Jump to content

शिंगावे (निफाड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  ?शिंगवे

महाराष्ट्र  भारत
  गाव  
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर निफाड
जिल्हा नाशिक जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

शिंगवे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

नाशिक पासून अवघ्या ३० किमी अंतरावर गोदावरी नदीकाठी हे गाव वसलेले असून शेतीप्रधान गाव अशी गावाची ओळख आहे.निफाड हे तालुक्याचे ठिकाण १५ किमी अंतरावर आहे.गुलाबी थंडीसाठी या गावाचा प्रदेश ओळखला जातो . []

हवामान

[संपादन]

येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.थंडीचे प्रमाण याठिकाणी जास्त आढळते. वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन

[संपादन]

लोकजीवन हे समृद्ध व संपन्न आहे.शेतीमध्ये गाजर या पिकाचे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पन्न घेणारे गाव म्हणून गावाची ओळख आहे. तसेच सर्व क्षेत्रामध्ये विविध पदांवर येथील लोक कार्यरत आहे.

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

या गावामध्ये पुरातन महादेव आणि मारूतीचे मंदिर असून गोदावरी नदी जवळून वाहते. गावामध्ये दत्त जयंतीला खंडेराव महाराज यात्रा भरते ज्यामध्ये बारागाडे ओढले जातात व स्वातंत्र्य पूर्व काळापासून बारागाडे ओढण्याची परंपरा आहे. येथील डेर्ले कुटुंबाला हा मान आहे तसेच येथे महाशिवरात्रीला यात्रा भरते यामध्ये घोडा व बैल यांच्या टांगा शर्यतीचे आयोजन केले जाते.

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

सायखेडा,करंजगाव,कोठूरे,भेंडाळी,सोनगाव

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate Archived 2021-01-23 at the वेबॅक मशीन.
  1. Shingave Village