"मेघदूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
'''मेघदूत''' हे कवी [[कालिदास|कालिदासाने]] लिहिलेले [[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेतील]] |
'''मेघदूत''' हे कवी [[कालिदास|कालिदासाने]] लिहिलेले [[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेतील]] खंडकाव्य आहे. या खंडकाव्याचा रचनाकाळ [[गुप्त साम्राज्य|गुप्तकाळात]] इ.स.चे ४ थे शतक ते इ.स.चे ६ वे शतक या कालखंडातला असल्याचे मानले जाते. पत्नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्नीला [[ढग|मेघाबरोबर]] धाडलेल्या संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत आधारले आहे. अनेक कवींनी मेघदूताचे मराठी भावानुवाद केले आहेत - त्यापैकी [[कुसुमाग्रज|कुसुमाग्रज]] (१९६१) व वसंत पटवर्धन (१९८१) ही नावे महत्त्वाची आहेत.. |
||
==कथासूत्र== |
==कथासूत्र== |
||
मेघदूताचा नायक (यक्ष) हा अलका नगरीत राहणारा यक्षेश्वराचा एक सेवक होता. नेमून दिलेल्या कामात अापल्या पत्नीच्या नादाने हलगर्जीपणा केल्याने त्या यक्षाला, यक्षराजाने (कुबेराने) एका वर्षासाठी हद्दपारीची शिक्षा फर्माविली. हद्दपारीचे ठिकाण अलका नगरीहून फार दूर अंतरावर असलेला 'रामगिरि' पर्वत हे होते. त्या ठिकाणी बरेच महिने पत्नीपासून दूर राहिला असताना, कामीजनांना अत्यंत पीडा देणारा वर्षाऋतू सुरू झाला. तेव्हा त्या यक्षाच्या मनोवृत्ती एकदम उचंबळून अाल्या. त्या निर्जन प्रदेशात यक्षाला चेतन व अचेतन याचेही भान राहिले नाही. त्यामुळे त्या यक्षाने मेघालाच दूत कल्पून अापल्या पत्नीला निरोप सांगण्याचे काम सोपविले. |
|||
प्रथम रामगिरीपासून अलका नगरीपर्यंत जाणार्या मार्गाचे रसभरित वर्णन करून करुणरसपरिप्लुत असा संदेश प्रियेस सांगून प्रियेचे शुभवर्तमान मला परत येऊन देण्याचे सांगून यक्षाने मेघाची अलका नगरीकडे रवानगी केली. येथेच या काव्याची परिसमाप्ती करण्यात अाली अाहे.<ref>संपादक: रामचंद्रशास्त्री किञ्जवडेकर यांचे संपादकीय निवेदन (महाकवि श्रीकालिदासविरचित 'मेघदूत' (१९३५) भाषान्तरकार :रामचंद्र गणेश बोरवणकर) </ref> |
|||
== मेघदूतावर आधारित चित्रे == |
== मेघदूतावर आधारित चित्रे == |
||
ओळ १०: | ओळ १२: | ||
* मल्लिनाथ (रामचंद्र गणेश बोरवणकर यांनी या टीकाग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे.) |
* मल्लिनाथ (रामचंद्र गणेश बोरवणकर यांनी या टीकाग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे.) |
||
* वल्लभदेव (महाविद्यालयीन अभ्यासासाठी या टीकाग्रंथाचा इंग्रजी अनुवाद R..R. Deshpande व T.K. Tope यांनी केला आहे.) |
* वल्लभदेव (महाविद्यालयीन अभ्यासासाठी या टीकाग्रंथाचा इंग्रजी अनुवाद R..R. Deshpande व T.K. Tope यांनी केला आहे.) |
||
===अन्य टीकाकार=== |
|||
* कृष्णपति, कृष्णमाचारियर,. जगद्धर, जतीन्द्रविमल चौधरी, दक्षिणावर्तनाथ, दिनकर मिश्र, परमेश्वर, पूर्णसरस्वती, भरतमल्लिक, महिमसंघगणि, विजयसूरिगणि, सुमतिविजय, हरगोविंद आणि ’सारोद्धारिण” लिहिणारा एक अज्ञात लेखक वगैरे मेघदूताचे एकूण ६३ टीकाकार असल्याचे संस्कृत पंडित डॉ. एन.पी. उन्नी यांनी म्हटले आहे. |
|||
==मेघदूताचे अनुवाद== |
==मेघदूताचे अनुवाद== |
१५:१६, १५ जुलै २०१५ ची आवृत्ती
मेघदूत हे कवी कालिदासाने लिहिलेले संस्कृत भाषेतील खंडकाव्य आहे. या खंडकाव्याचा रचनाकाळ गुप्तकाळात इ.स.चे ४ थे शतक ते इ.स.चे ६ वे शतक या कालखंडातला असल्याचे मानले जाते. पत्नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्नीला मेघाबरोबर धाडलेल्या संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत आधारले आहे. अनेक कवींनी मेघदूताचे मराठी भावानुवाद केले आहेत - त्यापैकी कुसुमाग्रज (१९६१) व वसंत पटवर्धन (१९८१) ही नावे महत्त्वाची आहेत..
