Jump to content

"सदानंद फुलझेले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २७: ओळ २७:
https://m.lokmat.com/nagpur/sadanan-fulzele-merged-infinite-funeral-bereavement/
https://m.lokmat.com/nagpur/sadanan-fulzele-merged-infinite-funeral-bereavement/


ऑगस्ट १९५६ सालची ती गोष्ट. एक तरूण कार्यकर्ता दिल्लीला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भेटला. लाखो अनुयायी येतील. बुद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत. पोरा, होईल का व्यवस्था? असा थेट प्रश्न त्या तरूणाला विचारण्यात आला. समोरून उत्तर आले....‘होय बाबा’ या दोन शब्दाने बाबासाहेबांना जिंकले आणि दीक्षाभूमीवर ऐतिहासिक अशा १४ ऑक्टोबर, १९५६ चा दीक्षासोहळा मोठया दिमाखात पार पडला.’ दिवंगत सदानंद फुलझेले हाच तो तरूण. मनपाचा २८ वर्षाचा तरूण उपमहापौर. या सोहळयाची कायम आठवण करून देणारे कोटयवधी बौद्धजण फुलझेले यांना कायम स्मरणात ठेवतील.
ऑगस्ट १९५६ सालची ती गोष्ट. एक तरूण कार्यकर्ता दिल्लीला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भेटला. लाखो अनुयायी येतील. बुद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत. पोरा, होईल का व्यवस्था? असा थेट प्रश्न त्या तरूणाला विचारण्यात आला. समोरून उत्तर आले....‘होय बाबा’ या दोन शब्दाने बाबासाहेबांना जिंकले आणि दीक्षाभूमीवर ऐतिहासिक अशा १४ ऑक्टोबर, १९५६ चा दीक्षासोहळा मोठया दिमाखात पार पडला.’ दिवंगत सदानंद फुलझेले हाच तो तरूण. मनपाचा २८ वर्षाचा तरूण उपमहापौर. या सोहळयाची कायम आठवण करून देणारे कोटयवधी बौद्धजण फुलझेले यांना कायम स्मरणात ठेवतील. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/dr-babasaheb-ambedkar-won-by-one-sentence-sadanand-fulzele-dead/articleshow/74650328.cms

२२:३७, ३० मार्च २०२० ची आवृत्ती

पवित्र दीक्षाभूमीच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे कार्यवाह सदानंद फुलझेले यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. फुलझेले यांचे सुपूत्र अशोक, आनंद आणि सुधीर यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या लाखो बांधवांसह धम्मदीक्षा घेतली. या सोहळ्याप्रसंगी उपमहापौर असताना सदानंद फुलझेले यांनी कार्यकर्त्याची भूमिका निभावली. ते केवळ धम्मक्रांती सोहळ्याचे साक्षीदार नव्हते, तर या सोहळ्याच्या आयोजनातील सक्रिय कार्यकर्ते होते. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/last-message-to-sadanand-fulzale/articleshow/74661377.cms

जगाच्या इतिहासातील एकमेव रक्तविहीन क्रांती म्हणून ज्या घटनेचा उल्लेख केला जातो, ती घटना म्हणजे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५ लाख समाजबांधवांसोबत नागपुरात घेतलेली बौद्ध धम्माची दीक्षा होय. सम्यक क्रांतीचा हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करण्यासाठी अनेक हात अविरत काम करत होते. यात अग्रभागी होते नागपूर शहराचे तत्कालीन उपमहापौर सदानंद फुलझेले. या बौद्ध धम्म क्रांतीपासून आजवरच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले फुलझेले १६ मार्च रोजी निवर्तले. सदानंद फुलझेले हे जणू नागपुरातील आंबेडकरी चळवळीचे दुसरे नाव होते. त्यांचा नि बाबासाहेबांचा संबंध १९४२ मध्ये आला. तो चळवळीचा मंतरलेला काळ होता. शेडय़ुल्ड कास्ट्स फेडरेशनची स्थापना झाली होती. या संघटनेचे अधिवेशन नागपूरला झाले, तेव्हा डॉ. आंबेडकर यांना जवळून पाहण्याची संधी फुलझेले यांना मिळाली. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२८चा. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना समता सैनिक दल व शेडय़ुल कास्ट फेडरेशन तसेच सामाजिक चळवळीत व राजकीय क्षेत्रात त्यांनी काम सुरू केले. १९५२ मध्ये रामदासपेठ वॉर्डातून महापालिकेची निवडणूक लढवून ते विजयी झाले. १९५६ मध्ये उपमहापौर म्हणून त्यांनी काम केले. ३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेवेळी सदानंद फुलझेले पदाधिकारी होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर बाबासाहेबांचा पूर्ण विश्वास होता. म्हणूनच रिपब्लिकन पक्षात प्रदेश अध्यक्ष आणि त्यानंतर राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. १९६३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सचिवपदी त्यांची निवड झाली. तहहयात त्यांनी दीक्षाभूमीसाठी स्वत:ला वाहून घेतले होते. बाबासाहेबांचा वैचारिक वारसा पुढच्या पिढीला सोपवायचा असेल तर शोषित, वंचितांसाठी शिक्षणाची दारे उघडायला हवी, हे ते चांगले जाणून होते. यातून पुढे त्यांनी दीक्षाभूमी परिसरात डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय सुरू केले. फुलझेले यांनी श्रीलंका, टोकियो, बुडापेस्ट हंगेरी, रशिया, बँकॉक, सिंगापूर, द. कोरिया, नेपाळ, अमेरिका, व्हिएतनाम, कंबोडिया, आदी देशांना भेटी देत आंबेडकरी विचारांचा आवाज बुलंद केला. विदर्भ विकास महामंडळावर संचालक म्हणून पाच वर्षे कार्य केले. नागपूर विद्यापीठाच्या सिनेट परिषदेवर ते नामनियुक्त सदस्य होते. या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्य शासनाचा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार, सारथी संस्थेचा विदर्भरत्न पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या जाण्याने शोषित, वंचितांच्या चळवळीचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे. https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/sadanand-fulzele-vyaktivedh-dd70-2114234/

