Jump to content

"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३४: ओळ ३४:
* रघुवंश (काव्य)
* रघुवंश (काव्य)
* विक्रमोर्वशीयम् (नाटक)
* विक्रमोर्वशीयम् (नाटक)

==कालिदासाचे गंगाष्टक==

नमस्तेऽस्तु गङ्गे त्वदङ्गप्रसङ्गाद्भुजं गास्तुरङ्गाः कुरङ्गाः प्लवङ्गाः ।

अनङ्गारिरङ्गाः ससङ्गाः शिवाङ्गा भुजङ्गाधिपाङ्गीकृताङ्गा भवन्ति ॥ १॥

नमो जह्नुकन्ये न मन्ये त्वदन्यैर्निसर्गेन्दुचिह्नादिभिर्लोकभर्तुः ।

अतोऽहं नतोऽहं सतो गौरतोये वसिष्ठादिभिर्गीयमानाभिधेये ॥ २॥

त्वदामज्जनात्सज्जनो दुर्जनो वा विमानैः समानः समानैर्हि मानैः ।

समायाति तस्मिन्पुरारातिलोके पुरद्वारसंरुद्धदिक्पाललोके ॥ ३॥

स्वरावासदम्भोलिदम्भोपि रम्भापरीरम्भसम्भावनाधीरचेताः ।

समाकाङ्क्षते त्वत्तटे वृक्षवाटीकुटीरे वसन्नेतुमायुर्दिनानि ॥ ४॥

त्रिलोकस्य भर्तुर्जटाजूटबन्धात्स्वसीमान्तभागे मनाक्प्रस्खलन्तः ।

भवान्या रुषा प्रोढसापन्तभावात्करेणाहतास्तवत्तरङ्गा जयन्ति ॥ ५॥

जलोन्मज्जदैरावतोद्दानकुम्भस्फुरत्प्रस्खलत्सान्द्रसिन्दूररागे ।

क्कचित्पद्मिनीरेणुभङ्गे प्रसङ्गे मनः खेलतां जह्नुकन्यातरङ्गे ॥ ६॥

भवत्तीरवानीरवातोत्थधूलीलवस्पर्शतस्तत्क्षणं क्षीणपापः ।

जनोऽयं जगत्पावने त्वत्प्रसादात्पदे पौरुहूतेऽपि धत्तेऽवहेलाम् ॥ ७॥

त्रिसन्ध्यानमल्लेखकोटीरनानाविधानेकरत्नांशुबिम्बप्रभाभिः ।

स्फुरत्पादपीठे हठेनाष्टमूर्तेर्जटाअजूटवासे नताः स्मः पदं ते ॥ ८॥

इदं यः पठेदष्टकं जह्नुपुत्र्यास्रिकालं कृतं कालिदासेन रम्यम् ।

समायास्यतीन्द्रादिभिर्गीयमानं पदं कैशवं शैशवं नो लभेत्सः ॥ ९॥

इति श्रीकालिदासकृतं गङ्गाष्टकस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

==कालिदासाची मराठी चरित्रे व कालिदासासंबंधी अन्य पुस्तके==
==कालिदासाची मराठी चरित्रे व कालिदासासंबंधी अन्य पुस्तके==

१४:३५, २४ जुलै २०१५ ची आवृत्ती

राजा रविवर्म्याने काढलेले शकुंतलेचे एक चित्र काटा रुते कुणाला

कालिदास हा प्राचीन भारतातील एक संस्कृत नाटककार आणि कवी होता. मेघदूत, रघुवंशम्, कुमारसंभवम् ऋतुसंहार आदि संस्कृत महाकाव्यांचा कर्ता म्हणून तो सुपरिचित आहे. सुमारे चौथे शतक ते सहावे शतक या काळात अथवा गुप्त साम्राज्याचा कालखंडात तो होऊन गेला असावा, असे मानले जाते. विक्रमोर्वशीयम्, मालविकाग्निमित्रम्, आणि अभिज्ञानशाकुंतलम ही त्याने लिहिलेली संस्कृत नाटकेदेखील प्रसिद्ध आहेत.

जीवन

आख्यायिका:- कालिदास हा बालपणी न शिकलेला व कमी बुद्धी असलेला होता. त्याची पत्नी ही प्रकांड पंडिता व विदुषी होती. लग्न झाल्यावर त्यास त्याच्या पत्नीने विचारले:अस्ति कश्चित वाग्विशेषः?(वाङ्‌मयाबद्दल काही विशेष ज्ञान आहे काय?). कालिदास या बाबतीत अगदीच अनभिज्ञ होता. पत्नीचे बोलणे अपमास्पद वाटून त्याने जंगलाची वाट धरली आणि तेथे काली देवीची प्रार्थना व तपस्या करून वरदान मिळविले. परत आल्यावर त्याने पत्नीच्या प्रश्नाला उत्तर म्हणून ’अस्ति’,कश्चित’ आणि ’वाग्’ या आरंभीच्या तीन शब्दांनी सुरू होणारे साहित्य रचले.

