"अनुदिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३२: | ओळ ३२: | ||
==पुस्तक== |
==पुस्तक== |
||
अनुदिनी या नावाचे [[दिलीप प्रभावळकर]] यांचे पुस्तक आहे. या |
अनुदिनी हा शब्द परंपरागत मराठीत रोजनिशी किंवा वैयक्तिक डायरी या अर्थाने रूढ आहे. ‘अनुदिनी’ या नावाचे [[दिलीप प्रभावळकर]] यांचे एक पुस्तक आहे. या पुस्तकावरून ‘[[श्रीयुत गंगाधर टिपरे]]’ ही मराठी दूरचित्रवाणी मालिका काढली होती. |
||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
१४:०१, १६ जुलै २०१६ ची आवृत्ती
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
अनुदिनी किंवा ब्लॉग हा एखाद्या व्यक्तीने आंतरजालावर लिहिलेली स्फुटे यांना दिलेली संज्ञा आहे. इंग्रजी शब्द ब्लॉग हा वेब(आंतरजाल) आणि लॉग(नोंद) या दोन शब्दांपासून तयार केला गेला. ब्लॉग हे एका प्रकारचे संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचा भाग आहे. स्वतःचे विचार, एखाद्या कार्यक्रमाची माहिती, रेखाचित्र व चित्रफिती वगैरे गोष्टी इंटरनेटच्या आधारे सगळ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी बनवतात. अनुदिनी बहुधा एका व्यक्तीने तयार केलेली असते. तिच्यावरील नोंदी बहुतेकवेळा उलट्या कालक्रमानुसार(सर्वात ताजी आधी!) टाकलेल्या असतात. ब्लॉग सांभाळणे म्हणजे त्यातल्या नोंदींमध्ये सुधारणा करणे. नवीन नोंदी न झाल्याने अनेक अनुदिन्या कालबाह्य होतात.
काही अनुदिन्यांवर लोक एकमेकांशी चर्चा करू शकतात. जे अनुदिनीचे सभासद होतात ते तिथे स्वतःचे विचार मांडू शकतात आणि संदेशही पाठवू शकतात. हे सगळे "विजेट्स"[१] द्वारे शक्य होते. ही बाब एखाद्या अनुदिनीला बाकीच्या सुप्त संकेतस्थळांपासून उजवे ठरवते. बर्याच अनुदिन्या बातम्यांसाठी अथवा समाजोपयोगासाठी बनवलेल्या असतात; तर बाकीच्या वैयक्तिक डायरीप्रमाणे काम करतात. सर्वसाधारण ब्लॉगांवर दुसर्या ब्लॉग्जवर जाण्यासाठी सोय असते. त्यासाठी आवश्यक तेथे लिखाण व चित्रे उपलब्ध करून दिलेली असतात. त्यामुळे आपल्याला त्या विषयाशी निगडित वेबपेजपर्यंत आणि माध्यमांपर्यंत पोहोचता येते. वाचकांना आपले विचार आणि टिप्पणी देण्यासाठी केलेली सोय ब्लॉग्जना विशेष महत्त्व मिळवून देतात. अनेक ब्लॉग्ज हे जरी सामान्यतः लिखाणासाठी बनवलेले असले, तरीही बर्याच ब्लॉग्जचा केंद्रबिंदू हा कला, चित्र, चित्रफिती, संगीत आणि आवाज असतो. मायक्रोब्लॉगिंग हे अजून एका प्रकारचा ब्लॉग आहे. यावर विचार संक्षिप्तपणे मांडता येतात.
टेक्नोराती नावाचे ब्लॉग सर्च इंजिन डिसेंबर २००७ पर्यंत ११२ दशलक्ष ब्लॉग्जवर नजर ठेवून होते.
इतिहास
वेबलॉग ह्या शब्दाचे जनक जॉर्न बारजर हे आहेत. हा शब्द त्यांनी १७ डिसेंबर १९९७ला बनवला. ह्या शब्दाचे संक्षिप्त रूप म्हणजेच ब्लॉग ह्या शब्दासाठी मात्र पीटर मेर्होल्झ हे जवाबदार होते. मेर्होल्झ ह्यांनी हा शब्द पीटरमी.कॉम च्या साइडबारवर प्रदर्शित केला. त्यानंतर थोडक्या काळात ईव्हान विल्यम ह्यांनी पायरा लॅब्ज येथे ब्लॉग हा शब्द नाम व क्रियापद दोन्ही प्रकारे वापरला ( टु ब्लॉग म्हणजे एका वेबलॉगमध्ये बदल करणे अथवा एक ब्लॉग पोस्ट करणे) आणि ब्लॉगर हा शब्दही पायरा लॅब्जने एक ब्लॉगर प्रॉडक्ट म्हणून तयार केला. हे शब्द आता चांगलेच रूढ झाले आहेत.
प्रकार
वैयक्तिक अनुदिनी/ब्लॉग
वैयक्तिक कारणांसाठी ही अनुदिनी लिहिली जाते. विशेषेकरून हे ब्लॉग स्वतःच्या नावाने प्रकाशित होतात.
व्यावहारिक अनुदिनी
प्रकल्पाची वा संस्थेची माहिती देण्यासाठी अशा अनुदिनींचा उपयोग करतात.
