Jump to content

शंकर पुरुषोत्तम जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शंकर पुरुषोत्तम जोशी (९ मार्च, इ.स. १८९४:पाली, रायगड जिल्हा, महाराष्ट्र - २० सप्टेंबर, इ.स. १९४३) हे एक मराठी इतिहास संशोधक होते.

शं.पु. जोशी यांचे व्हर्नाक्युलर फायनलपर्यंतचे शिक्षण रायगड जिल्ह्यातील पालीमहाड येथे झाले. नंतर सातारा जिख्यातील औंध येथे ते इंग्रजी शाळेत शिकले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्यांनी पुरवठा खात्यात नोकरी केली. त्या निमित्ताने त्यांना क्वेट्टा, अरबस्तान, इराण येथे जायला मिळाले. अरबी, पुश्तू, रशियन आदी बाषा ते शिकले. ती नोकरी संपल्यावर त्यांनी शिक्षकाची नोकरी केली.

मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर जाऊन जे कर्तृत्त्व गाजवले त्याची फारशी चिकित्सा झालेली नाही हे ध्यानात घेऊन जोशींनी आपल्या साहित्यातून महाराष्ट्राबाहेरील राजकारणावर विशेष लक्ष दिले.

पुस्तके

[संपादन]
  • पंजाबातील नामदेव (१९३९) : महाराष्ट्रातील नामदेव आणि पंजाबातील नामदेव एकच आहेत हे सिद्ध करणारा (पहिला) ग्रंथ
  • भक्तराज - श्री नामदेव जी (हिंदी)
  • भाऊंच्या वीरकथा (१९३४)
  • मराठ्यांच्या सत्तेचा उत्तरेकडील विस्तार (१९३६)
  • राजस्थान-महाराष्ट्र संघर्ष (१९४३) : या पुस्तकात उत्तरेकडे मुलुखगिरी करणारे मराठा सरदार आणि फुटीर वृत्तीचे राजस्थानी राजे यांच्यामधील संबंधांची चिकित्सा केली आहे.
  • शीखांचा स्फूर्तिदायक इतिहास (१९३९) : शीखांचा इतिहास सांगणारा मराठीतील पहिला ग्रंथ