"भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Chaitnyags (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३६: | ओळ ३६: | ||
'''भवानराव श्रीनिवासराव ''पंतप्रतिनिधी'' ''' ([[ऑक्टोबर २४]], [[इ.स. १८६८|१८६८]] - [[एप्रिल १३]], [[इ.स. १९५१|१९५१]]) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[औंध संस्थान|औंध संस्थानाचे]] [[नोव्हेंबर ४]], [[इ.स. १९०९|१९०९]] - [[ऑगस्ट १५]], [[इ.स. १९४७|१९४७]] या काळादरम्यान राजे होते. [[इंदूर]] येथे भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते. |
'''भवानराव श्रीनिवासराव ''पंतप्रतिनिधी'' ''' ([[ऑक्टोबर २४]], [[इ.स. १८६८|१८६८]] - [[एप्रिल १३]], [[इ.स. १९५१|१९५१]]) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[औंध संस्थान|औंध संस्थानाचे]] [[नोव्हेंबर ४]], [[इ.स. १९०९|१९०९]] - [[ऑगस्ट १५]], [[इ.स. १९४७|१९४७]] या काळादरम्यान राजे होते. [[इंदूर]] येथे भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते. |
||
भवानराव पंतप्रतिनिधी हे धार्मिक होते, पण दैववादी नव्हते. मानवी सामर्थ्यावर व कर्तृत्वाचर त्यांचा विश्वास होता. उद्योगाचे महत्त्व त्यांना पुरेपूर पटलेले होते. बहात्तर खॆडी आणि अठ्ठेचाळीस वाड्या एवढाच विस्तार असलेले आपले संस्थान उद्योग-व्यवसायांनी फुलावे, फळावे असे स्वप्न त्यांनी पाहिले. संस्थानांतील शाळांमधून तंत्रशिक्षण देण्यावर त्यांचा कटाक्ष होता. |
|||
⚫ | |||
भवानराव चित्रकलेचे आश्रयदाते व स्वतः चांगले चित्रकार होते. |
|||
स्वदेशी वस्तू हा भवानराव पंतप्रतिनिधींचा जिव्हाळ्याचा विषय होता. संस्थानात शेतांत पिकलेले धान्यच त्यांच्या भोजनात असे. संस्थानामधील विणकरांनी विणलेली साधी वस्त्रेच ते परिधान करीत. सूर्यनमस्कार या जुन्या व्यायामप्रकाराचे त्यांनी शास्त्रशुद्ध संशोधन करून पुनरुज्जीवन केले. ते स्वत: सूर्यनमस्कार घालीत. संस्थानातील शालेय विद्यार्थीही हा व्यायाम करीत. त्यांच्या या सूर्यनमस्कार ‘वेडा’वर आचार्य अत्र्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ नावाचे नाटक लिहिले. |
|||
चहा पिण्याला त्यांचा विरोध ‘बिन भिंतीचा तुरुंग’ ही मॉरिस फ्रेडमन नावाच्या आयरिश माणसाची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. उघड्यावर असलेली ती खुनी गुन्हेगारांची वसाहत ‘स्वतंत्रपूर’ या नावाने ओळखली जाऊ लागली. पुढे व्ही.शांताराम यांनी याच संकल्पनेवर ‘दो आँखे बारा हाथ’ नावाचा हिंदी चित्रपट काढला. हा चित्रपट जगभरात नावाजला गेला. |
|||
भवानरावांना साहित्य, संगीत, शिल्प, चित्र यांची विशेष आवड होती. चित्रकारांचे ते आश्रयदाते होते. दरवर्षी राजेसाहेब औंधमध्ये कला प्रदर्शन भरवीत. त्यांनी राजे-रजवाड्यांकडून जुनी चित्रे विकत घेतली. परदेशी जाऊन पाश्चात्त्य चित्रकारांची काही चित्रे भारतात आणली. काही दुर्मीळ चित्रांच्या नकला करवून आणल्या. आणि या चित्रा-शिल्पांसाठी औंधमध्ये ए्क वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय उभारले. |
|||
⚫ | |||
पुण्याच्या [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेची]] वास्तू ज्या जागेवर उभी आहे ती जागा भवानरावांनी परिषदेला दिलेली आहे. |
पुण्याच्या [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेची]] वास्तू ज्या जागेवर उभी आहे ती जागा भवानरावांनी परिषदेला दिलेली आहे. |
||
११:०१, २४ मे २०१६ ची आवृत्ती
भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी (ऑक्टोबर २४, १८६८ - एप्रिल १३, १९५१) हे महाराष्ट्रातील औंध संस्थानाचे नोव्हेंबर ४, १९०९ - ऑगस्ट १५, १९४७ या काळादरम्यान राजे होते. इंदूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
भवानराव पंतप्रतिनिधी हे धार्मिक होते, पण दैववादी नव्हते. मानवी सामर्थ्यावर व कर्तृत्वाचर त्यांचा विश्वास होता. उद्योगाचे महत्त्व त्यांना पुरेपूर पटलेले होते. बहात्तर खॆडी आणि अठ्ठेचाळीस वाड्या एवढाच विस्तार असलेले आपले संस्थान उद्योग-व्यवसायांनी फुलावे, फळावे असे स्वप्न त्यांनी पाहिले. संस्थानांतील शाळांमधून तंत्रशिक्षण देण्यावर त्यांचा कटाक्ष होता.
स्वदेशी वस्तू हा भवानराव पंतप्रतिनिधींचा जिव्हाळ्याचा विषय होता. संस्थानात शेतांत पिकलेले धान्यच त्यांच्या भोजनात असे. संस्थानामधील विणकरांनी विणलेली साधी वस्त्रेच ते परिधान करीत. सूर्यनमस्कार या जुन्या व्यायामप्रकाराचे त्यांनी शास्त्रशुद्ध संशोधन करून पुनरुज्जीवन केले. ते स्वत: सूर्यनमस्कार घालीत. संस्थानातील शालेय विद्यार्थीही हा व्यायाम करीत. त्यांच्या या सूर्यनमस्कार ‘वेडा’वर आचार्य अत्र्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ नावाचे नाटक लिहिले.
चहा पिण्याला त्यांचा विरोध ‘बिन भिंतीचा तुरुंग’ ही मॉरिस फ्रेडमन नावाच्या आयरिश माणसाची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. उघड्यावर असलेली ती खुनी गुन्हेगारांची वसाहत ‘स्वतंत्रपूर’ या नावाने ओळखली जाऊ लागली. पुढे व्ही.शांताराम यांनी याच संकल्पनेवर ‘दो आँखे बारा हाथ’ नावाचा हिंदी चित्रपट काढला. हा चित्रपट जगभरात नावाजला गेला.
भवानरावांना साहित्य, संगीत, शिल्प, चित्र यांची विशेष आवड होती. चित्रकारांचे ते आश्रयदाते होते. दरवर्षी राजेसाहेब औंधमध्ये कला प्रदर्शन भरवीत. त्यांनी राजे-रजवाड्यांकडून जुनी चित्रे विकत घेतली. परदेशी जाऊन पाश्चात्त्य चित्रकारांची काही चित्रे भारतात आणली. काही दुर्मीळ चित्रांच्या नकला करवून आणल्या. आणि या चित्रा-शिल्पांसाठी औंधमध्ये ए्क वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय उभारले.
अन्य पैलू
पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची वास्तू ज्या जागेवर उभी आहे ती जागा भवानरावांनी परिषदेला दिलेली आहे.