Jump to content

"शं.नी. चाफेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५: ओळ १५:
आपली नाट्यसंस्था लयास गेल्यावर शंकराव चाफेकरांनी मूक चित्रपटांत कामे करायला सुरुवात केली.
आपली नाट्यसंस्था लयास गेल्यावर शंकराव चाफेकरांनी मूक चित्रपटांत कामे करायला सुरुवात केली.


आळतेकर हे [[दिल्ली]] आणि पुणे येथील [[आकाशवाणी]] केंद्रांवर वृत्तनिवेदक होते. दिल्लीत दीड वर्षे तर पुण्यात २५ वर्षे..
चाफेकर हे [[दिल्ली]] आणि पुणे येथील [[आकाशवाणी]] केंद्रांवर वृत्तनिवेदक होते. दिल्लीत दीड वर्षे तर पुण्यात २५ वर्षे..


==मानापमान आणि सौभद्र संयुक्त प्रयोग==
==मानापमान आणि सौभद्र संयुक्त प्रयोग==
ओळ ३९: ओळ ३९:
==पुरस्कार आणि सन्मान==
==पुरस्कार आणि सन्मान==
* शंकरराव चाफेकरांच्या कलेचे पहिले जाहीर कौतुक केले ते [[न.चिं. केळकर|तात्यासाहेब केळकरांनी]]. त्यांनी एका सार्वजनिक गणपतीसमोर झालेल्या गाण्याच्या कार्यक्रमात चाफेकरांना सुवर्णपदक दिले.
* शंकरराव चाफेकरांच्या कलेचे पहिले जाहीर कौतुक केले ते [[न.चिं. केळकर|तात्यासाहेब केळकरांनी]]. त्यांनी एका सार्वजनिक गणपतीसमोर झालेल्या गाण्याच्या कार्यक्रमात चाफेकरांना सुवर्णपदक दिले.
* ’वीरकुमारी’ या नाटकातील शंकररावांची भूमिका पाहून [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांनी]]ही त्यांना सुवर्णपदक प्रदान केले होते.
* ’वीरकुमारी’ या नाटकातील शंकररावांची भूमिका पाहून [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांनी]]ही चाफेकरांना सुवर्णपदक प्रदान केले होते.
* शं.नी. चाफेकरांच्या ’स्मृतिधन’ या आत्मचरित्राला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट ग्रंथलेखनासाठीचा पुरस्कार मिळाला आहे.
* १९६२ साली नागपुरात झालेल्या ४४व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्य संमेलनाचे]] अध्यक्षपद भूषविण्याचा मान शं.नी. चाफेकरांना मिळाला.
* १९६२ साली नागपुरात झालेल्या ४४व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्य संमेलनाचे]] अध्यक्षपद भूषविण्याचा मान शंकरराव नीळकंठ चाफेकरांना मिळाला.





१८:१८, २१ मे २०१५ ची आवृत्ती

शंकर नीळकंठ चाफेकर ( जन्म : २७ जानेवारी, १८९६) हे एक मराठी नाटकांतून प्रामुख्याने स्त्रीभूमिका भूमिका करणारे गायक नट होते. चाफेकर हे मूळचे पुण्याचे. रस्त्यावरून दारोदार भटकत भीक मागत फिरणार्‍या जंगमाचे गाणे ऐकून त्यांना लहानपणापासूनच गाण्याचे ्वेड लागले. त्यांच्या गाणे ऐकण्याच्या सवयीला घरातून प्रोत्साहनच मिळाले आणि शंकररावाना नाट्के आवडू लागली. लहान वयात पाहिलेल्या ’हरिश्चंद्र’, शाकुंतल’ ’कीचकवद्ध’ दारख्या नाटकांनी त्यांच्यावर चांगलाच परिणाम केला.

श.नी. चाफेकरांनी पुयातील न्यू इंग्लिश स्कूलमधून मॅट्रिक केले. शाळेत असताना स्नेहसंमेलनांमध्ये होणार्‍या नाटकांत काम करण्याच्या आलेल्या संधी त्यांनी नाकारल्या. आपल्याला एकदम व्यावसायिक नाटकामध्येच काम करावयाचे आहे, आणि तेही बी.ए. झाल्यानंतर, असे ते म्हणत. पुढील आयुष्यात त्यांनी नाटकांत कामे केली, पण ते शेवटपर्यंत बी.ए होऊ शकले नाहीत.

