"मधुकर केशव ढवळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:कंधारजवळील मानसपुरी येथील उत्खनन स्थळ.JPG|right|thumb|250px|डॉ. ढवळीकरांनी क्षेत्रपालाच्या मूर्तीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी [[कंधारचा किल्ला|कंधारच्या किल्ल्याजवळील]] मानसपुरी येथे केलेल्या उत्खननाची जागा]] |
[[चित्र:कंधारजवळील मानसपुरी येथील उत्खनन स्थळ.JPG|right|thumb|250px|डॉ. ढवळीकरांनी क्षेत्रपालाच्या मूर्तीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी [[कंधारचा किल्ला|कंधारच्या किल्ल्याजवळील]] मानसपुरी येथे केलेल्या उत्खननाची जागा]] |
||
डॉ. '''मधुकर केशव ढवळीकर''' (जन्म : पाटस-पुणे, १६ मे, इ..स. १९३० - मृत्यू २७ मार्च २०१८) हे [[पद्मश्री पुरस्कार]]विजेते भारतीय पुरातत्त्वज्ञ . |
डॉ. '''मधुकर केशव ढवळीकर''' (जन्म : पाटस-पुणे, १६ मे, इ..स. १९३० - मृत्यू २७ मार्च २०१८) हे [[पद्मश्री पुरस्कार]]विजेते भारतीय पुरातत्त्वज्ञ होते. |
||
पुणे विद्यापीठातून १९५८ मध्ये ढवळीकर यांनी एम.ए. ही पदवी पहिल्या वर्गात सर्वप्रथम येऊन मिळवली आणि नंतर तेथेच पीएच.डी.साठीचे संशोधनही केले. [[भारतीय पुरातत्व सर्वेक्षण|भारतीय पुरातत्त्व विभागात]] त्यांनी कामाला सुरुवात केली आणि नंतर नागपूर विद्यापीठात प्रपाठक म्हणूनही काम केले. त्यानंतरचा सारा काळ डेक्कन कॉलेज या संस्थेतच व्यतीत केला. पुरातत्त्वशास्त्राच्या अध्यापनात प्रत्यक्ष संशोधनाला फारच महत्त्व असते. ठिकठिकाणी जाऊन उत्खनन करून इतिहासाची उलगड करणे हे काम कष्टाचे असते. डॉ. ढवळीकर यांनी भारतातील अनेक ठिकाणी असे उत्खनन करण्यात पुढाकार घेतला. भारत आणि ग्रीस या दोन्ही ठिकाणच्या संस्कृतींचा उदय एकाच कालखंडातील मानला जातो. त्यामुळे त्या देशातील उत्खननाचा भारतीय संदर्भात अभ्यास करण्याची संधीही त्यांना मिळाली. भारत सरकारने त्यांना ग्रीसमधील पेला या ठिकाणच्या उत्खननासाठी मुद्दाम पाठवले होते. |
|||
[[इनामगांव (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)|इनामगावाचे]] उत्खनन प्रकल्प हे |
[[इनामगांव (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)|इनामगावाचे]] उत्खनन प्रकल्प हे तढवळीकरांचे नावाजलेले प्रमुख कार्य होय. इ.स.१९६८ ते इ.स.१९८३ दरम्यान बारा टप्प्यांत त्यांनी हे संशोधन केले. त्यांनी हडप्पा समकालीन [[गुजरात]]मध्ये मोरवीजवळ कुंतासी येथेही संशोधन केले. [[गुप्त साम्राज्य|गुप्त साम्राज्यातील]] राजांची सोन्याची नाणी यावर त्यांचे विशेष [[संशोधन]] होते. [[नांदेड]] येथील [[राष्ट्रकूट|राष्ट्रकूटांच्या]] [[राजधानी]]वरही त्यांनी संशोधन केले. तसेच [[कंधार (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)|कंधार]] येथे [[पुरातत्त्वीय उत्खनन]] करून तेथील क्षेत्रपालाच्या विशालकाय मूर्तीवर प्रकाशझोत टाकला. |
||
मधुकर केशव ढवळीकर हे पुण्यातील डेक्कन कॉलेज येथे संचालक म्हणून ते १९९० पर्यंत कार्यरत होते |
|||
==ढवळीकरांनी लिहिलेली मराठी पुस्तके== |
==ढवळीकरांनी लिहिलेली मराठी पुस्तके== |
||
ओळ १६: | ओळ १९: | ||
* महाराष्ट्राची कुळकथा |
* महाराष्ट्राची कुळकथा |
||
==इंग्रजी पुस्तके== |
==ढवळीकरांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके== |
||
* Apegaon Excavations: Report of the Excavation at Apegaon: 1976 |
* Apegaon Excavations: Report of the Excavation at Apegaon: 1976 |
||
* Aryans: Myth and Archaeology |
* Aryans: Myth and Archaeology |
१३:४९, २९ मार्च २०१८ ची आवृत्ती
डॉ. मधुकर केशव ढवळीकर (जन्म : पाटस-पुणे, १६ मे, इ..स. १९३० - मृत्यू २७ मार्च २०१८) हे पद्मश्री पुरस्कारविजेते भारतीय पुरातत्त्वज्ञ होते.