कथासूत्र
मेघदूताचा नायक (यक्ष) हा अलका नगरीत राहणारा यक्षेश्वराचा एक सेवक होता. नेमून दिलेल्या कामात अापल्या पत्नीच्या नादाने हलगर्जीपणा केल्याने त्या यक्षाला, यक्षराजाने (कुबेराने) एका वर्षासाठी हद्दपारीची शिक्षा फर्माविली. हद्दपारीचे ठिकाण अलका नगरीहून फार दूर अंतरावर असलेला 'रामगिरि' पर्वत हे होते. त्या ठिकाणी बरेच महिने पत्नीपासून दूर राहिला असताना, कामीजनांना अत्यंत पीडा देणारा वर्षाऋतू सुरू झाला. तेव्हा त्या यक्षाच्या मनोवृत्ती एकदम उचंबळून अाल्या. त्या निर्जन प्रदेशात यक्षाला चेतन व अचेतन याचेही भान राहिले नाही. त्यामुळे त्या यक्षाने मेघालाच दूत कल्पून अापल्या पत्नीला निरोप सांगण्याचे काम सोपविले.
प्रथम रामगिरीपासून अलका नगरीपर्यंत जाणार्या मार्गाचे रसभरित वर्णन करून करुणरसपरिप्लुत असा संदेश प्रियेस सांगून प्रियेचे शुभवर्तमान मला परत येऊन देण्याचे सांगून यक्षाने मेघाची अलका नगरीकडे रवानगी केली. येथेच या काव्याची परिसमाप्ती करण्यात अाली अाहे.[१]
मेघदूतावर आधारित चित्रे
मेघदूतामध्ये कालिदासाने प्राचीनकालीन भारताची अनेक दृश्ये वर्णिली आहेत. त्यांच्यावर आधारित कल्पनाचित्रे अनेक चित्रकारांनी रंगवली आहेत. कदाचित त्यांपैकी सर्वात सुंदर चित्रे पुण्याचे चित्रकार नाना जोशी यांची म्हणावी लागतील. त्यांतील काही चित्रे http://www.joshiartist.in/kalidas-meghaduta/ ह्या त्यांच्या संकेतस्थळावर पहावयास मिळतील.
मेघदूतावरील प्रसिद्ध टीकागंथ
- मल्लिनाथ (रामचंद्र गणेश बोरवणकर यांनी या टीकाग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे.)
- वल्लभदेव (महाविद्यालयीन अभ्यासासाठी या टीकाग्रंथाचा इंग्रजी अनुवाद R..R. Deshpande व T.K. Tope यांनी केला आहे.)
अन्य टीकाकार
- कृष्णपति, कृष्णमाचारियर,. जगद्धर, जतीन्द्रविमल चौधरी, दक्षिणावर्तनाथ, दिनकर मिश्र, परमेश्वर, पूर्णसरस्वती, भरतमल्लिक, महिमसंघगणि, विजयसूरिगणि, सुमतिविजय, हरगोविंद आणि ’सारोद्धारिण” लिहिणारा एक अज्ञात लेखक वगैरे मेघदूताचे एकूण ६३ टीकाकार असल्याचे संस्कृत पंडित डॉ. एन.पी. उन्नी यांनी म्हटले आहे.
