Jump to content

शततारका (नक्षत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शतभिषज या पानावरून पुनर्निर्देशित)

शततारका किंवा शतभिषज (इंग्रजीत Gamma Aquarii) हे आकाशातील २७ नक्षत्रांपैकी हे एक नक्षत्र आहे. हिंदू ज्योतिषशास्त्रात मानल्या गेलेल्या राहू या ग्रहाची ही देवता समजली गेली आहे.

नक्षत्र
अश्विनी
भरणी
कृत्तिका
रोहिणी
मृग
आर्द्रा
पुनर्वसु
पुष्य
आश्लेषा
मघा
पूर्वाफाल्गुनी
उत्तराफाल्गुनी
हस्त
चित्रा
स्वाती
विशाखा
अनुराधा
ज्येष्ठा
मूळ
पूर्वाषाढा
उत्तराषाढा
श्रवण
धनिष्ठा
शततारका
पूर्वाभाद्रपदा
उत्तराभाद्रपदा
रेवती
अभिजीत


भारतीय सत्तावीस नक्षत्रांपैकी हे चोविसावे नक्षत्र आहे. यात शंभर तारे आहेत अशी कल्पना आहे, म्हणून त्याचे नाव ‘शततारका’ असे पडले आहे. तथापि खगोलाच्या या भागात मोठे तारेच नाहीत. लँब्डा अँक्वारी हा या नक्षत्राचा योगतारा (प्रमुख तारा) असून तो जवळजवळ ⇨ क्रांतिवृत्तावरच आणि मीनास्य (फोमलहॉट) या मोठ्या ताऱ्याच्या उत्तरेस सु. २२० अंतरावर आहे. या ताऱ्याची ⇨ प्रत ३.८ असून त्याचे स्थान होरा २२ ता. ५० मि.; क्रांती – ७० ४९·५ असे आहे. या नक्षत्राचे दुसरे नाव शतभिषज् किंवा शंतभिषा असे आहे. फलज्योतिषानुसार हे नक्षत्र कल्याणप्रद, ऊर्ध्वमुख व मंदलोचन असे सांगितले आहे. याची देवता इंद्र (वरुण) व आकृती वर्तुळ कल्पिली आहे. या नक्षत्राचा अंतर्भाव कुंभ राशीत होतो.

हे सुद्धा पहा

[संपादन]