समास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.
मनुष्य बोलत असताना बोलण्याच्या ओघात कधी-कधी तो काही मराठी शब्द गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवितो, उदा. पोळीसाठी पाट या दोन शब्दांऐवजी पोळपाट असा जोडशब्द वापरतो. मराठी भाषेत दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांचे एकत्रीकरण करून त्यांचा एक शब्द करण्याची परंपरा पुष्कळ जुनी आहे. या व्यवस्थेने शब्दांचा संक्षेप होऊन थोड्या शब्दांत पुष्कळ अर्थ व्यक्त होतो, आणि भाषेत आटोपशीरपणा येतो.
शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्याला 'सामासिक शब्द' असे म्हणतात.
हा सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्याची फोड करून सांगण्याच्या पद्धतीला 'विग्रह' असे म्हणतात.

समासात किमान दोन शब्द किंवा दोन पदे एकत्र येतात. या दोन शब्दांपैकी कोणत्या पदाला अधिक महत्त्व आहे त्यावरून समासाचे चार प्रकार पडतात.

क्र. समासाचे नाव प्रधान पद उदाहरण
१. अव्ययीभाव पहिले आजन्म, पदोपदी
२. तत्पुरुष दुसरे राजवाडा, गायरान
३. द्वंद्व दोन्ही पितापुत्र, बरेवाईट
४. बहुव्रीही अन्य चंद्रमौली, गजमुख

-- "ज्या समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते प्रमुख असते व ज्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो त्या समासाला 'अव्ययीभाव समास' असे म्हणतात."

उदाहरणार्थ-
यथाक्रम - क्रमाप्रमाणे
प्रतिक्षण - प्रत्येक क्षणाला

पदोपदी :- प्रत्येक पदी Samas :

तत्पुरुष[संपादन]

  • दुसरे पद प्रधान त्याला-
   उदा० महाराज धुल्पतिवर

स्त्री पुरुष धन

बहुव्रीहि[संपादन]

  • दोन्ही पदांव्यतिरिक्त अन्य शब्दाकडे निर्देश -


उदा० नीलकंठ

समासविषयक काही महत्त्वाच्या गोष्टी[संपादन]

 1. एकाच सामासिक शब्दांचे विग्रह वेगवेगळ्या प्रकारे करता येतात
 2. समासातील पदे संस्कृतातून आलेली (तत्सम)असतील तर त्यांचा संधी करतात. जसे विद्या+अभ्यास=विद्याभ्यास,
 3. मराठीत शब्दांचा संधी करण्याकडे कल नसतो. तोंड+ओळख=तोंडओळख
 4. भिन्न भाषांतील शब्दांचा समास करणे टाळतात. हेडशिक्षक(हेडमास्तर ठीक),डाकगृह(डाकघर ठीक आहे),गृहजावई (घरजावई बरोबर आहे).