"दारासिंग रंधावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
जन्मदिनांक दुरूस्त केला
ओळ २७: ओळ २७:


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* [http://www.marathimati.net/rustum-e-hind-dara-singh-expired/ अभिनेते रुस्तुम-ए-हिंद दारासिंग यांचे निधन] - [[मराठीमाती]]
* {{आय.एम.डी.बी. नाव|0802107|{{लेखनाव}}}}
* {{आय.एम.डी.बी. नाव|0802107|{{लेखनाव}}}}



१६:१८, १२ जुलै २०१२ ची आवृत्ती

दारासिंग रंधावा (पंजाबी: ਦਾਰਾ ਸਿੰਘ ; रोमन लिपी: Dara Singh Randhawa ;) (१९ नोव्हेंबर, इ.स. १९२८ - १२ जुलै इ.स. २०१२) हे एक पंजाबी, भारतीय पहिलवान व चित्रपट-अभिनेते होते. ऑगस्ट, इ.स. २००३ - ऑगस्ट, इ.स. २००९ या काळात ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर भारताच्या राज्यसभेवर निवडून गेले होते.

जीवन

दारासिंगांचा जन्म १९ जानेवारी, इ.स. १९२८ रोजी जाट कुटुंबात झाला. त्यांचे बालपण पंजाबातील अमृतसरजवळील धर्मू चाक नावाच्या खेड्यात गेले. गावाच्या जवळपास त्यांची शेकडो एकर वडिलोपार्जित शेती होती. शेतात काम करण्यात वयाची सतरा वर्षे निघून गेली. अंगात फरपूर ताकद होती, आणि काम करण्याचा जबरदस्त आवाका. एका दिवसात संपूर्ण एका एकरावरील गव्हाची केवळ विळ्याने कापणी करायचा दाराचा विक्रम अजून अबाधित आहे. त्या काळात त्यांच्या गावातले आणि आजूबाजूचे लोक नशीब अजमावायला सिंगापूरला जात. दाराही गेला. तिथे त्याचे काका होते, त्यांच्याकडे राहू लागला. एका लष्करी मद्यालयावर त्याला रात्रीच्या पहारेकऱ्याची नोकरी मिळाली. रात्री पहारा करायचा आणि दिवसा लोक सांगत त्या गामा पहिलवानाच्या गोष्टी ऐकायच्या, असा दिनक्रम. गामा पहिलवानाच्या गोष्टींमधला त्याचा रस आणि त्याची शरीरयष्टी पाहून एकाने त्याला कुस्त्या का करत नाहीस म्हणून विचारले. आता इतक्या मोठ्या वयात कुस्ती शिकायची कशीकाय सुरुवात करणार? आणि कुस्तीगीराला चांगला खुराक लागतो, तो कसा परवडणार? पण एक वस्ताद भेटला. म्हणाला, वयाच्या पंचविशीपर्यंत हाडे तयार होत असतात, कुस्ती सहज शिकता येईल. वस्तादाने दाराला त्याची दाढी आणि मानेपर्यंत रुळणारे केस छाटायला लावले. तो डोक्यावर घालत असलेल्या पगडीचा त्याग करायला लावला, आणि त्याची तालीम सुरू केली. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी दारा कुस्तीच्या आखाड्यात उतरला.

काही दिवसांतच दारासिंग सिंगापूरमधील भारतीय कुस्तीगीरांच्या दोन गटांचा सभासद झाले. त्यांच्या पहिल्या जाहीर कुस्तीत दारासिंग यांनी एका चिनी पहिलवानाला चितपट केले. या कुस्तीने दाराला प्रसिद्धी आणि पैसे मिळाले. आता खुराकाच्या खर्चाची सोय झाली होती. आणखी एकदोन कुस्त्या जिंकल्यावर दारासिंग यांनी पहारेकऱ्याची नोकरी सोडून दिली आणि कुस्तीवर संपूर्ण ध्यान द्यायला सुरुवात केली. काही वर्षांनी दारासिंग सिंगापूरवरून इंडोनेशिया आणि श्रीलंका येथे गेले आणि तिथल्या पहिलवानांना हरवून भारतात (मुंबईत) आले. त्या वेळी मुंबईत युरोपीय कुस्तीगीर किंगकाँगचा बोलबाला होता. किंगकाँग आपल्या पाशवी शक्तीसाठी आणि उद्धटपणासाठी कुप्रसिद्ध होता. दारासिंगांनी मुंबईत त्याच्याशी जबरदस्त कुस्ती खेळून त्याचा पाडाव केला. किंगकाँगला हा अपमान जिव्हारी लागला आणि तो सिंगापूरला कायमसाठी निघून गेला. त्यानंतर दारासिंग युरोपात गेले भरपूर कुस्त्या खेळले आणि तिथेही त्यांनी कुस्तीत एकदाही न हरण्याचा विक्रम केला. शेवटीशेवटी इ.स. १९५९ मध्ये कॅनडाला जाऊन तिथे कुस्त्या मारून दारासिंग यांनी राष्ट्रकुलासाठी ठेवलेली ट्रॉफी जिंकली आणि ते भारतात परत आले.

