमनेर
- प्राचार्य थील, ज्ञानमाता विद्यालय, संगमनेर
ब्रीदवाक्य आणि मानचिन्ह
[संपादन]प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः
संस्थेची उद्दिष्टे
[संपादन]- संगमनेर व अकोले या ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणाची सोय करण्यासाठी महाविद्यालय स्थापन करणे.
- या ग्रामीण आणि आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी ग्रामीण विद्यापीठ स्थापन करणे.
संस्थेचा विस्तार
[संपादन]मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्र, प्राचार्य म.वि. कौण्डिण्य संशोधन भवन, योग आणि निसर्गोपचार केंद्र, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय, ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय, शिक्षणशास्त्र पदवी महाविद्यालय, शिक्षणशास्त्र पदविका महाविद्यालय, वगैरे..
श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय
[संपादन]पूर्वी वरिष्ठ महाविद्यालयास जोडलेले कनिष्ठ महाविद्यालय स्वतंत्र करण्यात आले आहे. त्यासाठी नवी स्वतंत्र इमारत उभी करण्यात आली.
ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय
[संपादन]परिसरात जनतेची आणि विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन संस्थेने विधी महाविद्यालय सुरू केले आहे. या महाविद्यालयास संस्थेचे माजी कार्याध्यक्ष (दिवंगत) ओंकारनाथ मालपाणी यांचे नाव देण्यात आले आहे. संगमनेर महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील ज्येष्ठ प्रा. ओंकार बिहाणी हे विधी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य आहेत.
शिक्षणशास्त्र पदवी व पदविका महाविद्यालय
[संपादन]संस्थेने शिक्षणशास्त्र विभाग स्थापन केला असून त्या अंतर्गत पदवी महाविद्यालय व पदविका महाविद्यालय सुरू केले आहे. प्रा. ज्युईली वेल्हाळ या शिक्षणशास्त्र पदवी महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत तर प्रा. सविता घुले या शिक्षणशास्त्र पदविका महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत.
योग आणि निसर्गोपचार केंद्र
[संपादन]'मुक्तांगण' परिसरात सध्याचे योग आणि निसर्गोपचार केंद्र आहे. या केंद्राचा फायदा अनेक लोकांना होत असून अनेक असाध्य आजार, व्याधी इत्यादीवर येथे उपचार केला जातो. तथापि वाढत्या प्रतिसादामुळे केंद्रासाठी नवी इमारत उभी राहात आहे.
संस्थेचे पदाधिकारी (२०११-१६ साठीचे)
[संपादन]- अध्यक्ष : शं. ना. नवलगुंदकर [६]
- कार्याध्यक्ष : संजय ओंकारनाथ मालपाणी
- उपाध्यक्ष : दुर्गा सुधीर तांबे (नगराध्यक्षा), ॲड. प्रदीप मालपाणी, सौ. शैलजा सराफ, डॉ. अशोक पोफळे, बद्रीनारायण चांडक.
- सहसचिव : सी.ए. नारायण कलंत्री
- सचिव : अनिल राठी
- खजिनदार : बिहारीलाल डंग
आर्थिक परिस्थिती
[संपादन]- इ.स.१९६० चे दशक : प्रारंभ संस्था आणि महाविद्यालय सुरू करताना आर्थिक स्थिती सक्षम नव्हती. लोकवर्गणीतून संस्था व महाविद्यालय उभे राहिले.
- इ.स.२००० : आर्थिक विवंचनेत महाविद्यालय आल्याने 'दर्शन' ही ग्रंथ स्मरणिका प्रकाशित केली गेली.
- इ.स.२०१५ : निवृत्त प्राध्यापकांना अर्जित रजेची रोख रक्कम देण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याने संस्था पुन्हा आर्थिक आवर्तात सापडली. ही रक्कम संबंधित निवृत्त प्राध्यापकांनी संस्थेला देणगी म्हणून द्यावी, असे आवाहन त्यांना करून हे संकट टाळण्याचा प्रयत्न कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केला. अशा त्यागी प्राध्यापकांना त्यांनी 'दधिची Archived 2015-12-18 at the Wayback Machine.' या नामाभिधानाने गौरविले. त्यांची माहिती देण्यासाठी त्यांनी 'मी पाहिला दधिची' अशी लेखमाला फेसबुकवर लिहिली. शिवाय विद्यार्थी वर्गाशी महाविद्यालयात विशेष सुसंवाद साधला.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ About S.P. Sanstha, http://sangamnercollege.edu.in/about/ Archived 2015-10-28 at the Wayback Machine.
- ^ "संगमनेर कॉलेजला 'ए-प्लस' -Maharashtra Times". Maharashtra Times. 2016-11-08. 2018-03-21 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ a b (शताब्दी) स्मृती ग्रंथ, संगमनेर नगरपालिका (१८६०-१९६०), पान ५१, ५७-५८, शतसांवत्सरिक महोत्सव ०३ मे १९६२, प्रकाशक : चिन्नप्पा व्यंकप्पा झुंजुर, अध्यक्ष, संगमनेर नगरपालिका, २२ ऑक्टोबर १९६२, मूल्य: पांच रुपये, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२११, संगमनेर
- ^ "म. वि. कौंडिण्य -Maharashtra Times". Maharashtra Times. 2013-02-02. 2018-03-21 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ संपादकीय, नियतकालिक, संगमनेर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, संगमनेर, अंक १-२, वर्ष १९६२—६३, प्रकाशक : म. वि. कौण्डिण्य, प्राचार्य, संगमनेर साहित्य व वाणिज्य महाविद्यालय, संपादक मंडळ : प्राचार्य, म. वि. कौण्डिण्य, प्रा. श.वि. पानसे, प्रा. प्र. ना. अवसरीकर, प्रा. कु. विमल लेले, प्रा. ग.म. कांबळे प्रा. सु. शं. कलवडे, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२१२, संगमनेर, पान ०३,- ०५
- ^ "संग्रहित प्रत". 2015-10-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-10-22 रोजी पाहिले.