’अस्ति’पासून - अस्ति उत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः । पूर्वापरौ तोयनिधी विगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्डः॥ ...कुमारसंभव
’कश्चित्‌’पासून - कश्चित्कांता विरहगुरुणां स्वाधिकारात्प्रमत्तः.। शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ॥...मेघदूत
’वाग्‌’पासून - वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये। जगत: पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ॥ ...रघुवंश

विदर्भ देशाची राजकन्या इंदुमती हिचे स्वयंवर मांडले आहे. देशोदशी राजेमहाराजे या स्वयंवरात भाग घेण्यासाठी आपापल्या लवाजम्यासह दाखल झाले आहेत. प्रत्यक्ष स्वयंवराला प्रारंभ झाल्यावर तो विस्तीर्ण राजप्रासाद देशोदेशींच्या राजेरजवाडय़ांनी आपापली आसने भूषविल्यानंतर अधिकच शोभायमान झाला आहे. पृथ्वीवरचे सगळे ऐश्वर्य, शौर्य, सौंदर्य जणू काही अतिविशाल स्वयंवर मंडपात एकवटले आहे. स्वरूपसुंदर इंदुमती कोणाला माळ घालील याची उत्सुकता सर्वांच्या चेहऱ्यावर दाटून राहिली आहे. इंदुमती आपली प्रिय सखी सुनंदा हिच्यासोबत त्या मंडपात दाखल झाली. हातात वरमाला घेतलेली इंदुमती एकेका राजाचे सूक्ष्म निरीक्षण करीत सावकाश एकेक पाऊल टाकत पुढे पुढे जाऊ लागली. चतुर सुनंदा मोठ्या मार्मिक शब्दांत एकेका राजाचे वर्णन करू लागली. हा प्रसंग रंगवून सांगतांना महाकवी कालिदासाने एक अतिरम्य अशी उपमा वापरली आहे. उपमा कालिदासस्य असे म्हणतातच. ते सार्थ आणि समर्पक वाटावे, अशी ती उपमा आहे. मूळ श्लोक असा आहे -

संचारिणी दीपशिखेव रात्रौ यं यं व्यतीयाय पतिंवरा सा ।

नरेंद्रमार्गाट्ट इव प्रपेदे विवर्णभावं स स भूमिपाल: ।।

रघुवंश ६.६७

”रात्रीच्या वेळी राजमार्गावरून एखादी दिव्याची ज्योत कोणीतरी पुढे पुढे नेत असावे, आणि त्या ज्योतीचा प्रकाश राजमार्गावर असलेल्या मोठमोठ्या इमारतींच्या दर्शनी भागावर पडत राहावा; ज्योत पुढे गेली की मागच्या इमारतींचा दर्शनी भाग अंधारात अदृश्य व्हावा; ज्योत ज्या महालासमोरून चालली असेल तेवढाच महाल प्रकाशमान व्हावा, त्याचप्रमाणे इंदुमती ज्या ज्या राजाच्या पुढून जाई त्यावेळी, इंदुमती तिच्या हातातील वरमाला आपल्या गळ्यात घालील, अशा आशेने त्या त्या राजाचा चेहरा त्या वेळेपुरता उजळून निघे, आणि इंदुमती पुढे गेल्यावर तो निराशेने काळाठिक्कर पडे.” किती छान उपमा आहे पाहा ! या उपमेवरून कालिदासाला दीपशिखा कालिदास असे गौरविले जाते.

मेघदूतातल्या दुसऱ्या श्लोकातील शेवटच्या दोन ओळी -
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।। अशा आहेत. यावरून आषाढ महिन्याचा पहिला दिवस, म्हणजेच आषाढ शुद्ध प्रतिपदा ही तिथी, कालिदास जयंती म्हणून पाळली जाते.

कालिदासाचे साहित्य

• अभिज्ञानशाकुंतलम्‌ (नाटक)
• ऋतुसंहार (काव्य)
• कुमारसंभवम्‌ (काव्य)
• गंगाष्टक (काव्य)
• मालविकाग्निमित्रम् (नाटक)
• मेघदूत (खंडकाव्य)
• रघुवंश (काव्य)
• विक्रमोर्वशीयम् (नाटक)

कालिदासाचे गंगाष्टक

नमस्तेऽस्तु गङ्गे त्वदङ्गप्रसङ्गाद्भुजं गास्तुरङ्गाः कुरङ्गाः प्लवङ्गाः ।
अनङ्गारिरङ्गाः ससङ्गाः शिवाङ्गा भुजङ्गाधिपाङ्गीकृताङ्गा भवन्ति ॥ १॥

नमो जह्नुकन्ये न मन्ये त्वदन्यैर्निसर्गेन्दुचिह्नादिभिर्लोकभर्तुः ।
अतोऽहं नतोऽहं सतो गौरतोये वसिष्ठादिभिर्गीयमानाभिधेये ॥ २॥

