Jump to content

"गुरुदेव रानडे महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५९: ओळ ५९:
* श्री गुरुदेव रानडे चरित्र भाग १ आणि २ (लेखक - नरेंद्र कुंटे)
* श्री गुरुदेव रानडे चरित्र भाग १ आणि २ (लेखक - नरेंद्र कुंटे)
* श्री गुरुदेव दर्शन तथा गु. डॉ. आर.डी. रानडे यांचे चरित्र (लेखक - रामचंद्र पांडुरंग कुलकर्णी)
* श्री गुरुदेव दर्शन तथा गु. डॉ. आर.डी. रानडे यांचे चरित्र (लेखक - रामचंद्र पांडुरंग कुलकर्णी)
* गुरुदेव रानडे : साक्षात्काराचे तत्त्वज्ञान व सोपान, (लेखक - ग.वि. तुळपुळे, १९६२).


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

२२:११, १७ जून २०१६ ची आवृत्ती

गुरुदेव रानडे
जन्म नाव रामचंद्र दत्तात्रय रानडे
टोपणनाव गुरुदेव रानडे
जन्म इ.स. १८८६
मृत्यू इ. स. १९५७
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, अध्यात्म
भाषा मराठी
साहित्य प्रकार अध्यात्मिक लेखन

रामचंद्र दत्तात्रेय रानडे (जन्म : जमखिंडी, ३ जुलै, इ.स. १८८६, निधन : निंबाळ, ६ जून, इ. स. १९५७) हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व आध्यात्मिक मार्गदर्शक होते. त्यांनी ‘निंबर्गी संप्रदाय’ वाढविला. कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्यातील निंबाळ येथे त्यांनी आश्रम स्थापला.[] भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे गुरुदेवांचे चाहते होते.

शिक्षण

रा.द. रानडे यांचे शालेय शिक्षण जमखिंडी येथील परशुरामभाऊ हायस्कुलात होऊन ते मॅट्रिकची परीक्षा जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवून १९०२ मध्ये उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी ते पुण्याच्या डेक्कन कॉलेजात आले व गणित हा विषय घेऊन बी. ए. आणि तत्त्वज्ञान विषय घेऊन एम.ए. झाले.

व्यवसाय

एम.ए. झाल्यानंतर रानडे यांनी काही दिवस त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजातील हस्तलिखित ग्रंथालयाचे प्रमुख म्हणून काम केल्यावर १९१३ मध्ये त्यांची नेमणूक फर्ग्युसन कॉलेजात इंग्रजीचे शिक्षक म्हणून झाली. १९२४ मध्ये त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सभासदत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर ‘अॅकॅडमी ऑफ फिलॉसॉफी अॅन्ड रिलिजन’ ही संस्था स्थापन त्यांनी डॉ. बेलवलकर यांच्या सहकार्याने व मुंबई विद्यापीठाच्या पुढाकाराने भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासखंडांची योजना आखली; परंतु काही कारणांमुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. १९२८ मध्ये अलाहाबाद विद्यापीठाचे तेव्हाचे कुलगुरू सर गंगानाथ झा यांनी त्यांना अलाहाबाद येथे सन्मानपूर्वक बोलावून घेतले व तेव्हापासून १९४३ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत सुमारे २० वर्षे ते त्या विद्यापीठातील तत्त्वज्ञान-विभागाचे प्रमुख प्राध्यापक होते.

सेवानिवृत्तीनंतरचा काळ त्यांनी निंबाळ (जि. विजापूर, कर्नाटक) व अलाहाबाद या दोन ठिकाणी आलटूनपालटून घालविला.

रा.द. रानडे यांनी लिहिलेली पुस्तके

  • एकनाथ वचनामृत
  • कन्‍नड संत वाङ्मयातील परमार्थ मार्ग
  • तुकाराम वचनामृत
  • मराठी संत वाङ्मयातील परमार्थ मार्ग
  • रामदास वचनामृत
  • संत वचनामृत
  • संतश्रेष्ठ श्रीतुकाराम
  • हिदी संत वाङ्मयातील परमार्थ मार्ग
  • ज्ञानेश्वर वचनामृत
  • वगैरे वगैरे

श्रीगुरुदेव रानडे यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके

  • आत्मज्ञानाचे परमाचार्य गुरुदेव रानडे जीवन चरित्र. (लेखक - मनोहर श्री. देशपांडे)
  • ‘कल्याणी’ संतसेवा विशेषांक - श्री गुरुदेव रानडे अंक (२००१)
  • गुरुदेव रानडे चरित्र आणि तत्त्वज्ञान (लेखक - शं.गो. तुळ्पुळे)
  • श्री गुरुदेव रानडे यांचे आत्मचरित्र : एक शोध (लेखक - वि. चिं. केळकर)
  • श्री गुरुदेव रानडे चरित्र भाग १ आणि २ (लेखक - नरेंद्र कुंटे)
  • श्री गुरुदेव दर्शन तथा गु. डॉ. आर.डी. रानडे यांचे चरित्र (लेखक - रामचंद्र पांडुरंग कुलकर्णी)
  • गुरुदेव रानडे : साक्षात्काराचे तत्त्वज्ञान व सोपान, (लेखक - ग.वि. तुळपुळे, १९६२).

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ http://www.saamana.com/lekh/prasangik-8