चित्रपट- कारकीर्द

दारासिंग रंधावांचे कुस्तीजीवन ऐन भरात असताना त्यांना १९६० सालच्या एका धमाकेदार लढतीनंतर दर्शन सभरवाल आणि रामकुमार नावाचे दोन चित्रपटनिर्माते भेटले आणि त्यांच्या चित्रपटांत भूमिका करावी असा प्रस्ताव त्यांनी दारासिंगांसमोर ठेवला. दारासिंगाच्या प्रसिद्धीचा फायदा करून घेण्याचा निर्मात्यांचा हेतू स्पष्ट होता. पण दारासिंग बधले नाहीत. त्यांनी त्या वेळेपर्यंत फक्त दोन चित्रपट पाहिले होते, आणि त्यांना चित्रपटांचे अजिबात आकर्षण नव्हते. निर्माते पुन्हापुन्हा येत राहिले आणि दारांना गळ घालत राहिले. दारासंगांना जुन्या निवृत्त कुस्तीगीरांची हलाखीची परिस्थिती आठवली; त्यांच्यापैकी एक टांगा चालवून उदरनिर्वाह करीत होता. दारसिंगांनी विचार केला, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना चित्रपटांत जायला काय करकत आहे? कोण जाणे पुढे कुणी नवा मल्ल येईल आणि आपली कारकिर्द संपवून टाकेल.

चाळीस कुस्त्यांचे चाळीस हजार मिळतात, तसेच चाळीस दिवसांच्या चित्रीकरणाचे चाळीस हजार मिळावेत या अपेक्षेने दारासिंग रंधावांनी महेश भटांचे वडील नानाभाई भट यांच्या दिग्दर्शनाखाली किंगकाँग या चित्रपटात काम केले. १९६२मध्ये हा चित्रपट बाहेर पडला. सामाजिक रडक्या चित्रपटांचा वैताग आलेल्या प्रेक्षकांनी किंगकाँग डोक्यावर घेतला. चाहाळीस हजार रुपयांचे पुढच्यापुढच्या तारखांचे धनादेश हाती पडले. त्यांपैकी फक्त पाच हजार रुपयांचे वटले आणि बाकीचे धनादेश बँकांनी धुडकावून लावले. पण प्रसिद्धी अमाप झाली. १९६२-६३ या दोन वर्षांत दारासिंगांचे सॅमसन, हर्क्युलस, तूफान, आया तूफान, फिर आया तूफान, थीफ ऑफ बगदाद, आणि टारझन यांसारखे डझनभर चित्रपट प्रकाशित झाले किंवा त्यांचे चित्रीकरण सुरू झाले. कुस्तीमुळे दारासिंगांचा मेहनत करायचा आवाका(स्टॅमिना) जबरदस्त वाढला होता. त्यामुळे ते दिवसातून चित्रीकरणाच्या तीन पाळ्यात काम करत. या बाबतीत त्यांनी चित्रपट अभिनेता महमूदचे विक्रम मोडीत काढले. मजेशीर गोष्ट अशी की दारासिंगांनी इराणी मल्ल रुस्तुम या नावावरून बेतलेल्या रुस्तुम, रुस्तुमे हिंद व रुस्तुमे रोम या तीनही चित्रपटांत कामे केली.

नायिका

चित्र:Jat Mahasabha Function.jpg
जाट समाजाच्या सार्वजनिक मेळाव्यात अन्य आमंत्रितांसह दारासिंग

दारासिंगांचे चित्रपट कितीही पैसा मिळवून देत असले तरी त्यांच्याबरोबर काम करायला त्याकाळच्या साधना-वैजयंतीमाला यांसारख्या प्रथितयश अभिनेत्री तयार होत नसत. काही झाले तरी दारासिंग काम करीत असलेले हे दे-मार चित्रपट ब-दर्जाचे समजले जात. पुढे सॅमसनच्या शूटिंगदरम्यान निर्मात्याने चित्रीकरण पहात असलेल्या मुमताझ आणि तिच्या १४ वर्षाच्ह्या बहिणीकडे बोट दाखवून त्यांतली एक नायिका म्हणून पसंत करायचा आग्रह केला. "मी ब्रह्मचारी, मला त्यांतले काही समजत नाही, आपण सांगाल तिच्याबरोबर काम करीन"...दारासिंगांचे उत्तर. आणि मुमताझ दारासिंगांची नायिका झाली, आणि त्यापुढील काळात मुमताझची मरगळलेली चित्रपट कारकिर्द झळाळून निघाली. मुमताझच्या बहिणीने पुढे दारासिंगांच्या धाकट्या भावाशी लग्न केले.