लोकप्रियतेमध्ये वाढ
एका संथ गतीने सुरुवात झाल्यावर, पुढील काळात ब्लॉगिंग वेगाने लोकप्रियता मिळवत गेले. ब्लॉगचा वापर सन १९९९ आणि त्या पुढील वर्षांमध्ये वाढला. त्याचबरोबर ब्लॉग्ज बनवण्यासाठी आणि ब्लॉजमध्ये वापरण्यासाठी निघालेल्या अवजारांमुळे(Blog Tools) ब्लॉग्जची लोकप्रियता शिगेला पोहोचली. WordPress, Paint.net, TypePad, Stoch.xchange ही काही अवजारे आहेत.
- ब्रूस एबलसन ह्यांनी ऑक्टोबर १९९८ मध्ये ओपन डायरी स्थापना केली ज्यामुळे अजून हजारो असल्याच ऑनलाईन डायर्या स्थापन झाल्या. ओपन डायरीने वाचकांसाठी आपले विचार व्यक्त करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे अश्या प्रकारची सुविधा देणारा पहिलाच ब्लॉग हा बहुमान ओपन डायरीला मिळाला.
- ब्रॅड फित्झ पॅट्रिक ह्यांनी मार्च १९९९ मध्ये लाइव्ह जर्नलची सुरुवात केली.
- अॅड्रिव्ह स्मेल्स ह्यांनी जुलै १९९९ मध्ये पितास.कॉम हा ब्लॉग तयार केला. हा ब्लॉग संकेतस्थळावरील न्यूजपेजचा मोठाच विकल्प बनून समोर आला. हा ब्लॉग सांभाळायला सोपा होता. सप्टेंबर १९९९ मध्ये डायरी लॅन्डची स्थापना झाली. हा डायरी लॅन्ड रोख फक्त वैयक्तिक डायरी लिहिणार्या समुदायाकडेच होता.
- ईव्हान विल्यम आणि मेग हॉरिहान ह्यांनी ऑगस्ट १९९९ मध्ये ब्लॉगर.कॉम ची स्थापना केली. (हे संकेतस्थळ २००३ मध्ये गुगल कंपनीने खरेदी केले.)
मराठी भाषेतील ब्लॉग
इंटरनेटवर मराठी भाषेत लिखाण करणे शक्य झाल्यानंतर मराठी ब्लॉग दिसू लागले. आता मराठीत शेकडो ब्लॉग लिहिले जातात. २१ व्या शतकात माध्यमांचे स्वरूप पूर्णत: बदलले. माध्यमे, विशेषत: वृत्तपत्रे व्यवसायिक झाली. जी वृत्तपत्रे व्यवसायिकतेपासून दूर राहिली ती बंद पडली. दै. मराठवाडा हे याचे सर्वाधिक उत्तम उदाहरण होय. व्यावसायिक माध्यमांत वैचारिक आणि संशोधनात्मक लेखनाला कोणतेही स्थान राहिले नाही. त्यामुळे, एक मोठी पोकळी त्यातून निर्माण झाली. ही पोकळी ब्लॉग या नव्या माध्यमाने भरून काढली. २०१० सालापर्यंत मराठीतील वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांना समांतर असा स्वतंत्र मीडिया ब्लॉगच्या रूपाने उभा राहिला. मराठीत शेकडो ब्लॉग लिहिले जातात. मेन स्ट्रीम मीडियापेक्षाही जास्त वाचकवर्ग ब्लॉगला आहे. मराठीतील अनेक नामांकित साहित्यिक संशोधक ब्लॉग लिहितात. पुरोगामी विचारांच्या ब्लॉगला वाचकांचा सर्वाधिक पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येते.
मराठी ब्लॉगर
आर. आर. पाटील, प्रा. हरी नरके, संजय सोनवणी , एम. डी. रामटेके, अनिता पाटील , भैय्या पाटील, प्रकाश पोळ (सह्याद्री बाणा) या लेखकांचे ब्लॉग सर्वाधिक लोकप्रिय आहेत. सह्याद्री बाणा या ब्लॉगने नुकताच पाच लाख वाचकांचा टप्पा पार केला. यावरुन मराठी ब्लॉगलाही मिळत असलेला उदंड प्रतिसाद दिसून येतो. अनेक पत्रकारही ब्लॉग लिहितात. सचिन परब , सूर्यकांत पळसकर ही काही पत्रकार मंडळी ब्लॉग लिहितात. बहुतांश मराठी ब्लॉगर स्वतःच्या नावानेच ब्लॉग लिहितात. काहींनी आपल्या ब्लॉगला स्वतंत्र नावे दिली आहेत.
पुस्तक
अनुदिनी हा शब्द परंपरागत मराठीत रोजनिशी किंवा वैयक्तिक डायरी या अर्थाने रूढ आहे. ‘अनुदिनी’ या नावाचे दिलीप प्रभावळकर यांचे एक पुस्तक आहे. या पुस्तकावरून ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मराठी दूरचित्रवाणी मालिका काढली होती.
संदर्भ
www.sahyadribana.com
बाह्य दुवे
- ब्लॉगची सुरुवात करण्यार्यासाठी (मराठी मजकूर)
- ब्लॉगचे फायदे (इंग्रजी मजकूर)
सह्याद्री बाणा (मराठी मजकूर)