"विष्णु नरहरी खोडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ४६: ओळ ४६:
==संदर्भ ==
==संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

{{DEFAULTSORT:खोडके, विष्णु नरहरी}}
[[वर्ग:भारतीय वकील]]
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:इ.स. १९०० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:महाड]]

२२:२७, ४ ऑगस्ट २०२० ची आवृत्ती

विष्णु नरहरी खोडके (२ मार्च १९०० – १९५९) हे भारतीय वकील व राजकारणी होते. ते ब्रिटिश राजवटीच्या काळातील महाड शहर व कुलाबा जिल्हा (आजचा रायगड जिल्हा) परिसरातले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांनी महाडच्या राजकिय, वकिली व सामाजिक क्षेत्रांत योगदान दिले आहे. त्यांना खोडके वकिल म्हणूनही ओळखत जाते.

खोडके हे महाड नगरपालिकेचे अध्यक्षपदी इ.स. १९३१-१९४७ या कालावधित कार्यरत होते.

प्रारंभिक जीवन व शिक्षण

खोडके यांचा जन्म इ.स. २ मार्च १९०० रोजी कुलाबा जिल्यातील (आजचा रायगड) महाड येथे झाला. त्यांचे वडील नरहरी तात्याबा खोडके हे महाड मधील ड्रायफ्रूट्स व मसाले व्यापारी होते.

खोडके यांचे प्राथमिक शिक्षण महाड मधे झाले. जॉन एल्फिन्स्टन हायस्कुल, अलिबाग मधून ते मॅट्रिक झाले. उच्च शिक्षणासाठी मुंबईला जाऊन विल्सन कॉलेज, मधून १९२१ मधे त्यांनी बी.ए.(ऑनर्स) पदवी मिळवली. गवर्नमेंट लॉ स्कूल, मुंबई येथुन १९२४ मधे एल.एल.बी. पदवी प्राप्त केली.[१]

इसवी सन १९२६च्या "बॉम्बे युनिवर्सिटी कॅलेंडर" या पुस्तकात बुद्धिमान विद्यार्थी म्हणुन खोडके यांचा उल्लेख केला गेला होता.[२]

कारकिर्द

अॅड.खोडके यांनी १९२६ पासुन महाड़ न्यायालय व कुलाबा जिल्हा न्यायालय ,अलिबाग मध्ये वकिल म्हणुन कारकिर्द सुरू केली.आपल्या हुशारिने काहि अवघड केसेस जिंकुन थोड्याच अवधित ते महाड कुलाबा परिसरातले अव्वल वकिल बनले.कोर्टात न्यायाधिशांसमोर खटल्याचे मुद्देसुद सादरिकरण व धाडसी वक्तृत्व शैली हि अॅड. खोडके यांची वैशिष्ट्ये होती.

१९२९ मधे एक बहुचर्चित खटला जिंकणे त्यांच्या कारकिर्दितील मैलाचा दगड ठरला.अॅड. खोडके यांनी जंजिरा संस्थानचे नवाब मोहम्मद खान (दुसरे) यांच्या विरुद्ध एका गरिब शेतकर्याच्या बाजुने खटला जिंकला होता.

याच दरम्यान त्यांनी कॉंग्रेस मधे प्रवेश केला.वकिली क्षेत्रात दबदबा व महाडच्या राजकिय क्षेत्रात प्रभावी कामगिरी यामुळे १९३१ मधे त्यांना महाड कॉंग्रेस कमिटी चे प्रेसिडेंट म्हणुन निवडले गेले.[३]

त्यांच्या नेतृत्वाखाली १९३१ च्या नगरपालिका निवडणुकांत कॉंग्रेसला बहुमत मिळाले व अॅड. खोडके यांना महाड नगरपालिकेचे प्रेसिडेंट म्हणुन निवडले गेलेे.त्यांनी हे पद १९४७ पर्यंत भुषविले.[४]

हि दोन्ही पदे भुषविताना खोडके वकिल यांनी कॉंग्रेस ची धोरणे व स्वातंत्र्य आंदोलने महाड मधे यशस्वी पणे राबविली.

