"तारा भवाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
डॉ. तारा भवाळकर या प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी [[हरिवंशराय बच्चन]] यांच्या ‘मधुशाला’चे मराठीतले पहिले मराठी भाषांतर केले आहे. इंडिया बुक हाउसने ते प्रकाशित केले होते. हे भाषांतर केले तेव्हा भवाळकर कॉलेजात शिकत होत्या.
डॉ. तारा भवाळकर (जन्म : १ एप्रिल. १९३९) या प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी [[हरिवंशराय बच्चन]] यांच्या ‘मधुशाला’चे मराठीतले पहिले मराठी भाषांतर केले आहे. इंडिया बुक हाउसने ते प्रकाशित केले होते. हे भाषांतर केले तेव्हा भवाळकर कॉलेजात शिकत होत्या.

भवाळकर लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांशी संबंधित असून या विषयांच्या त्या गाढ्या अभ्यासक आहेत. त्यांनी लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला यांविषयी लेखनही केले आहे, तर लोककला आणि लोकसाहित्य या विषयांशी संबंधित अनेक चर्चा, परिसंवाद, संमेलने यांत त्या सहभागी झाल्या आहेत. स्त्रीजीवन हा त्यांच्या आस्थेचा आणि चिंतनाचा विषय आहे.

==शिक्षण आणि ते घेताना केलेले विविध उपक्रम==
==शिक्षण आणि ते घेताना केलेले विविध उपक्रम==
शाळा, कॉलेजमध्ये असताना तारा भवाळकरांना नाटकाचे लेखन, दिग्दर्शन करणे, त्या नाटकात अभिनय करणे याची आवड निर्माण झाली. महाविद्यालयात असताना एकांकिका स्पर्धा सुरू झाल्या. मग त्या नाट्य एकांकिका स्पर्धांसाठी लेखन, दिग्दर्शन, अभिनय असे करू लागल्या. कॉलेज संपल्यावर त्यांनी स्वतःची ए.डी.ए. ही नाटक संस्था सुरू केली आणि मग त्या संस्थेच्या माध्यमातून शाळा, कॉलेजच्या मुलांची नाटकं बसवून देणे, त्यांना राज्य नाट्य एकांकिका स्पर्धेसाठी तयार करणे असे सर्व सुरू झाले.
शाळा, कॉलेजमध्ये असताना तारा भवाळकरांना नाटकाचे लेखन, दिग्दर्शन करणे, त्या नाटकात अभिनय करणे याची आवड निर्माण झाली. महाविद्यालयात असताना एकांकिका स्पर्धा सुरू झाल्या. मग त्या नाट्य एकांकिका स्पर्धांसाठी लेखन, दिग्दर्शन, अभिनय असे करू लागल्या. कॉलेज संपल्यावर त्यांनी स्वतःची ए.डी.ए. ही नाटक संस्था सुरू केली आणि मग त्या संस्थेच्या माध्यमातून शाळा, कॉलेजच्या मुलांची नाटके बसवून देणे, त्यांना राज्य नाट्य एकांकिका स्पर्धेसाठी तयार करणे असे सर्व सुरू झाले.

याच दरम्यान त्यांनी एम.ए. केले आणि त्या मराठीच्या प्राध्यापक झाल्या. त्यानंतर त्यांनी पहिले नाटककार [[विष्णुदास भावे]] यांच्या जीवनावर प्रबंध लिहून पीएच.डी. मिळवली. त्यासाठी त्यांनी सांगली, कर्नाटक, कारवार, कोकणात जाऊन या विषयीची माहिती गोळा केली. नमन म्हणजे काय, दशावतार मंडळे किती असे सगळे जाणून घेत त्यांचा प्रबंध पूर्ण झाला. हा प्रबंध करताना त्या केरळ, कोकण, कर्नाटक, गोवा इथपर्यंत फिरून आल्या. त्यामुळे त्यांचा या विषयातील क्षेत्रीय अभ्यास चांगला झाला होता आणि तोपर्यंत लोककला या विषयात त्यांना आनंद वाटू लागला. आणि त्यामुळेच मग हळूहळू त्या याच विषयाकडे जास्त वळल्या.
याच दरम्यान त्यांनी एम.ए. केले आणि त्यानंतर त्यांनी पहिले नाटककार [[विष्णुदास भावे]] आणि 'मराठी पौराणिक नाटकाची जडण-घडण (प्रारंभ ते १९२०)' हा प्रबंध लिहून पीएच.डी. मिळवली. त्यासाठी त्यांनी सांगली, कर्नाटक, कारवार, कोकणात जाऊन या विषयीची माहिती गोळा केली. नमन म्हणजे काय, दशावतार मंडळे किती असे सगळे जाणून घेत त्यांचा प्रबंध पूर्ण झाला. हा प्रबंध करताना त्या केरळ, कोकण, कर्नाटक, गोवा इथपर्यंत फिरून आल्या. त्यामुळे त्यांचा या विषयातील क्षेत्रीय अभ्यास चांगला झाला होता आणि तोपर्यंत लोककला या विषयात त्यांना आनंद वाटू लागला. आणि त्यामुळेच मग हळूहळू त्या याच विषयाकडे जास्त वळल्या.