पुन्हा कुस्ती

१९६८ नंतर दारसिंग रंधावांनी पुन्हा एकदा रोजचे ३००० जोर आणि ३००० बैठका मारायला सुरुवात केली आणि नंतर अमेरिकेत जाऊन तिथल्या जागतिक चँपियन रुफूसला हरवून जगज्जेतेपद मिळवले. पुढील दोन वर्षे हे पद त्यांच्याकडेच राहिले आणि तिसऱ्या वर्षी दुसऱ्या कुणालातरी मिळावे म्हणून दारासिंगांनी स्पर्धेत भागच घेतला नाही. वयाच्या ५३ वर्षांपर्यंत सक्रिय कुस्तीगीर राहिलेल्या दारासिंगानी आपल्या साठीत रामानंद सागरांच्या रामायण या दूरचित्रवाणीवरील मालिकेत हनुमानाची यशस्वी भूमिका केली. त्यापूर्वी त्यांनी जय बजरंग बली या चित्रपटात मारुतीचे काम केले होतेच. उतार वयात दारासिंगांनी जब वी मेट आणि शरारत या चित्रपटांत आणि क्या होगा निम्मोका या दूरचित्रवाणी मालिकेत थोड्याशी विनोदी ढंगाच्या भूमिका केल्या आहेत.

चित्रपटनिर्मिती

१९७० च्या दशकात दारा प्रॉडक्शन या नावाखाली दारासिंगांनी चित्रपट-निर्मिती सुरू केली. त्यांनी निर्माण केलेले सर्व चित्रपट एक तर देशभक्तिपर होते नाही तर धार्मिक सलोख्यावर. त्यांच्या नमक दुखिया सब संसार या पंजाबी चित्रपटाने त्यांना पुरस्कार मिळवून दिले .त्यांनी निर्मिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या हिंदुस्थानच्या फाळणीच्या कथानकावर आधारित `नसीहत'मध्ये पृथ्वीराज कपूर आणि बलराज सहानी यांनी कामे केली होती. बांगलादेश निर्मितीवर बेतलेल्या मेरा देश मेरा धरममध्ये दारांच्या दिग्दर्शनाखाली नव्याने आलेल्या राज कपूरने काम केले होते. दारा प्रॉडक्शनने एकूण बारा चित्रपट काढले, सहा पंजाबी आणि सहा हिंदी. हिंदीतले कसम और भगवान, भक्ति में शक्ति आणि रुस्तुम हे गाजले. वीरेंद्रसिंग्(विंदू) या आपल्या मुलाची भूमिका असलेला दारा प्रॉडक्शनचा करण हा शेवटचा चित्रपट फारसा गाजला नाही.

कौटुंबिक जीवन आणि निवृत्तीनंतरचे आयुष्य

दारासिंगांना तीन मुली आणि दोन मुलगे आहेत. मुलींची लग्ने झाली आहेत, एक मुलगा अंतिक आपला व्यवसाय करतो, आणि दुसरा विंदू अभिनयाच्या क्षेत्रात आहे. तो अनेकदा दूरचित्रवाणीवर झळकताना आढळतो. कुस्तीतून आणि चित्रपटांतून निवृत्त झाल्यावर दारासिंग आपल्या रशियन पत्नीसह आणि मुलां-नातवंडांसमवेत जुहूच्या बंगल्यात मजेने राहत आहेत. अजूनही ते औरंगाबाद आणि भारतातील इतर शहरांत जाऊन पहिलवानांना मार्गदर्शन करतात, आणि आपल्या अध्यक्षतेखाली कुस्त्यांचे फड भरवतात. दारासिंग शाकाहारी होते आणि अजूनही आहेत. ते इतर पंजाबी माणसांप्रमाणे तंदूर रोटी आणि पराठे खात नाहीत तर साधे फुलके, सौम्य भाजीबरोबर खातात. म्हणूनच बहुधा त्यांचा स्वभाव इतका शांत आहे.

बाह्य दुवे