अॅड. खोडके हे क्षत्रिय नामदेव शिंपी समाजात जन्मले होते.सदर समाजाच्या नामदेव शिंपी समाज संस्थाचे प्रेसिडेंट पदी त्यांना निवडण्यात आले होते.हे पद भूषविताना त्यांनी सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले.[५]

अॅड. खोडके यांना महाडच्या विकासाचे आद्यपुरूष मानले जाते.महाडमधे त्यांनी जल पुरवठा योजना,नविन रस्ते,वीज यांसारख्या मूलभूत सुधारणा करुन महाडकरां साठी इतरहि उपयोगी योजना राबविल्या व महाड शहराच्या विकासाला प्रथमच चालना मिळवुन दिली.

एक ख्यातनाम वकिल,महाड़ नगरपालिकेचे प्रेसिडेंट,महाड़ कॉंग्रेस कमिटी चे प्रेसिडेंट, नामदेव शिंपी समाज संस्थेचे प्रेसिडेंट हि पदे भूषविताना त्यांनी राजकिय,वकिली व सामाजिक क्षेत्रांत केलेल्या अष्टपैलू कार्यामुळे, अॅड. खोडके यांचे नाव ब्रिटिशां कडुन १९४१ सालच्या"हूज हू इन इंडिया,बर्मा एंंड सिलोन" (Who's Who in India Burma and Ceylon-1941) या पुस्तकात सामिल केले गेले.[६] "हूज हू" हि जगभरातील उल्लेखनीय व्यक्तींची माहिती प्रकाशित करणारी पुस्तक श्रृंखला आहे.

अॅड. खोडके यांनी दोन मराठी पुस्तके लिहिली होती.१) शिक्षण : आधुनिक भारतीयांची मूलभूत गरज व २) रायगडास भेेंट.[७][८]

महाड कॉंग्रेस कमिटी व महाड़ नगरपालिकेचे प्रेसिडेंट असल्याने महात्मा गांधीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. १९२७ च्या चवदार तळे सत्याग्रहामनुस्मृती दहन यानंतर डॉ. आंबेडकर महाड मध्ये येत असत,महाड हे त्यांच्या दलितांसाठीच्या आंदोलनांचे केंद्र बनले होते. १९ मार्च १९४० रोजी अॅड. खोडके यांनी महाड नगरपालिकेचे प्रेसिडेंट म्हणुन डॉ. आंबेडकर यांच्या सन्मानार्थ जाहिर कार्यक्रम आयोजित करून डॉ. आंबेडकर याना "मानपत्र" देऊन गौरविले होते.डॉ. आंबेडकर यांनी उत्तरादाखल एक भाषण केले.[९]अॅड. खोडके यानी दिलेले हे मानपत्र व डॉ आंबेडकर यांचे भाषण भारत सरकार कडुन प्रकाशित " डॉ आंबेडकर यांचे लेखन व भाषणे "खंड १८,भाग २ या पुस्तकात सामिल केले गेले.

