Jump to content

"सुजात आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ७: ओळ ७:
मागील दोन वर्षे त्यांनी अनेक राष्ट्रीय दैनिक आणि वेबसाईट्समध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केले. ते उत्तम ड्रमरसुद्धा आहेत. भविष्यात संगीताच्या माध्यमातून त्यांना पॉलिटिकल स्टेटमेंट करणारा बँडही तयार करायचाय.<ref>https://m.youtube.com/watch?v=JEpEGBjs010</ref>

== राजकीय कारकीर्द ==
==संदर्भ==
२७ मे २०१८ रोजी आझाद मैदानावर सुजात आंबेडकर यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेशी खुला संवाद साधला. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. या एल्गार मार्चच्या निमित्ताने आंबेडकर घराण्याची चौथी पिढी सामाजिक संगरात उतरली.

एल्गार मार्चमध्ये सुजात यांचे दोन मिनिटांचे भाषण होते. पण, ते चमकदार अन् प्रभावी ठरले. त्यांनी शुद्ध भाषेत आणि नम्रतेने भाषण केले. सुजात म्हणाले, "वर्षातल्या दोन गोष्टी घ्या. एक कोरेगाव भीमाची आणि दुसरी टाटा इन्स्टिट्यूटमधील शिष्यवृत्ती बंदची. या दोन्ही घटना तळातल्या समुदायाने व्यवस्थेला प्रश्न करू नयेत, यासाठी घडवल्या गेल्या आहेत. आपण सक्षम होऊ नये, असे षडयंत्र देशात रचले जात आहे’, असा गंभीर आरोप त्याने केला. मिलिंद एकबोटे यांना अटक झाली, तोच गुन्हा संभाजी भिडे यांनीसुद्धा केलाय. आम्ही सर्व पुरावे दिलेत. पण, दोन महिने २६ दिवस उलटूही भिडे यांची अटक जाणीवपूर्वक टाळली जात आहे, असा आरोप त्याने केला. ‘या राज्यात न्याय समान नाही. त्यामुळे आता हे सरकार बदललेच पाहिजे’," असे आवाहन त्याने उपस्थितांना केले. त्याच्या आवाहनाला उपस्थितांनी दादही दिली.   

== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

००:५७, १२ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

सुजात प्रकाश आंबेडकर (जन्म: १९९५) हे एक भारतीय कार्यकर्ता, पत्रकार व राजकारणी आहेत. ते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र व डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांचे पणतू आहेत. सध्या ते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. राज्यातील तरुण कार्यकर्त्यांचे नेटवर्कही ते हाताळत आहेत.[]

शिक्षण

सुजात आंबेडकर अवघ्या २४ वर्षांचे. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्रात पदवी घेतली. फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा केला.[]

पत्रकारिता

मागील दोन वर्षे त्यांनी अनेक राष्ट्रीय दैनिक आणि वेबसाईट्समध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केले. ते उत्तम ड्रमरसुद्धा आहेत. भविष्यात संगीताच्या माध्यमातून त्यांना पॉलिटिकल स्टेटमेंट करणारा बँडही तयार करायचाय.[]

राजकीय कारकीर्द

संदर्भ