शरद जांभेकर
शरद जांभेकर (?? - २५ जून, २०२०, मुंबई, महाराष्ट्र [१]) हे मराठीतले एक शास्त्रीय गायक, भावगीत गायक आणि गायक नट होते. शरद जांभेकर यांनी सुमारे दहा वर्षे नारायणराव व्यास आणि दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांच्याकडे आणि काणेबुबा यांच्याकडे सुमारे ४० वर्षे आग्रा-ग्वाल्हेर किराणा घराणा गायकीचे शिक्षण घेतले. काणेबुवांच्या निधनानंतरही ते त्यांच्या सूनबाई सुखदा काणे यांच्याकडे जात असत. सुखदा काणे या लिमयेबुवांच्या शिष्या आणि जयपूर घराण्याच्या गायिका आहेत.
जांभेकर हे मुंबई आकाशवाणी केंद्रात वयाच्या २५ वर्षांपासून पुढे दीर्घकाळ म्हणजे वयाच्या ५०व्या वर्षापर्यंत कार्यक्रम निर्माते म्हणून काम करत होते. त्यांनी सांगली आकाशवाणी केंद्रातही काही काळ नोकरी केली होती. शास्त्रीय, सुगम, नाट्य या संगीतप्रकारांमध्ये त्यांची विशेष पकड होती. शरद जांभेकरांनी लता मंगेशकरांसोबत अनेक गाण्यांमध्ये कोरस म्हणून साथही दिली होती. शास्त्रीय संगीतामध्ये अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रसिद्ध गीते
[संपादन]- अष्टविनायका तुझा महिमा (कवी - जगदीश खेबूडकर; संगीत - अनिल-अरुण; गायक - शरद अभ्यंकर, अनुराधा पौडवाल आणि इतर; चित्रपट - अष्टविनायक)
- गंगा आली रे अंगणी (कवी - ग.दि. माडगूळकर; संगीत दत्ता डावजेकर; गायक शरद अभ्यंकर आणि अनेक; चित्रपट - संथ वाहते कृष्णामाई)
- चंदनाचे परिमळ अम्हां काय (भक्तिगीत, कवी - विश्वनाथ जोगळेकर; संगीत अनिल मोहिले)
- रवि मी हा चंद्र कसा (कवी - कृ.प्र. खाडिलकर; संगीत गोविंदराव टेंबे; मूळ गायक - दीनानाथ मंगेशकर; नाटक - मानापमान; राग - तिलककामोद)
- राधाधरमधुमिलिंद जयजय (नाट्यगीत, मूळ गायक - रामदास कामत; कवी व संगीतकार- अण्णासाहेब किर्लोस्कर; नाटक - संगीत सौभद्र; राग - यमन)
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "पंडित-शरद-जांभेकर-निधन: Latest पंडित-शरद-जांभेकर-निधन News & Updates, पंडित-शरद-जांभेकर-निधन Photos & Images, पंडित-शरद-जांभेकर-निधन Videos |". Maharashtra Times. 2020-06-26 रोजी पाहिले.