वैयक्तिक जीवन व कौटुंबिक माहिती

अॅड. खोडके यांचे कुटुंब एक व्यापारी व जमिनदार कुटुंब होते, ई. स. १५५० मधे सदाशिव राव खोडके हे व्यापारासाठी पैठण येथुन महाडमधे स्थाईक झाले,तेंव्हा महाड हे कोकणातील एक प्रमुख बंदर व व्यापारी केंद्र होते.पोर्तुगीज,इंग्रज,अरब,तुर्कि इ.विदेशी व्यापारी कोकणात येत असत.त्यांच्यासोबत खोडके कुटुंबाचा ड्रायफ्रूट्स,मसाले व कापड यांचा व्यापार चालें. अॅड. खोडके यांचे वडिल नरहरी तात्याबा खोडके हे महाड मध्ये परंपरागत सुकामेवा व मसाल्याचा व्यापार करत असत.ते ज्योतिषी होते.त्यांनी स्वत: च्या मृत्यु ची वेळ अचुक वर्तवली होती ती ५ मिनिटांच्या फरकाने खरी निघाली. अॅड. खोडके यांचा विवाह सुंदराबाई खोडके यांच्याशी १९३४ मधे झाला.त्याना मुलगा शशिकुमार व दोन मुली, सुलोचना खांडके व रत्नप्रभा अंबटकर.खोडके वकिलांच्या अष्टपैलूत्वाचा वारसा त्यांचे वारस सुद्धा चालवत आहेत,मुलगा शशिकुमार खोडके हे मॅनेजर,स्टेट बैंक ऑफ इंडिया,व गुंतवणुकदार आहेत.त्यानी अहवेदांतम् पतसंस्था ची स्थापना केली.त्याचे ते चेयरमन होय.पत्नी सौ.रत्नप्रभा खोडके (बेबीताई) या महाड मधील राजकिय व सामाजिक नेत्या होत्या.मुलगा अभय कुमार खोडके हे शशिकुमार इंडस्ट्रीज चे मालक व गायक-अभिनेता आहेत,व मुलगी सौ.अपर्णा मानकर या फुड व कॉस्मेटिक उत्पादन करणार्या रेडरोवा ग्रुप च्या मालक आहेत.तिचा मुलगा प्रित मानकर मॉडल व गायक आहे.पती प्रशांत मानकर हे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी चे मालक आहेत.

उत्तरार्ध

अॅड. खोडके यानी १९५७ मध्ये प्रकृती अस्वास्थ्य मुळे वकिली करणे बंद केले.दिनांक ४ मार्च १९५९ रोजी त्यांचा मृत्यु झाला.त्यांच्या सन्मानार्थ चवदार तळ्याजवळिल एका रस्त्याला "अॅड. व्हि.एन. खोडके मार्ग" असे नाव देण्यात आले.

अॅड.खोडके यांच्या सन्मानार्थ त्यांची नातवंडे अभय कुमार व सौ.अपर्णा यांच्या " सौ.रत्नप्रभा खोडके युनिवर्सिटीज " या शैक्षणिक संस्थेतर्फे महाड येथे "अॅड.व्हि.एन. खोडके कॉलेज अॉफ लॉ" या महाविद्यालयाची योजना प्रस्तावित आहे.

संदर्भ

  1. ^ Who's who in India, Burma & Ceylon (इंग्रजी भाषेत). Who's Who Publishers (India) Limited. 1941.
  2. ^ Bombay, University of (1926). The Bombay University Calendar (इंग्रजी भाषेत).
  3. ^ Who's who in India, Burma & Ceylon (इंग्रजी भाषेत). Who's Who Publishers (India) Limited. 1941.
  4. ^ Who's who in India, Burma & Ceylon (इंग्रजी भाषेत). Who's Who Publishers (India) Limited. 1941.
  5. ^ Who's who in India, Burma & Ceylon (इंग्रजी भाषेत). Who's Who Publishers (India) Limited. 1941.
  6. ^ Who's who in India, Burma & Ceylon (इंग्रजी भाषेत). Who's Who Publishers (India) Limited. 1941.
  7. ^ Ganesh, Shankar (1976). Marathi niyatakalikanci suchi. Mumbai Marathi Granthsangrhalaya.
  8. ^ Ganesh, Shankar (1978). Marathi niyatakalikanci suci. Marathi Granthalaya.
  9. ^ Ambedkar, Bhimrao Ramji (2010). Dr. Babasaheb Ambedkar, Writings and Speeches: (3 pts.). Ḍô. Bābāsāheba Āmbēdakara lekhana āṇi bhāshaṇe. Education Department, Government of Maharashtra.