Jump to content

गोविंद आप्पाजी फडके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वैद्यरत्न श्री.गो.आ.फडके शास्त्री या पानावरून पुनर्निर्देशित)
गोविंद आप्पाजी फडके
जन्म गोविंद आप्पाजी फडके
११ नोव्हेंबर १९०७
इचलकरंजी
मृत्यू १५ एप्रिल १९९१
सातारा
मृत्यूचे कारण वृद्धापकाळ
निवासस्थान सातारा, सातारा जिल्हा,महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण आयुर्वेद विशारद, आयुर्वेदाचार्य,आयुर्वेद रत्न
प्रशिक्षणसंस्था आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय, सातारा
पेशा वैद्य
मूळ गाव इचलकरंजी
धर्म हिंदू
जोडीदार सौ.लीलावती फडके
अपत्ये डॉ.श्रीकृष्ण फडके, डॉ.सौ.रमा केतकर, डॉ.सौ.प्रभा कर्वे,डॉ.श्रीरामचंद्र फडके,सौ.प्राची फडणीस
वडील आप्पाजी फडके
पुरस्कार वैद्य खडीवाले पुरस्कार

वैद्यरत्‍न गोविंद आप्पाजी फडके (११ नोव्हेंबर, १९०७: इचलकरंजी - १५ एप्रिल, १९९१: सातारा) हे आयुर्वेदाचार्य होते. त्यांना फडके शास्त्री म्हणून ओळखले जात असे. इचलकरंजीचे तत्कालीन जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली होती. त्यांनी आयुर्वेद विशारद, आयुर्वेदाचार्य ह्या पदव्या साताऱ्याच्या आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयातून मिळवल्या. त्यांनी स्वातंत्र्यपूर्वकाळातील बडोदा संस्थान येथील निखिल विद्यापीठाची वैद्यरत्‍न ही सर्वोच्च पदवीही संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी इचलकरंजी संस्थानातील उत्तूर या गावी दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून काही काळ काम पाहिले. नंतर ते आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय, सातारा येथे सुरुवातीला प्राध्यापक म्हणून लागले नंतर त्या संस्थेचे प्राचार्य झाले.

आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयात रुग्णालयातील कायचिकित्सा विभागाबरोबरच शल्यचिकित्सा, भूलतंत्र इ. विषयांत त्यांनी भरपूर काम केले. त्यांनी १९५१पासून साताऱ्यामध्ये खाजगी वैद्यकीय सेवा सुरू केली. आयुर्वेदिक पद्धतीनेच निदान आणि चिकित्सा करण्यावर त्यांचा भर होता. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून सुद्धा त्यांच्याकडे रुग्ण येत असत. निष्णात आयुर्वेद चिकित्सक म्हणून त्यांनी सुमारे ४० वर्षे रुग्णसेवा केली. त्यांनी लिहिलेली पुस्तके आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तके म्हणून वापरली जातात.

प्रकाशित पुस्तके

[संपादन]
  • सिद्धौषधी संग्रह
  • दोषधातुमलविज्ञान
  • ज्वर चिकित्सा
  • संकलित शारीर
  • ज्वर निदान
  • औषधी शास्त्र
  • राजयक्ष्मा
  • बाळाचे आजार व घरगुती औषधे
  • द्रव्यगुणशास्त्र

सन्मान

[संपादन]

त्यांना वैद्य खडीवाले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.