"शंकर पुरुषोत्तम जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: {{गल्लत|शंकर नारायण जोशी}} '''शंकर पुरुषोत्तम जोशी''' (जन्म : पाली, ९ मा... |
(काही फरक नाही)
|
२३:०९, १० ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
शंकर नारायण जोशी याच्याशी गल्लत करू नका.
शंकर पुरुषोत्तम जोशी (जन्म : पाली, ९ मार्च, इ.स. १८९४; मृत्यू : २० सप्टेंबर, इ.स. १९४३) हे एक मराठी इतिहास संशोधक होते.
शं.पु. जोशी यांचे व्हर्नाक्युलर फायनलपर्यंतचे शिक्षण रायगड जिल्ह्यातील पाली व महाड येथे झाले. नंतर सातारा जिख्यातील औंध येथे ते इंग्रजी शाळेत शिकले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्यांनी पुरवठा खात्यात नोकरी केली. त्या निमित्ताने त्यांना क्वेट्टा, अरबस्तान, इराण येथे जायला मिळाले. अरबी, पुश्तू, रशियन आदी बाषा ते उत्तमरीत्या शिकले. ती नोकरी संपल्यावर त्यांनी शिक्षकाची नोकरी केली.
मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर जाऊन जे कर्तृत्व गाजवले त्याची फारशी चिकित्सा झालेली नाही हे ध्यानात घेऊन जोशींनी आपल्या साहित्यातून महाराष्ट्राबाहेरील राजकारणावर विशेष लक्ष दिले..
शंकर पुरुषोत्तम जोशी यांनी लिहिलेली पुस्तके
- पंजाबातील नामदेव (१९३९) : महाराष्ट्रातील नामदेव आणि पंजाबातील नामदेव एकच आहेत हे सिद्ध करणारा (पहिला) ग्रंथ
- भक्तराज - श्री नामदेव जी (हिंदी)
- भाऊंच्या वीरकथा (१९३४)
- मराठ्यांच्या सत्तेचा उत्तरेकडील विस्तार (१९३६)
- राजस्थान-महाराष्ट्र संघर्ष (१९४३) : या पुस्तकात उत्तरेकडे मुलुखगिरी करणारे मराठा सरदार आणि फुटीर वृत्तीचे राजस्थानी राजे यांच्यामधील संबंधांची चिकित्सा केली आहे.
- शीखांचा स्फूर्तिदायक इतिहास (१९३९) : शीखांचा इतिहास सांगणारा मराठीतील पहिला ग्रंथ