Jump to content

वृक्षवलय कालमापन पद्धती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वृक्षवलय कालमापनासाठी झाडाच्या खोडाचा नमुना

वृक्षवलय कालमापन पद्धती (इंग्लिश: Dendrochronology; डेन्ड्रोक्रोनोलॉजी )
या पद्धतीचा शोध ए.ई. डग्लस या खगोलशास्त्रज्ञाने लावला. १९०४ पासून डग्लस यांनी सूर्यावरील डाग, हवामानातील बदल आणि वृक्षांची वाढ यांचा एकमेकांशी असणारा संबंध या क्षेत्रात संशोधन सुरू केले. याचा अभ्यास करताना त्यांना असे आढळून आले की पिवळ्या पाईन वृक्षाच्या खोडाच्या वर्तुळाचा त्या वृक्षाच्या कालमापनास उपयोग करता येतो.

ही कालमापन पद्धती दोन तत्त्वांवर आधारलेली आहे. त्यातील पहिले असे की विशिष्ट वर्गाच्या झाडांच्या वर्तुळाची ठरावीक रचना असते. दुसरे असे की विशिष्ट वर्गाच्या झाडांच्या वर्तुळांची घडण समकाल स्वरूपाची असते. ही तत्त्वे लक्षात घेऊन विशिष्ट वर्गाच्या झाडांच्या खोडाचे नमुने, वर्तुळरचनेचे तक्ते तयार केले जातात.