त्वदामज्जनात्सज्जनो दुर्जनो वा विमानैः समानः समानैर्हि मानैः ।
समायाति तस्मिन्पुरारातिलोके पुरद्वारसंरुद्धदिक्पाललोके ॥ ३॥

स्वरावासदम्भोलिदम्भोपि रम्भापरीरम्भसम्भावनाधीरचेताः ।
समाकाङ्क्षते त्वत्तटे वृक्षवाटीकुटीरे वसन्नेतुमायुर्दिनानि ॥ ४॥

त्रिलोकस्य भर्तुर्जटाजूटबन्धात्स्वसीमान्तभागे मनाक्प्रस्खलन्तः ।
भवान्या रुषा प्रोढसापन्तभावात्करेणाहतास्तवत्तरङ्गा जयन्ति ॥ ५॥

जलोन्मज्जदैरावतोद्दानकुम्भस्फुरत्प्रस्खलत्सान्द्रसिन्दूररागे ।
क्कचित्पद्मिनीरेणुभङ्गे प्रसङ्गे मनः खेलतां जह्नुकन्यातरङ्गे ॥ ६॥

भवत्तीरवानीरवातोत्थधूलीलवस्पर्शतस्तत्क्षणं क्षीणपापः ।
जनोऽयं जगत्पावने त्वत्प्रसादात्पदे पौरुहूतेऽपि धत्तेऽवहेलाम् ॥ ७॥

त्रिसन्ध्यानमल्लेखकोटीरनानाविधानेकरत्नांशुबिम्बप्रभाभिः ।
स्फुरत्पादपीठे हठेनाष्टमूर्तेर्जटाअजूटवासे नताः स्मः पदं ते ॥ ८॥

इदं यः पठेदष्टकं जह्नुपुत्र्यास्रिकालं कृतं कालिदासेन रम्यम् ।
समायास्यतीन्द्रादिभिर्गीयमानं पदं कैशवं शैशवं नो लभेत्सः ॥ ९॥

इति श्रीकालिदासकृतं गङ्गाष्टकस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

कालिदासाची मराठी चरित्रे व कालिदासासंबंधी अन्य पुस्तके

• कालिदास (लेखक : वा.वि. मिराशी)
• कालिदास आणि शाकुंतल: एक अर्घ्यदान (लेखक - त्र्यं.वि. सरदेशमुख; संपादन कवी नीतीन वैद्य)
• काव्यशास्त्राचा मापदंड - महाकवी कालिदास (लेखिका - सौ. पुष्पा गोटखिंडीकर)
• महाकवी कालिदास (लेखक - कुंदन तांबे)
• महाकवी (कालिदासाच्या जीवनावरील मराठी कादंबरी; मूळ लेखिका - डॉ. जयश्री गोसावी महंत, अनुवाद : नीलिमा पटवर्धन)

कालिदासाच्या नावाच्या संस्था

• कालिदास अकादमी, उज्जैन. ही संस्था दरवर्षी कालिदास समारोह आयोजित करते.
• महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक
• महाकवी कालिदास : काव्यरंग प्रतिभा विलास (नृत्य, चित्रप्रदर्शन आणि व्याख्यानांचा कार्यक्रम)
• महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड (मुंबई)
• कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक
• महाकवी कालिदास साहित्य कला संस्कृती मंच, वडगाव धायरी, पुणे. या संस्थेने १४ जुलै २०१३रोजी ’कालिदास साहित्य संमेलन’ भरवले होते.

कालिदास सन्मान

मुळ लेख:कालिदास सन्मान पुरस्कार

• कालिदास सन्मान पुरस्कार : हा भारतातील मध्य प्रदेश राज्य शासनातर्फे कलाक्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी इ.स. १९८०सालापासून देण्यात येणारा मानाचा पुरस्कार आहे. हा सन्मान मिळालेल्या व्यक्ती -
• सुमती मुटाटकर (२००२)
• अनुपम खेर (२०११)
• गिरीश कर्नाड
• बाबासाहेब पुरंदरे (२००७)
• उस्ताद अल्लारखाँ (१९९६)
• मल्लिकार्जुन मन्सूर (१९८१)
• कन्नड कवी डॉ. चंद्रशेखर कंबार
• पु.ल. देशपांडे (१९८९)
• पंडित बिरजू महाराज
• विजय तेंडुलकर
• सत्यदेव दुबे

दुसरे सन्मान

• कोकण मराठी परिषदेचा ‘कालिदास पुरस्कार’ : हा गोमंतकीय साहित्यिक, समीक्षक पु. शि. नार्वेकर यांना २०१२ साली देण्यात आला.
• महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार : हरिभाऊ मुरकुटे (२०११); हरेकृष्ण शतपथी (२०१३)+अनेक

काव्ये

बाह्य दुवे