"शीतल साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३८: ओळ ३८:

== अटक ==
== अटक ==
महाराष्ट्र सरकारने शीतल साठे व सचिन माळी यांच्यावर नक्षलवादी असल्याचे आरोप लावले होते. चार वर्षे एटीएस त्यांच्या मागावर होते. अखेर २ एप्रिल २०१३ दोघांनीही विधानभवन परिसरात आत्मसमर्पण केले आणि त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली.
महाराष्ट्र सरकारने शीतल साठे व सचिन माळी यांच्यावर नक्षलवादी असल्याचे आरोप लावले होते. अनेक वर्षे एटीएस त्यांच्या मागावर होते. अखेर २ एप्रिल २०१३ दोघांनीही विधानभवन परिसरात आत्मसमर्पण केले आणि त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. गिरीश कर्नाड, रत्ना पाठक, प्रकाश रेड्डी, भालचंद्र कांगो यांचा दोघांनाही पाठिंबा दिला होता.

मे २०११ मध्ये महाराष्ट्र एटीस ने तथाकथित नक्षलवादाचे समर्थन करण्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या खटल्यामुळे शीतल साठे व त्यांचे पती सचिन माळी आणि त्यांच्या कबीर कला मंचाच्या इतर १५ सहकाऱ्यांना भूमिगत व्हावे लागले होते.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/mumbai-news/sheetal-sathe-sachin-mali-naxalit-only-102653/|title=शीतल साठे, सचिन माळी नक्षलवादीच!|date=2013-04-22|work=Loksatta|access-date=2018-05-29|language=mr-IN}}</ref> याशिवाय या दोघांसह इतर सहकाऱ्यांवर असंवैधानिक गतिविधी निवारण अधिनियमाच्या अनेक इतर कलमांनुसार आरोप सुद्धा लावले गेले होते. शीतल व सचिन दोघे स्वतःहून २ एप्रिल २०१३ रोजी मुंबई येथे पोलिसांना शरण गेली, पण त्यांच्यावरील आरोप त्यांनी मान्य करण्यास नाकारले.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/mumbai-news/shital-sathe-and-sachin-mali-surrender-92248/|title=शीतल साठे आणि सचिन माळी पोलिसांना शरण|date=2013-04-03|work=Loksatta|access-date=2018-05-29|language=mr-IN}}</ref>

ओळ ४४: ओळ ४४:
शीतल गर्भवती असूनसुद्धा, ४ जून २०१३ रोजी मुंबई सेक्शन न्यायालयाने त्या दोघांचीही जामीनाची विनंती फेटाळली. शेवटी २८ जून २०१३ रोजी बाँबे हायकोर्टद्वारे शीतलला मानवी आधारावर जामीन देण्यात आला.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/mumbai-news/hc-grants-bail-to-naxal-sympathiser-sheetal-sathe-139775/|title=शीतल साठे यांना जामीन मंजूर|date=2013-06-27|work=Loksatta|access-date=2018-05-29|language=mr-IN}}</ref>

== संदर्भ ==
{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भयादी}}

== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

००:०७, १५ जून २०२० ची आवृत्ती

शीतल साठे
जन्म: ५ मार्च, १९८६ (1986-03-05) (वय: ३८)
कासेवाडी वस्ती, पुणे, महाराष्ट्र
चळवळ: आंबेडकरी चळवळ
संघटना: कबीर कला मंच
नवयान महाजलसा
धर्म: नवयान बौद्ध धर्म
प्रभाव: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे
वडील: हनुमंत साठे
आई: संध्या साठे
पती: सचिन माळी
अपत्ये: अभंग

शीतल साठे (जन्म: ५ मार्च १९८६) या एक मराठी लोकगीत गायिका, शाहीर, कवयित्री आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या इ.स. २०००च्या सुमारास महाराष्ट्रातील कबीर कला मंच ह्या कलापथकाच्या त्या एक मुख्य कलाकार होत्या. दलित, वंचित, शोषितांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न शाहिरीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून लोकांसमोर मांडत असतात. भांडवलदारांविरोधात त्या आवाज उठवतात.