मेघदूताचे अनुवाद
- हिंदी गद्य अनुवाद
- मेघदूत : मराठी समश्लोकी, समछंदी अनुवाद - चिंतामणराव देशमुख
- मेघदूत (मराठी पद्य अनुवाद) - रा. प. सबनीस, कृष्णशास्त्री चिपळूणकर, डॉ. श्रीखंडे, कात्रे, ना.ग. गोरे, वसंतराव पटवर्धन, बा.भ. बोरकर, कुसुमाग्रज, शांता शेळके, द.वें. केतकर, अ.ज. विद्वांस वगैरे. यांपैकी चिंतामणराव देशमुख, पंडित ग.वि. कात्रे, बा.भ. बोरकर, द.वें. केतकर व अ.ज. विद्वांस या पाच जणांनी मेघदूताच्या मूळ ‘मंदाक्रान्ता’ या वृत्तातच मराठीतून काव्यानुवाद केला आहे.. बाकीच्यांनी निरनिराळ्या जातिवृत्तांतून जसे- साफी, समुदितमदता किंवा मुक्तछंदामध्ये अनुवाद केले आहेत.
समश्लोकी अनुवादाचे नमुने
मूळ संस्कृत श्लोक (पूर्व मेघ-श्लोक ७वा, वृत्त -मंदाक्रांन्ता) पुढीलप्रमाणे -
संतप्तानां त्वमसि शरणं तत्पयोद प्रियाया:।।
संदेशं मे हर धनपतिक्रोधविश्लेशितस्य।।
गन्तव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वराणां।।
बाह्योद्यानस्थितहरशिरश्चंद्रिकाधौतहर्म्या।।
गद्यार्थ- हे मेघा, संतप्तांचा, व्यथितांचा तू निवारा आहेस. स्वामींच्या शापामुळे मी माझ्या सखीचा विरह फार कष्टाने सहन करतो आहे. तेव्हा माझा निरोप तेवढा माझ्या प्रिय सखीला पोहोचवण्याची विनंती तुला करतो आहे. तुला यक्षांच्या अलकानगरीमध्ये जायचे आहे. तिच्यामधले महाल, वाडे, बाहेरच्या उद्यानात असलेल्या शंभूशीर्षांवरील चंद्राच्या प्रकाशाने उजळून निघाले आहेत.
मराठी काव्यानुवाद- (वृत्त-मंदाक्रान्ता) -
१). संतप्तांचा अससि जलदा आसरा तूं, निरोप
कांतेला दे, विरह घडवी आमुचा स्वामि-कोप
यक्षेशाचें नगर अलका तेथ जा, सौध जेथ
बाह्योद्यानीं वसत हर तच्चंद्रिका द्योतवीत।।
(चिंतामणराव देशमुख)
२). तप्तांची तू कणव जलदा! प्रीती संदेश देई
स्वामीक्रोधें सखि विलग मी पोळतो येथ पाही
यक्षेशाच्या नगर अलके जा जिथें हर्म्यकेन्द्रे
बाह्य़ोद्यानी हर उजळूनी क्षालितो भालचंद्रे।।
(बा.भ. बोरकर)
३) संतप्तांना निरविशी xx क्षेम सांगे प्रियेस
दूरप्रान्ती विरहि पडलो क्रुद्ध होता धनेश
यक्षेशाचि नगरी अलका गांठली पाहिजेस
पाही तेथे धवलित उमानाथ चंद्रे निवास।।
(पंडित ग.नि. कात्रे)
४). निवारा तू जलद व्यथितां ने निरोप प्रियाते
स्वामीशापे सखिविरह मी साहतो फार कष्टे
जायाचे तूं नगरि अलका धाम यक्षेश्वरांचे
बाह्योद्यानी धवलि इमले चंद्रमाथी शिवाचे।।
(अ.ज. विद्वांस)
५) बाह्योद्यानी शिव-शशिकरें दीप्त ते हर्म्य जेथे
यक्षेशाची वसति अलका, जायचे जाण तेथे
तप्तां देशी उपशम तसा तू मदीयें निरोपे
जा मत्कान्तेप्रति विघटनें दूर मी स्वामिकोपे।।
(द. वें. केतकर)
संदर्भ
- ^ संपादक: रामचंद्रशास्त्री किञ्जवडेकर यांचे संपादकीय निवेदन (महाकवि श्रीकालिदासविरचित 'मेघदूत' (१९३५) भाषान्तरकार :रामचंद्र गणेश बोरवणकर)
बाह्य दुवे
- शोभना आगाशे. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=170819:2011-07-15-20-01-01&catid=252:2009-12-30-13-45-38&Itemid=250. Missing or empty
|title=
(सहाय्य) - चित्रकार नाना जोशी. (इंग्रजी भाषेत) http://www.joshiartist.in/kalidas-meghaduta/. Missing or empty
|title=
(सहाय्य)