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरांच्या धर्मांतर सोहळ्याची जबाबदारी सांभाळणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांचं आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्यामागे मुलगा अॅड. आनंद, डॉ. सुधीर आणि सूना-नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा मुलगा दक्षिण आफ्रिकेत असल्याने सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सदानंद फुलझेले हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. आज सकाळी ९.३० वाजता धरमपेठ येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. फुलझेले यांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. फुलझेले नागपूरचे उपमहापौर होते. तसेच रामदासपढ वॉर्डाचे नगरसेवकही होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराच्या धम्मदीक्षा सोहळ्याचे ते आयोजक होते. तसचे दीक्षाभूमी स्मारक समितीचे ते सचिव होते.

बाबासाहेबांच्या सच्चा अनुयायास मुकलो: मुख्यमंत्री

फुलझेले यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांच्या निधनाने दीक्षाभूमीसाठी आपले आयुष्य समर्पित केलेल्या आंबेडकरी चळवळीतील एका सच्च्या अनुयायास आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

बाबासाहेबांच्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळयाची संपूर्ण जबाबदारी सांभाळलेले सदानंद फुलझेले हे त्या काळातल्या सगळ्या क्षणांचे साक्षीदार तर होतेच पण त्यांनी बाबासाहेबांसारख्या महान व्यक्तिमत्वाला साथ दिली, त्यांच्यासमवेत उभे राहिले. आयुष्याच्या शेवटपर्यंत फुलझेले यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कामात स्वत:ला झोकून दिले आणि आपल्या कार्याचा ठसा उमटविला, असं मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. आज दीक्षाभूमी येथे डॉ बाबासाहेबांचे चिरंतन भव्य स्मारक उभे आहे त्यामागे दादासाहेब गायकवाड, दादासाहेब गवई यांचे सोबत सदानंद फुलझेले यांचे नाव आवर्जून घेतलेच पाहिजे. समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांनी भरपूर शिकावे म्हणून त्यांनी केलेले भरीव कार्य निश्चितच स्मरणात राहील. सदानंद फुलझेले यांच्या रुपाने आंबेडकरी चळवळीतला एक मोठा दुवा आता आपल्यातून गेला आहे मात्र त्यांच्या कार्याचे विस्मरण होऊ न देणे हीच खरी श्रद्धांजली राहील अशा शोक भावना त्यांनी व्यक्त केल्या. https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/ambedkarite-activist-sadanand-fulzele-dies-due-old-age/articleshow/74635436.cms

सदानंद फुलझेले यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1928 रोजी नागपुरातील धरमपेठ भागात झाला. त्याना आंबेडकरी चळवळीचे बाळकडू कुटुंबातूच मिळाले. 1942 साली शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या स्थापनेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूरला आले होते, त्यावेळी फुलझेले यांनी पहिल्यांदा बाबासाहेबांना पाहिले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी समता सैनिक दल व शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली.

