Jump to content

"अवेस्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५,१९९ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
[[अलेक्झांडर]]च्या मागून [[सेल्युकस]]च्या अंमलाखाली व पार्थियन अमदानींताहि, अवेस्ता ग्रंथाचा पुष्कळ भाग नामशेष झाला. तथापि अशा हालाखीच्या स्थितींतहि अवेस्ताचा बराच भाग शिल्लक होता व काही भाग पारशी उपाध्यायांच्या तोंडात शतकाच्या प्रारंभी शिल्लक राहिलेल्या अवेस्ता ग्रंथाचें एकीकरण करण्याचा प्रयत्‍न झाला. वष्कश राजानें उपलब्ध अवेस्ता ग्रंथ लिहून काढण्यांत यावे, अशी आज्ञा जाहीर केली. सस्सानियन घराण्याच्या संस्थापकाने हीच परंपरा सुरू ठेवली. त्यामुळे या एकत्रीकरणाच्या प्रश्नाला चालना मिळाली व दुसऱ्या शापूरच्या कारकीर्दीत (३०९-३८०) आदरबाद मारसपंद या मुख्य प्रधानाच्या देखरेखीखाली या उपलब्ध ग्रंथाने एकत्रीकरण झाले; व हा तयार झालेला ग्रंथ प्रमाण ग्रंथ म्हणून मानण्यांत येऊं लागला. पण अलेक्झांडरच्या स्वारीने जे पारशांचे व त्यांच्या धर्मग्रंथांचे नुकसान झाले नाही ते [[मुसलमान]]ांच्या प्रशियावरील स्वारीने झाले. मुसलमानांनी इराण पादाक्रांत केल्यावर त्यांनी आपल्या नेहमींच्या पद्धतीप्रमाणें धर्मच्छल करण्यास सुरुवात केली. ज्या ज्या ठिकाणी [[धर्मग्रंथ]] सांपडतील ते सर्व गोळा करून त्यांचा नाश करावा असे फर्मान काढण्यांत आले व पारशांचा फार छळ करण्यांत आला. त्यामुळे पारशी लोकांना देशत्याग करणे भाग पडले. त्यांच्याबरोबर जेवढा अवेस्ता ग्रंथाचा भाग नाशातून वाचला तेवढा रक्षिला गेला. पारशी लोकांपैकी बऱ्याच लोकांनी बाटण्याच्या भीतीने [[भारत]]ाचा मार्ग धरला. भारतात असता राखण्यात आलेला अवेस्ता ग्रंथाचा भाग पुन्हा लिहून काढण्यात आला. त्या प्रतींपैकी कांही प्रती १३-१४ व्या शतकामधील असून त्या उपलब्ध आहेत. पण कोणत्याही एका प्रतीत समग्र अवेस्ता ग्रंथ एकत्र असलेला आढळत नाही.
 
== अवेस्ता ग्रंथाचे स्वरूप ==
ज्याला हल्ली झेंदावेस्ता म्हणून संबोधण्यात येते, त्याचे दोन मुख्य भाग आहेत. पहिला, ज्यालाच खरोखर अवेस्ता हें नांव देणें संयुक्तिक होईल त्यामध्यें वेंदीदाद, विस्पेरद व यश्न यांचा समावेश होतो. वेंदीदादमध्यें पौराणिक कथा व धर्माच्या आज्ञा यांचा संग्रह झालेला आहे विस्पेरदमध्ये, यज्ञाकरीता जरूर अशा अरिष्टशांतिप्रार्थनांचा संग्रह आहे. यश्नमध्ये अशाच प्रकारच्या अरिष्टशांतिप्रार्थनांचा अंतर्भाव असून शिवाय, प्राचीन गाथापंचकाचाही यांत समावेश करण्यात आला आहे. काही हस्तलिखित प्रतीत हे तिन्ही ग्रंथ परस्परांहून स्वतंत्र असून त्यांच्या शेवटी पहलवी भाषेतील भाषांतर जोडलेले आढळते. इतर हस्तलिखित प्रतीत हे तीन्ही ग्रंथ यज्ञांमधील प्रार्थनांच्या दृष्टीने सोईप्रमाणे, एकत्र करण्यात आले आहेत व त्यांच्या शेवटी भाषांतर अगर टीका वगैरे काही आढळत नाहीत. म्हणून त्याला 'शुद्ध वेंदीदाद' असे नांव देण्यात येते. दुसऱ्या भागाचे खोर्द अवेस्ता असे नांव असून त्याच्या मध्ये छोटी छोटी प्रार्थनासूक्ते ग्रथित झालेली आहेत. ही सूक्ते केवळ उपाध्यायांनीच नव्हे तर सर्व गृहस्थांनी विशिष्ट प्रसंगी विशिष्ट तऱ्हेंने म्हणावयाची असतात. याखेरीज या भागांत यश्त व इतर संकीर्ण कथांचा अंतर्भाव होतो. यश्त म्हणजे देवतांच्या स्तुतींचा केलेला संग्रह.
 
आज जे अवेस्तावाड्मय उपलब्ध आहे ते संपूर्ण नूसन बरेचसे वाड्मय लुप्त झालेले असावे असे या वाड्मयाच्याकडे विचारपूर्वक पाहिल्यास सहज दिसून येईल. शिवाय या मताला ऐतिहासिक पुरावाही पण सापडतो. अरबांच्या विजयामुळे सस्सानियन राजघराण्याला ओहोटी लागली. झेंद वाड्मयाचा बराच भाग उध्वस्त करण्यांत आला. वेंदीदादच्या पहलवी भाषांतरात असे पुष्कळ झेद भाषेतील उतारे सांपडतात की त्यांची माहितीच आपल्याला अद्यापी लागलेली नाही. निरंगिस्तान एओजेमेद, या ग्रंथांतही असे पुष्कळ अज्ञात पुस्तकांतील उतारे घेतलेले आहेत. यश्तांची संख्या ३० आहे अशी पारशी लोकांची समजूत आहे. पण त्यांपैकी १८ उपलब्ध आहेत. इतके तरी अवेस्ता वाड्मय शिल्लक राहिले याचे कारण त्यात श्रौतस्मार्तविधींचा संग्रह असून त्यांचा नेहमी व्यवहारांत उपयोग होत असल्यामुळे त्याचे रक्षण होणे स्वाभाविकच होते हे होय.
 
== हेही पहा==
*[[धर्मग्रंथ]]
 
== बाह्य दुवे==
 
== संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग: पारशी धर्म]]
३५,५२८

संपादने