==नोकरी==
सन १९५८ ते १९७० या काळत भवाळकर माध्यमिक शाळेत शिक्षिका होत्या. नंतर सन १९७०मध्ये त्या सांगलीच्या श्रीमती चंपाबेन वालचंद शहा महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर वर्गांत मराठीचे अध्यापन करू लागल्या व १९९९ मध्ये प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्या.

==व्याख्याने==
डॉ तारा भवाळकर यांची त्यांचा अभ्यास असलेल्या विषयांवर अनेकदा व्याख्याने होतात. टाटा इन्स्टिट्यूटने त्यांचे 'स्त्रियांच्या मराठी ओव्या' या विषयावर व्याख्यान ठेवले होते. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 'संत कवयित्रीची मुक्ती संकल्पना आणि आधुनिक स्त्रीमुक्ती यांचा अनुबंध' या विषयावर व्याख्यान झाले होते. अमेरिकेच्या अरिझोना विद्यापीठात एका चर्चासत्रासाठी त्यांना आमंत्रण होते.

ओळ ३२: ओळ ३६:
* स्नेहरंग (वैचारिक)
* स्नेहरंग (वैचारिक)

==सन्मान आणि पुरस्कार==
==डॉ. तारा भवाळकार याांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* तारा भवाळकरांच्या पीएच.डी.च्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा [[पुणे]] विद्यापीठाचा पुरस्कार.
* आवास येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
* आवास (अलिबाग) येथे भरलेल्या [[कोमसाप|कोकण मराठी साहित्य परिषदेच्या]] महाराष्ट्रातील पहिल्या महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
* [[मुंबई]]तील [[मुलुंड]]च्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे [[सुं.ल. गद्रे]] साहित्यिक पुरस्कार. (२२-१-२०१७)
* इस्लामपूर येथे भरलेल्या नागर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
* इस्लामपूर येथे भरलेल्या राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
* उचगाव (बेळगाव) येथे भरलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
* कादरगा येथे भरलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
* जळगाव येथे भरलेल्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
* [[मुंबई]]तील [[मुलुंड]]च्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे [[सुं.ल. गद्रे]] साहित्य पुरस्कार. (२२-१-२०१७)
* 'लोकसंचित' या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९१ सालचा पुरस्कार
* 'लोकसंचित' या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९१ सालचा पुरस्कार

२१:३८, २२ जुलै २०१७ ची आवृत्ती

डॉ. तारा भवाळकर (जन्म : १ एप्रिल. १९३९) या प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’चे मराठीतले पहिले मराठी भाषांतर केले आहे. इंडिया बुक हाउसने ते प्रकाशित केले होते. हे भाषांतर केले तेव्हा भवाळकर कॉलेजात शिकत होत्या.

भवाळकर लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांशी संबंधित असून या विषयांच्या त्या गाढ्या अभ्यासक आहेत. त्यांनी लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला यांविषयी लेखनही केले आहे, तर लोककला आणि लोकसाहित्य या विषयांशी संबंधित अनेक चर्चा, परिसंवाद, संमेलने यांत त्या सहभागी झाल्या आहेत. स्त्रीजीवन हा त्यांच्या आस्थेचा आणि चिंतनाचा विषय आहे.

शिक्षण आणि ते घेताना केलेले विविध उपक्रम

शाळा, कॉलेजमध्ये असताना तारा भवाळकरांना नाटकाचे लेखन, दिग्दर्शन करणे, त्या नाटकात अभिनय करणे याची आवड निर्माण झाली. महाविद्यालयात असताना एकांकिका स्पर्धा सुरू झाल्या. मग त्या नाट्य एकांकिका स्पर्धांसाठी लेखन, दिग्दर्शन, अभिनय असे करू लागल्या. कॉलेज संपल्यावर त्यांनी स्वतःची ए.डी.ए. ही नाटक संस्था सुरू केली आणि मग त्या संस्थेच्या माध्यमातून शाळा, कॉलेजच्या मुलांची नाटके बसवून देणे, त्यांना राज्य नाट्य एकांकिका स्पर्धेसाठी तयार करणे असे सर्व सुरू झाले.

