ओंकारनाथ मालपाणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ओंकारनाथ दामोदर मालपाणी (२१ फेब्रुवारी, इ.स. १९३४ - १० मार्च २००८[१] :संगमनेर) हे संगमनेर येथील अग्रगण्य उद्योजक होते.'मालपाणी ग्रुप' या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या उद्योगसमूहाचे ते आधुनिक अध्वर्यू होते. भारतातील प्रसिद्ध गाय छाप जर्दाचे ते उत्पादक होते.गाय छाप जर्दा बरोबरच त्यांनी भारतीय बाजारपेठेत 'माउली' आणि 'बादशहा' या जर्द्याच्या नव्या उत्पादनाची भर टाकली.[२] वडील दामोदर यांच्या आग्रहाखातर वैद्यकीय शिक्षण सोडून त्यांनी या व्यवसायात प्रवेश केला तेंव्हा केवळ दोन पोती जर्द्याचे उत्पादन होते. विद्यमान काळात मालपाणी उद्योगसमूहाची उलाढाल एक हजार कोटींची झाली आहे.[३]

तंबाखू व जर्दा व्यवसायाबरोबरच ते अनेक सामाजिक कार्ये आणि सार्वजनिक संस्थाशी संबंधित होते. उद्योगातून मिळणाऱ्या संपत्तीचा विनीयोग त्यांनी संगमनेरचे शैक्षणिक, सामाजिक आणि औद्योगिक जीवन समृद्ध करण्यासाठी ते नेहमी प्रयत्‍नशील होते.

शिक्षण[संपादन]

प्रथम वर्ष : एम. बी. बी. एस.

व्यावसायिक कारकीर्द[संपादन]

व्यापारविषयक[संपादन]

 • मालपाणी उद्योग समूहाचे संस्थापक-अध्यक्ष
 • १९५४ -६४ : संगमनेर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष
 • संगमनेर मर्चंट बँकेचे अध्यक्ष

ज्ञातीविषयक[संपादन]

 • अखिल भारतीय माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष
 • माहेश्वरी पंच विश्वस्त निधीचे कार्याध्यक्ष
 • माहेश्वरी विद्या प्रसारक संस्थेचे कार्यकारिणी सदस्य

सार्वजनिक संस्था[संपादन]

 • १९६२ -६५ : संगमनेर नगरपालिकेचे अध्यक्ष

शिक्षणविषयक[संपादन]

 • शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष
 • शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष
 • शारदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष

स्मरणार्थ[संपादन]

ओंकारनाथ जगन्नाथ मालपाणी यांच्या स्मरणार्थ शिक्षण प्रसारक संस्थेच्या विधी महाविद्यालयास श्री ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय, संगमनेर असे नाव देण्यात आले आहे. तसेच मालपाणी कुटुंब राहात असलेल्या रस्त्याला ओंकारनाथ जगन्नाथ मालपाणी मार्ग असे नाव दिले आहे.

येथे भेट द्या[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ गाय छाप जर्दाचे ओंकारनाथ मालपाणी यांचे निधन, म. टा. डी. ११ मार्च २००८,नासिक आवृत्ती, http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik/-/articleshow/2853636.cms, ०७ डिसेंबर २०१५ रोजी दुवा शोधला.
 2. ^ स्वागताध्यक्ष परिचय- स्मरणिका, १५ वे अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलन १६,१७,१८ नोव्हेंबर १९८०, संगमनेर महाविद्यालय, नियतकालिक विभाग, वर्ष १९८०
 3. ^ About Us, Company Overview, http://www.malpani.com/about-us/ Archived 2015-12-30 at the Wayback Machine., Malpani Groups, ०८ डिसेंबर २०१५ रोजी पहिले