"साँगक्रन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: साँगक्रम उत्सव '''साँगक्रम उत्सव''' हा थाई नववर्षाचा बौद्ध सण अस...
(काही फरक नाही)

२२:४९, २ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

साँगक्रम उत्सव

साँगक्रम उत्सव हा थाई नववर्षाचा बौद्ध सण असून थायलंड, म्यानमार, लाओस व इतर बौद्ध राष्ट्रांत साजरा केला जातो. हा सण एप्रिल महिन्यात असतो. थायलंड मध्ये एप्रिल महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात आणि अमेरिकतेत वसंत ऋतू असतो.

या दिवशी बौद्ध उपासक आणि उपासिका सकाळीच उठून नजिकच्या विहारात (बौद्ध मंदिर) जातात. तेथे विहाराबाहेर हातात भिक्षापात्र घेऊन पुष्कळ भिक्खू-भिक्खूणी असतात. ते एका ओळीत उभे राहून चालतात. बौद्ध उपासक-उपासिका त्यांच्या समोर उभ्या असतात व भिक्खू-भिक्खूणींच्या भिक्षापात्रात अन्नदान करतात. काही उपासक रोज भिक्खूंना अन्नदान करतात. उपासक अपंगास व गरीबांना सुद्धा अन्नदान करतात. त्यानंतर मोठ्या शहरातील व वटधम्मराम विहारातील लोक पंचशील ग्रहण करतात, धम्म जाणतात व विहारास पैशाचे सुद्धा दान करतात. लोकांना धम्मविषयी चर्चा व शिकवण ही भिक्खूंकडून दिली जाते. ती धम्मशिकवण दैनंदिन जीवनाशी निगडीत असते.

दुपारनंतर बुद्धमुर्ती व भिक्खू यांच्यावर उपासक गुलाब पाण्याचा वर्षाव करतात. आदर व्यक्त करण्याचा हा एक संकेत होय. ह्या मोबदल्यात भिक्खू त्यांना आशिर्वाद देतात. या दिवशी मुलेही पालकांप्रती आदर व्यक्त करतांना त्यांना छोटी भेट वस्तू देतात आणि प्रेम व आदरप्रित्यर्थ अंगावर गुलाब पाण्याचा वर्षाव करतात व पालक मुलांना आर्शिर्वाद देतात.

थायलंडमध्ये साँगक्रन दिनाच्या अगोदरच्या दिवशी थाई लोक त्यांची घरे, कपडे व गावातील रस्त्ये स्वच्छ करतात, अन्न तयार करून नंतर भिक्खूंना ते अन्नदान करतात.

शिकागोत असलेले थाई उपासक थाई पद्धतीप्रमाणे हा नववर्षाचा उत्सव साजरा करतात.