साठे आणि त्यांचे तरूण साथीदार विद्रोही शाहीर जलसा प्रकारची गीते गातात. त्यात बिहारच्या मजूरांची, पंजाबच्या शेतकऱ्यांची तसेच देशातल्या अनेक वंचित समाजाचे प्रश्न उद्धृत केले जातात. त्यांच्या म्हणण्यानुसार, देशात व जगात पसरलेली असमानता आणि शोषणाला नष्ट करण्यासाठी जनतेला जागे करण्यासाठी त्या गीत गायन करतात.

सुरुवातीचे जीवन व शिक्षण

पुणे शहरातील कासेवाडी नावाच्या एका दलित वस्तीत साठेंचा जन्म झाला. फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी समाजशास्त्रात एम.ए केले आहे. ९ मे २००५ रोजी त्यांचा विवाह सचिन माळी यांच्याशी झाला.

गायन

शीतल साठेंनी आपले शिक्षण पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयातून केले परंतु महाविद्यालयात जाण्यापूर्वीच त्यांनी गायन सुरू केले होते. या दरम्यान सचिन माळी आणि कबीर कला मंचाच्या कलावंतांच्या संपर्कात आल्या. सुरूवातील त्यांना वैचारिक गोष्टींत आकर्षण नव्हते. शीतल साठे केवळ गायनाच्या जगातच काही करू इच्छित होत्या. सचिन माळी आणि कबीर कला मंचाच्या सहकार्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात मोठे योगदान दिले."

जयभीम कॉम्रेड

आनंद पटवर्धन यांनी तयार केलेल्या जयभीम कॉम्रेड या डॉक्युमेंट्रीमध्येही शीतल साठे व त्यांचे पती सचिन माळी या दोघांच्या कार्याचा गौरव केला आहे. या डॉक्युमेंट्रीमुळे शीतल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. या डॉक्युमेंट्रीला राज्य सरकारचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही पुरस्कार मिळाले होते. पुरस्कारांच्या रकमेतून ‘कबीर कला मंच डिफेन्स कमेटी’ स्थापन केली गेली होती.

अटक

महाराष्ट्र सरकारने शीतल साठे व सचिन माळी यांच्यावर नक्षलवादी असल्याचे आरोप लावले होते. अनेक वर्षे एटीएस त्यांच्या मागावर होते. अखेर २ एप्रिल २०१३ दोघांनीही विधानभवन परिसरात आत्मसमर्पण केले आणि त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. गिरीश कर्नाड, रत्ना पाठक, प्रकाश रेड्डी, भालचंद्र कांगो यांचा दोघांनाही पाठिंबा दिला होता.

मे २०११ मध्ये महाराष्ट्र एटीस ने तथाकथित नक्षलवादाचे समर्थन करण्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या खटल्यामुळे शीतल साठे व त्यांचे पती सचिन माळी आणि त्यांच्या कबीर कला मंचाच्या इतर १५ सहकाऱ्यांना भूमिगत व्हावे लागले होते.[१] याशिवाय या दोघांसह इतर सहकाऱ्यांवर असंवैधानिक गतिविधी निवारण अधिनियमाच्या अनेक इतर कलमांनुसार आरोप सुद्धा लावले गेले होते. शीतल व सचिन दोघे स्वतःहून २ एप्रिल २०१३ रोजी मुंबई येथे पोलिसांना शरण गेली, पण त्यांच्यावरील आरोप त्यांनी मान्य करण्यास नाकारले.[२]

शीतल गर्भवती असूनसुद्धा, ४ जून २०१३ रोजी मुंबई सेक्शन न्यायालयाने त्या दोघांचीही जामीनाची विनंती फेटाळली. शेवटी २८ जून २०१३ रोजी बाँबे हायकोर्टद्वारे शीतलला मानवी आधारावर जामीन देण्यात आला.[३]

संदर्भ

  1. ^ "शीतल साठे, सचिन माळी नक्षलवादीच!". Loksatta. 2013-04-22. 2018-05-29 रोजी पाहिले.
  2. ^ "शीतल साठे आणि सचिन माळी पोलिसांना शरण". Loksatta. 2013-04-03. 2018-05-29 रोजी पाहिले.
  3. ^ "शीतल साठे यांना जामीन मंजूर". Loksatta. 2013-06-27. 2018-05-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे