"धुंडिराज गोविंद फाळके" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ४८: | ओळ ४८: | ||
# सेतुबंधन ([[इ.स. १९३२]]) |
# सेतुबंधन ([[इ.स. १९३२]]) |
||
# गंगावतरण ([[इ.स. १९३७]]) |
# गंगावतरण ([[इ.स. १९३७]]) |
||
==सन्मान== |
|||
मुंबईतील फिल्मसिटीला दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणतात. |
|||
==दादासाहेब फाळके यांच्यावरील पुस्तके== |
==दादासाहेब फाळके यांच्यावरील पुस्तके== |
१५:३६, ८ जानेवारी २०१८ ची आवृत्ती
दादासाहेब फाळके | |
---|---|
भारतीय चित्रपट जनक
A FATHER OF INDIAN CINEMA | |
जन्म |
धुंडिराज गोविंद फाळके एप्रिल ३०, १८७० ब्रिटिश भारत त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
फेब्रुवारी १६, १९४४ ब्रिटिश भारत नाशिक, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | दिग्दर्शक, निर्माता |
कारकीर्दीचा काळ | १९१३ ते १९४४ |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | राजा हरिश्चंद्र |
वडील | दाजिशास्ञी |
आई | द्वारकाबाई |
टिपा भारतीय चित्रपटकला वैभवाप्रत नेली |
धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके (एप्रिल ३०, १८७०; त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र - फेब्रुवारी १६, १९४४; नाशिक, महाराष्ट्र) हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपटनिर्माते होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . १९१३ साली त्यांनी निर्मिलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपट व २६ लघुपटांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो.
जीवन
दादासाहेब फाळक्यांचा जन्म नाशकाहून तीस किलोमीटर अंतरावरच्या त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध संस्कृतज्ञ होते.
इ.स. १८८५साली त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे प्रवेश घेतला. इ.स. १८९०साली जे.जे.तून उत्तीर्ण झाल्यावर ते कला भवन, बडोदा येथे शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला, छायाचित्रणकला इत्यादी गोष्टी शिकले.
त्यांनी गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. परंतु, गोध्ऱ्यात झालेल्या ब्युबॉनिक प्लेगाच्या उद्रेकात त्यांची प्रथम पत्नी आणि मूल दगावल्यावर त्यांना ते गाव सोडावे लागले. लवकरच, त्यांची ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या ४० 'जादूगारां'पैकी एकाशी, जर्मन कार्ल हर्ट्झ याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांना 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थे'साठी ड्राफ्ट्समन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या धडपड्या स्वभावामुळे लवकरच ते नोकरीच्या बंधनांना कंटाळले व त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरू केला. शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात ते वाकबगार होते. त्यांनी राजा रविवर्मांसोबत काम केले. पुढे त्यांनी स्वत:चा छापखाना काढला, तसेच छपाईची नवी तंत्रे आणि यंत्रे अभ्यासायला जर्मनीची वारी केली.
छपाई व्यवसायात त्यांच्या सहकाऱ्यांशी त्यांचे विवाद झाले आणि फाळकेंनी छपाईच्या व्यवसायास रामराम ठोकला. पुढे "लाईफ ऑफ ख्रिस्त" (Life of Christ) हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी आपले लक्ष हलत्या चित्रांच्या (चित्रपट, English:Motion Pictures) व्यवसायाकडे वळवले व १९१२ साली त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट काढला जो ३ मे १९१३ साली मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात (Coronation Cinema) प्रेक्षकांसाठी पहिल्यांदा दाखवण्यात आला.
कारकीर्द
चित्रपट
- राजा हरिश्चंद्र (इ.स. १९१३)
- मोहिनी भस्मासूर (इ.स. १९१३)
- सावित्री सत्यवान (इ.स. १९१४)
- श्रीकृष्णजन्म (इ.स. १९१८)
- कालिया मर्दन (इ.स. १९१९)
- सेतुबंधन (इ.स. १९३२)
- गंगावतरण (इ.स. १९३७)
सन्मान
मुंबईतील फिल्मसिटीला दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणतात.
दादासाहेब फाळके यांच्यावरील पुस्तके
- ध्येयस्थ श्वास - दादासाहेब फाळके(लेखिका - ज्योती निसळ)
दादासाहेब फाळके यांच्यावरील चित्रपट
हेही पहा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |