"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

१३:१७, ७ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

इ.स. १९१९ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलित-मुक्तीच्या चळवळीला सुरुवात झाली. इ.स. १९२० साली 'मूकनायक' हे वृत्तपत्र सुरू केले तेव्हा ते दलित जनतेचे पुढारी म्हणून ओळखले जाऊ लागले होते. दलित-मुक्तीच्या या चळवळीत डॉ. आंबेडकरांना अनेक सहकारी लाभले. या सहकाऱ्यांत सवर्णदेखील होते. या सर्व सहकाऱ्यांचे या चळवळीतले योगदान महत्त्वाचे आहे. मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत या नियतकालिकांच्या संपादन - प्रकाशनाच्या संदर्भात; बहिष्कृत हितकारिणी सभा, समाज समता संघ, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, स्वतंत्र्य मजूर पक्ष, शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन या संघनांच्या उभारणीत; महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह; नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह, अशा तऱ्हेच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत डॉ. आंबेडकरांचे हे सहकारी सहभागी झाले होते. ते केवळ महाराष्ट्रातील होते असे नाही, तर भारताच्या वेगवेगळ्या भागांत ते विखुरलेले होते. त्यांच्या सहकार्यामुळे, विविध संघटनांतील त्यांच्या कार्यामुळे आंबेडकरी चळवळ देशभर पसरली, अशा अनेक सहकाऱ्यांपैकी काहींची नावे खाली दिलेली आहेत.[१]

  • संभाजी तुकाराम गायकवाड (१८६४-१९४९)
  • सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर (१८८९-१९३९)
  • सुरेंद्रनाथ गोविंदराव टिरणीस (१८८९-१९७८)
  • वळवंत हणमंतराव वराळे (१९०१-१९७७)
  • शांताराम अनाजी अपशाम (१९००-१९७५)
  • कमलाकांत वासुदेव चित्रे (१८९४-१९५७)
  • बापूसाहेब गंगाधर नीळकंठ सहस्त्रबुद्धे (अज्ञात - १९५८)
  • देवराव विष्णू नाईक (१८९४-१९८२)
  • अनंत विनायक चित्रे (१८९४-१९५९)
  • मडकेबुवा गणपत महादेव जाधव (१८८५-१९४८)
  • प्रभाकर जनार्दन रोहम (१९०७-१९९०)
  • भास्कर रघुनाथ कद्रेकर (१९०२-१९७५)
  • शंकर सायन्ना परशा (१८८१-१९३९)
  • मोरेश्वर वासुदेव दोंदे (१८९४-१९६२)
  • मनोहर भिकाजी चिटणीस (१९०७-१९८३)
  • रावबहादूर एन. शिवराज (१८९२-१९६४)
  • कर्मवीर दादासाहेब गायकवाड (१९०२-१९७१)
  • राजाराम रामजी भोळे (१९११-१९९३)
  • जोगेंद्र नाथ मंडल (१९०४-१९६८)
  • पांडुरंग नाथूनी राजभोज (१९०५-१८८४)
  • सीताराम नामदेव शिवतरकर (१८९१-१९६६)
  • बापू चंद्रसेन कांबळे (१९१९-२००६)
  • रामचंद्र धोंडिबा भंडारे (१९१६-१९८८)
  • घन:श्याम कृष्णाजी भिकाजी तळवटकर (१९२२-२००२)
  • अमृतराव धोांडिबा रणखांबे (१८९९-१९७६)
  • भाऊराव देवजी खोब्रागडे (१८२५-१९८४)
  • रामचंद्र बाबाजी मोरे (१९०३-१९७२)

संदर्भ

  1. ^ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दादासाहेब गायकवाडांना पत्रे, संपादक - वामन निंबाळकर