पुणे विद्यापीठातून १९५८ मध्ये ढवळीकर यांनी एम.ए. ही पदवी पहिल्या वर्गात सर्वप्रथम येऊन मिळवली आणि नंतर तेथेच पीएच.डी.साठीचे संशोधनही केले. भारतीय पुरातत्त्व विभागात त्यांनी कामाला सुरुवात केली आणि नंतर नागपूर विद्यापीठात प्रपाठक म्हणूनही काम केले. त्यानंतरचा सारा काळ डेक्कन कॉलेज या संस्थेतच व्यतीत केला. पुरातत्त्वशास्त्राच्या अध्यापनात प्रत्यक्ष संशोधनाला फारच महत्त्व असते. ठिकठिकाणी जाऊन उत्खनन करून इतिहासाची उलगड करणे हे काम कष्टाचे असते. डॉ. ढवळीकर यांनी भारतातील अनेक ठिकाणी असे उत्खनन करण्यात पुढाकार घेतला. भारत आणि ग्रीस या दोन्ही ठिकाणच्या संस्कृतींचा उदय एकाच कालखंडातील मानला जातो. त्यामुळे त्या देशातील उत्खननाचा भारतीय संदर्भात अभ्यास करण्याची संधीही त्यांना मिळाली. भारत सरकारने त्यांना ग्रीसमधील पेला या ठिकाणच्या उत्खननासाठी मुद्दाम पाठवले होते.
इनामगावाचे उत्खनन प्रकल्प हे तढवळीकरांचे नावाजलेले प्रमुख कार्य होय. इ.स.१९६८ ते इ.स.१९८३ दरम्यान बारा टप्प्यांत त्यांनी हे संशोधन केले. त्यांनी हडप्पा समकालीन गुजरातमध्ये मोरवीजवळ कुंतासी येथेही संशोधन केले. गुप्त साम्राज्यातील राजांची सोन्याची नाणी यावर त्यांचे विशेष संशोधन होते. नांदेड येथील राष्ट्रकूटांच्या राजधानीवरही त्यांनी संशोधन केले. तसेच कंधार येथे पुरातत्त्वीय उत्खनन करून तेथील क्षेत्रपालाच्या विशालकाय मूर्तीवर प्रकाशझोत टाकला.
मधुकर केशव ढवळीकर हे पुण्यातील डेक्कन कॉलेज येथे संचालक म्हणून ते १९९० पर्यंत कार्यरत होते
ढवळीकरांनी लिहिलेली मराठी पुस्तके
- आर्यांच्या शोधात
- इनामगाव उत्खनन अहवाल
- कोणे एके काळी सिंधू संस्कृती
- श्री गणेश – आशियाचे आराध्य दैवत
- नाणकशास्त्र - नाण्यांच्या अभ्यासावरील पुस्तक
- पर्यावरण आणि संस्कृती
- पुरातत्त्व विद्या
- भारताची अभ्यासपूर्ण कुळकथा
- महाराष्ट्राची कुळकथा
ढवळीकरांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके
- Apegaon Excavations: Report of the Excavation at Apegaon: 1976
- Aryans: Myth and Archaeology
- Indian Protohistory
- A Comprehensive History of India: Prehistory of India (Vol 1, Part 1)
- Ellora (Oxford India Collection)
- Excavations at Inamgaon: Volume I Part 2
- Excavations at Kaothe
- Cultural Imperialism: Indus Civilization in Western India
- Kuntasi: a Harappan Emporium on West Coast
- Masterpieces of Indian Terracottas
- Masterpieces of Rashtrakuta Art: The Kailas
- Late Hinayana caves of Western India
- Sanchi (Monumental Legacy)
- Satavahana Art
- Historical Archaeology of India
पुरस्कार आणि सन्मान
- इंडियन आर्कियॉलॉजिकल सोसायटीच्या वाराणसी येथील अधिवेशनाचे अध्यक्षपद
- इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अध्यक्षपद
- टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडू्न डी.लिट. ही मानद पदवी
- पंतप्रधानांचे सुवर्णपदक
- पद्मश्री पुरस्कार
- महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्षपद