1952 साली त्यांनी धरमपेठच्या डॉ. आंबेडकर नगरातून महानगरपालिकेची निवडणूक लढविली व जिंकली. त्यानंतर 1956 साली त्यांची नागपूरच्या उपमहापौरपदी निवड झाली. दरम्यान, त्यांची दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली. त्यानंतर 14 ऑक्‍टोबर 1956 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या भूमीत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी फुलझेले यांनी सांभाळली होती. त्यानंतर दीक्षाभूमीच्या निर्माणकार्यात फुलझेले यांची मोलाची भूमिका होती. 1963 साली त्यांची दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सचिवपदी निवड झाली. तेव्हापासून ते या पदावर कार्यरत होते. https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/sadanand-fulzale-passed-away-270616

आंबेडकरांनी ऐतिहासिक दीक्षा सोहळ्याच्या तयारीची जबाबदारी पोरसवदा सदानंद फुलझेले यांच्यावर टाकली होती. फुलझेले त्या वेळी नागपूर महापालिकेचे उपमहापौर होते. नव्वदीपार केलेले फुलझेले ही आठवण सांगताना एकदम टाइम मशीनमध्ये बसल्यासारखे त्या काळात जाऊन आठवण सांगत. त्यांच्या जाण्याने अशा असंख्य आठवणी आता पोरक्या झाल्या आहे. २०१९ च्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या वेळी त्यांनी “दिव्य मराठी’ला सांगितलेली आठवण त्यांच्याच शब्दांत... “आपले नागपूरचेच आर. जे. मून आॅल इंडिया रेडिओला सेक्शन आॅफिसर होते. त्यांना घेऊन मी बाबासाहेबांकडे दुसऱ्या दिवशी सायंकाळी त्यांच्या २६, अलिपूर रोड येथील बंगल्यावर पोहोचलो. तिथे दिल्लीचे सोहनलाला शास्त्री, शंकरलाला शास्त्री व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. काही वेळातच बाबासाहेब हातात काठी घेऊन नानकचंद रत्तू यांच्या खांद्यावर हात ठेवून बाहेर आले. आमच्यासमोरच ठेवलेल्या आरामखुर्चीत येऊन बसले. आर. एस. मून यांनी माझी अोळख बाबासाहेबांशी करून दिली. बाबासाहेबांनी पहिलाच प्रश्न विचारला, “काय रे पोरा, रेवाराम कवाडे आणि गोडबोले आले होते. त्यांनी १४ आॅक्टोबर ही दीक्षा समारंभाकरिता तारीख घेतली आहे. समारंभाची व्यवस्था होईल काय?’ तसे तर मी बाबासाहेबांना अनेक वेळा पाहिले होते. पण, बाबासाहेबांचा तो धीरोदात्त चेहरा, समोरासमोर बसून चर्चा करण्याचा पहिलाच प्रसंग होता. मी एकदम भारावून गेलो. तोंडातून एकच शब्द निघाला, ‘होय बाबा!’ https://divyamarathi.bhaskar.com/news/dr-babasahet-ambedkars-colleague-sadanand-fulzele-passed-away-126984574.html

१४ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपुरातील ज्या पवित्र दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन ऐतिहासिक धम्मदीक्षा घडविली. त्या दीक्षा समारंभाची संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी सदानंद फुलझेले यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यावेळेस ते नागपूरचे उपमहापौर होते. त्या पहिल्या ऐतिहासिक सोहळ्यापासून ते स्मारक समितीचे कार्यवाह म्हणून दीक्षाभूमीवरील संपूर्ण जबाबदारी ते सक्षमतेने पार पाडत होते. त्यामुळेच दीक्षाभूमीचे ते खऱ्या अर्थाने आधारस्तंभ होते. १ नोव्हेंबर १९२८ रोजी एका श्रीमंत, सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबात धरमपेठ येथे त्यांचा जन्म झाला. वडील श्रीमंत मालगुजार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे बाळकडू त्यांना लहानपणापासून कुटुंबातूनच मिळाले. १९४२ साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना झाली. नागपूरला अधिवेशन झाले, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळाली. १९४६ साली न्यू इंग्लिश हायस्कूल सीताबर्डी नागपूर येथून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केल्यावर प्रथम मॉरिस कॉलेज आणि नंतर नॅशनल कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन ते बी.ए. झाले. https://m.lokmat.com/nagpur/base-initiation-collapsed-sadanand-fulzale-passed-away/


https://m.lokmat.com/nagpur/sadanan-fulzele-merged-infinite-funeral-bereavement/

ऑगस्ट १९५६ सालची ती गोष्ट. एक तरूण कार्यकर्ता दिल्लीला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भेटला. लाखो अनुयायी येतील. बुद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत. पोरा, होईल का व्यवस्था? असा थेट प्रश्न त्या तरूणाला विचारण्यात आला. समोरून उत्तर आले....‘होय बाबा’ या दोन शब्दाने बाबासाहेबांना जिंकले आणि दीक्षाभूमीवर ऐतिहासिक अशा १४ ऑक्टोबर, १९५६ चा दीक्षासोहळा मोठया दिमाखात पार पडला.’ दिवंगत सदानंद फुलझेले हाच तो तरूण. मनपाचा २८ वर्षाचा तरूण उपमहापौर. या सोहळयाची कायम आठवण करून देणारे कोटयवधी बौद्धजण फुलझेले यांना कायम स्मरणात ठेवतील. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/dr-babasaheb-ambedkar-won-by-one-sentence-sadanand-fulzele-dead/articleshow/74650328.cms