"प्रतापसिंह हायस्कूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ९: ओळ ९:
शाळेला शंभर वर्षं पूर्ण झाली तेव्हा १९५१ साली या शाळेचे नामकरण श्री छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल असे करण्यात आले.
शाळेला शंभर वर्षं पूर्ण झाली तेव्हा १९५१ साली या शाळेचे नामकरण श्री छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल असे करण्यात आले.
==अवस्था==
==अवस्था==
जुन्या राजवाड्यात हे हायस्कूल सध्या जीर्ण झालेले आहेत. आता सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद या वास्तूची देखभाल व दुरुस्ती करीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्षांअगोदर ही शाळा धोकादायक असल्याचे म्हणत तीला इतर ठिकाणी हलवण्यासाठीचे पत्र सुद्धा दिले आहे.
जुन्या राजवाड्यात हे हायस्कूल सध्या जीर्ण झालेले आहेत. आता सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद या वास्तूची देखभाल व दुरुस्ती करीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्षांअगोदर ही शाळा धोकादायक असल्याचे म्हणत तीला इतर ठिकाणी हलवण्यासाठीचे पत्र सुद्धा दिले आहे. या जुन्या राजवाड्याची ऐतिहासिक वास्तू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

१३:४५, १० मे २०१८ ची आवृत्ती

श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूल (जूने नाव: गवर्नमेंट हायस्कूल) हे साताऱ्यातील ऐतिहासिक जुन्या राजवाड्यातील हे विद्यालय आहे. ही सातारा जिल्ह्यातील पहिली शाळा आहे. इ.स. १८७४ मध्ये ही शाळा गव्हर्नमेंट हायस्कूल म्हणून सुरु झाली. त्यावेळी ही इंग्रजी माध्यमाची शाळा होती. सध्या येथे ५वी ते १०वीपर्यंतचे वर्ग भरतात. २०१७ नुसार, शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या १२० इतकी आहे.

बाबासाहेब आंबेडकर, नरेंद्र दाभोलकर, न्यायाधीश गजेंद्र गडकर इ. मोठ्या व्यक्तींनी या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे.

इतिहास

पूर्वी ही शाळा राजवाडा परिसरातील एका वाड्यात भरवली जात होती. हा वाडा इ.स. १८२४ साली शिवाजी महाराज यांचे वारसदार प्रतापसिंह भोसले यांनी बांधला होता. त्याकाळी राजघराण्यातल्या मुलींना या वाड्यात शिक्षण दिले जायचे. इ.स. १९५१ साली या वाड्याला विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी ब्रिटिश शासनाच्या ताब्यात देण्यात आला. पूर्वी या शाळेचे नाव गव्हर्नमेंट हायस्कूल असे होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा शिक्षणासाठी या शाळेत आले होते. ७ नोव्हेंबर १९०० रोजी या सरकारी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. ही शाळा त्याकाळी १ली ते ४था वर्गांपर्यंत होती. डॉ. आंबेडकर या शाळेत चौथीपर्यंत शिकले. शाळेच्या रजिस्टर क्रमांक १९१४ मध्ये 'भिवा रामजी आंबेडकर' अशी नोंद आहे. ही शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेत प्रवेश घेतलेला ७ नोव्हेंबरचा दिवस अनेक वर्षापासून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन' म्हणून साजरा करत आहे. या दिवसाला महाराष्ट्र शासनाने २०१७ या वर्षापासून ‘विद्यार्थी दिन’ म्हणून राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शाळेला शंभर वर्षं पूर्ण झाली तेव्हा १९५१ साली या शाळेचे नामकरण श्री छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल असे करण्यात आले.

अवस्था