"थेरीगाथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६: ओळ ६:
==परिचय==
==परिचय==
थेरीगाथा ही [[थेरगाथा]]च्या समान आहे. होय, थेरोंच्या उद्गारात जीवनसंस्मरणांचा उल्लेख कमी आहे. त्यामध्ये विषयांची गंभीरता आणि प्रकृतीचित्रण अधिक आहे. याच्या विपरीत बहुतेक थेरींच्या उद्गारात सुखदु:खाने भरलेले त्यांच्या पूर्व जीवनाचे संस्मरण मिळतात. या प्रकारे त्यांच्या आध्यात्मिक जीवनाच्या व्यतीरिक्त पारिवारीक आणि सामाजिक जीवनाची सुद्धा झलक दिसते. शुभा सारख्या एखाद्या थेरींच्या उद्गारातच प्रकृतीचे वर्णन पाहायला मिळले. अंबपाली सारख्या थेरींचे उद्गार, ज्यात सांसारिक वैभवाचा उल्लेख मिळतो, काव्यशास्त्राच्या अनुपम उदाहरण आहे.
थेरीगाथा ही [[थेरगाथा]]च्या समान आहे. होय, थेरोंच्या उद्गारात जीवनसंस्मरणांचा उल्लेख कमी आहे. त्यामध्ये विषयांची गंभीरता आणि प्रकृतीचित्रण अधिक आहे. याच्या विपरीत बहुतेक थेरींच्या उद्गारात सुखदु:खाने भरलेले त्यांच्या पूर्व जीवनाचे संस्मरण मिळतात. या प्रकारे त्यांच्या आध्यात्मिक जीवनाच्या व्यतीरिक्त पारिवारीक आणि सामाजिक जीवनाची सुद्धा झलक दिसते. शुभा सारख्या एखाद्या थेरींच्या उद्गारातच प्रकृतीचे वर्णन पाहायला मिळले. अंबपाली सारख्या थेरींचे उद्गार, ज्यात सांसारिक वैभवाचा उल्लेख मिळतो, काव्यशास्त्राच्या अनुपम उदाहरण आहे.

भिक्खूणीसंघाचे संघठन सुद्धा बरेचसे भिक्खूसंघाच्या आधारावरच झाले आहे. कुठलाही भेदभाव न करता, आध्यात्मिक जीवनात मग्न समाजाच्या सर्व स्तरातील महिलांसाठी त्याचे दरवाजे उघडे होते. राजपरीवारातील महिलांपासून ते दीन-दुःखी परिवारातील महिला संघात सामील होत्या. त्या सर्व सामाजिक विषमतांना त्यागून एकच पवित्र उद्देश्याने प्रेरित होऊन संघाची सदस्या (भिक्खूणी) बनल्या होत्या. त्या साधिकांच्या वैराग्याच्या मागे अनेक कारण होते. बहुतांश साधिकांनी प्रियजनांच्या वियोगाने आणि सांसारीक जीवनापासून कंटाळून संघात प्रवेश केला होता. सर्वांना उद्देश्य परम शांतीची प्राप्ती होता. [[अर्हत|अर्हत्व]]ाच्या प्राप्ती नंतर [[निर्वाण]]ाच्या परम शांतीची अनुभूतीमध्ये त्या सर्वांना एकाच स्वरात गाताना ऐकतात-- ''सीतिभूतम्हि निब्बुता अर्थात शीतिभूत झालेली आहे, उपशांत झालेली आहे.''


==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==

०९:१२, ३ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

थेरीगाथा हा एक बौद्ध ग्रंथ असून तो खुद्दक निकायाच्या १५ ग्रंथांपैकी एक आहे. यात ७३ परमपदप्राप्त विद्वान स्त्रियांनी (भिक्खुणी) आपल्या उद्गारातून रचलेल्या ५२२ गाथांचा संग्रह आहे. थेरी म्हणजे अनुभवी व ज्ञानी स्त्री. पाली भाषेतील या गाथा काव्यस्वरूपात असून त्यांत उत्कट भावनांचा परिपोष आढळतो. हा ग्रंथ १६ वर्गात/भागात विभाजित आहे, जो गाथांच्या संख्येनुसार क्रमाने आहे.


थेरीगाथेमध्ये ज्या भिक्खूणींचा उल्लेख आलेला आहे, त्यातील बहुतांश भगवान बुद्ध यांच्या समकालीन होत्या. एका इसिदाप्तीच्या उदानात भव्य नगरी पाटलिपुत्राचा उल्लेख आला आहे. संभवत: ती सम्राट अशोक यांची राजधानी आहे. यामुळे ग्रंथाचा रचनाकाळ प्रथम बौद्ध संगीती पासून ते तृतीय बौद्ध संगीती पर्यंतचा मानला जातो.

परिचय

थेरीगाथा ही थेरगाथाच्या समान आहे. होय, थेरोंच्या उद्गारात जीवनसंस्मरणांचा उल्लेख कमी आहे. त्यामध्ये विषयांची गंभीरता आणि प्रकृतीचित्रण अधिक आहे. याच्या विपरीत बहुतेक थेरींच्या उद्गारात सुखदु:खाने भरलेले त्यांच्या पूर्व जीवनाचे संस्मरण मिळतात. या प्रकारे त्यांच्या आध्यात्मिक जीवनाच्या व्यतीरिक्त पारिवारीक आणि सामाजिक जीवनाची सुद्धा झलक दिसते. शुभा सारख्या एखाद्या थेरींच्या उद्गारातच प्रकृतीचे वर्णन पाहायला मिळले. अंबपाली सारख्या थेरींचे उद्गार, ज्यात सांसारिक वैभवाचा उल्लेख मिळतो, काव्यशास्त्राच्या अनुपम उदाहरण आहे.

भिक्खूणीसंघाचे संघठन सुद्धा बरेचसे भिक्खूसंघाच्या आधारावरच झाले आहे. कुठलाही भेदभाव न करता, आध्यात्मिक जीवनात मग्न समाजाच्या सर्व स्तरातील महिलांसाठी त्याचे दरवाजे उघडे होते. राजपरीवारातील महिलांपासून ते दीन-दुःखी परिवारातील महिला संघात सामील होत्या. त्या सर्व सामाजिक विषमतांना त्यागून एकच पवित्र उद्देश्याने प्रेरित होऊन संघाची सदस्या (भिक्खूणी) बनल्या होत्या. त्या साधिकांच्या वैराग्याच्या मागे अनेक कारण होते. बहुतांश साधिकांनी प्रियजनांच्या वियोगाने आणि सांसारीक जीवनापासून कंटाळून संघात प्रवेश केला होता. सर्वांना उद्देश्य परम शांतीची प्राप्ती होता. अर्हत्वाच्या प्राप्ती नंतर निर्वाणाच्या परम शांतीची अनुभूतीमध्ये त्या सर्वांना एकाच स्वरात गाताना ऐकतात-- सीतिभूतम्हि निब्बुता अर्थात शीतिभूत झालेली आहे, उपशांत झालेली आहे.

हे सुद्धा पहा