याच दरम्यान त्यांनी एम.ए. केले आणि त्यानंतर त्यांनी पहिले नाटककार विष्णुदास भावे आणि 'मराठी पौराणिक नाटकाची जडण-घडण (प्रारंभ ते १९२०)' हा प्रबंध लिहून पीएच.डी. मिळवली. त्यासाठी त्यांनी सांगली, कर्नाटक, कारवार, कोकणात जाऊन या विषयीची माहिती गोळा केली. नमन म्हणजे काय, दशावतार मंडळे किती असे सगळे जाणून घेत त्यांचा प्रबंध पूर्ण झाला. हा प्रबंध करताना त्या केरळ, कोकण, कर्नाटक, गोवा इथपर्यंत फिरून आल्या. त्यामुळे त्यांचा या विषयातील क्षेत्रीय अभ्यास चांगला झाला होता आणि तोपर्यंत लोककला या विषयात त्यांना आनंद वाटू लागला. आणि त्यामुळेच मग हळूहळू त्या याच विषयाकडे जास्त वळल्या.

नोकरी

सन १९५८ ते १९७० या काळत भवाळकर माध्यमिक शाळेत शिक्षिका होत्या. नंतर सन १९७०मध्ये त्या सांगलीच्या श्रीमती चंपाबेन वालचंद शहा महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर वर्गांत मराठीचे अध्यापन करू लागल्या व १९९९ मध्ये प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्या.

व्याख्याने

डॉ तारा भवाळकर यांची त्यांचा अभ्यास असलेल्या विषयांवर अनेकदा व्याख्याने होतात. टाटा इन्स्टिट्यूटने त्यांचे 'स्त्रियांच्या मराठी ओव्या' या विषयावर व्याख्यान ठेवले होते. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 'संत कवयित्रीची मुक्ती संकल्पना आणि आधुनिक स्त्रीमुक्ती यांचा अनुबंध' या विषयावर व्याख्यान झाले होते. अमेरिकेच्या अरिझोना विद्यापीठात एका चर्चासत्रासाठी त्यांना आमंत्रण होते.

तारा भवाळकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • अभ्यासक स्त्रिया (ज्येष्ठ लेखिका मालती दांडेकर, विदुषी दुर्गा भागवत यांच्यापासून ते प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्यापर्यंत ज्ञात-अज्ञात अशा २५ अभ्यासक स्त्रियांच्या संशोधन कार्याचा परिचय करून देणारे पुस्तक)
  • आकलन आणि आस्वाद (साहित्यिक)
  • तिसऱ्या बिंदूच्या शोधात (वैचारिक)
  • निरगाठ सुरगाठ (लेखसंग्रह)
  • बोरीबाभळी (रा.रं. बोराडे यांच्या ग्रामीण स्त्रीविषयक कथांचे संपादन आणि प्रस्तावना)
  • मरणात खरोखर जग जगते (कथासंग्रह)
  • मराठी नाटक : नव्या दिशा, नवी वळणे
  • मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद
  • माझिये जातीच्या (सामाजिक)
  • मातीची रूपे (ललित)
  • मिथक आणि नाटक
  • लोकनागर रंगभूमी (माहितीपर)
  • लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा (माहितीपर)
  • लोकपरंपरेतील सीता
  • लोकसंचित (वैचारिक)
  • लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा (माहितीपर)
  • लोकांगण (कथासंग्रह)
  • संस्कृतीची शोधयात्रा (माहितीपर)
  • स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर (वैचारिक)
  • स्नेहरंग (वैचारिक)

डॉ. तारा भवाळकार याांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • तारा भवाळकरांच्या पीएच.डी.च्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुणे विद्यापीठाचा पुरस्कार.
  • आवास (अलिबाग) येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • इस्लामपूर येथे भरलेल्या नागर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • इस्लामपूर येथे भरलेल्या राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • उचगाव (बेळगाव) येथे भरलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • कादरगा येथे भरलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • जळगाव येथे भरलेल्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • मुंबईतील मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे सुं.ल. गद्रे साहित्य पुरस्कार. (२२-१-२०१७)
  • 'लोकसंचित' या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९१ सालचा पुरस्कार