संगीत शिक्षण आणि नाट्यसंस्थांमध्ये प्रवेश

नाटकांतील भूमिकांसाठी आवश्यक म्हणून शंकररावांनी स्वतःच्या स्वतःच पेटी शिकायला सुरुवात केली. पेटीबरोबर ते नाट्यसंगीतही गाऊ लागले. व्यावसायिक नट होण्यासाठी ते पुण्यातील अनंत हरी गद्रे यांच्या हिंदू नाटक मंडळीत नोकरी करू लागले. २८ ऑक्टोबर १९२८ रोजी शं.नी. चाफेकरांनी किर्लोस्कर रंगामंदिरात झालेल्या ’स्वराज्य सुंदरी’ या नाटकात आयुष्यातली पहिली भूमिका केली. नंतर गद्र्‍यांच्याच ’वीरकुमारी’ आणि ’माझा देश’ या नाटकांतल्या नायिकेच्या भूमिका त्यांना मिळाल्या. शंकररावांनी १९१८ सालापासून ते १९५३ सालापर्यंत अनेकानेक नाटकांतोन स्त्री आणि पुरुष भूमिका केल्या. पुढे त्यांनी काही नाटकांचे दिग्दर्शनही केले.

१९ एप्रिल १९२१ रोजी शंकरराव केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श या नाट्यसंस्थेत दाखल झाले आणि मामा वरेरकर आणि इतर अनेक नाटककारांच्या नाटकांत स्त्रीभूमिका केल्या.

इ.स. १९२मध्ये शं.नी. चाफेकरांनी स्वतःची नाटक कंपनी काढली आणि जुन्याच नाटकांचे पुनरुज्जीवन करून ती नाटके रंगमंचावर सादर करायला सुरुवात केली. या कंपनीचे अप्पासाहेब टिपणिसांनी लिहिलेले ’राजरंजन’ हे नाटक खूप चालले. ही नाटक कंपनी मात्र थोड्या काळातच बंद पडली.

चित्रपटात भूमिका, वृत्तनिवेदन आणि आत्मचरित्र

आपली नाट्यसंस्था लयास गेल्यावर शंकराव चाफेकरांनी मूक चित्रपटांत कामे करायला सुरुवात केली.

चाफेकर हे दिल्ली आणि पुणे येथील आकाशवाणी केंद्रांवर वृत्तनिवेदक होते. दिल्लीत दीड वर्षे तर पुण्यात २५ वर्षे..

मानापमान आणि सौभद्र संयुक्त प्रयोग

मराठी संगीत रंगभूमीच्या उतरत्या काळात रंगमंचावर झालेले ’मानापमान’ आणि ’सौभद्र’ या नाटकांचे संयुक्त प्रयोग हे त्या काळचे आश्चर्य होते. बालगंधर्व आणि केशवराव भोसले या दोनही नटश्रेष्ठांनी या नाटकांत कामे केली होती. संयुक्त ’मानापमान’मध्ये अक्काची महत्त्वाची भूमिका करण्याचे भाग्य शंकराव चाफेकरांना मिळाले होते. संयुक्त ’सौभद्र’मध्येही त्यांनी एक लहानशी भूमिका केली होती.

श.नी. चाफेकर यांनी कामे केलेल्या नाटकांची नावे आणि त्यांतील त्यांच्या भूमिका

  • तुरुंगाच्या दारात (नायिका)
  • माझा देश (नायिका)
  • मानापमान (भामिनी)
  • मूकनायक (सरोजिनी)
  • मृच्छकटिक (वसंतसेना)
  • विद्याहरण (देवयानी)
  • वीरकुमारी (नायिका)
  • शहाशिवाजी (सईबाई)
  • शाकुंतल (शकुंतला)
  • सत्तेचे गुलाम (नायिका)
  • संन्याशाचा संसार (नायिका)
  • सोन्याचा कळस (नायिका)
  • स्वयंसेवक (नायिका)
  • स्वराज्य सुंदरी (नायिका)
  • हाच मुलाचा बाप (मंजिरी)

पुरस्कार आणि सन्मान

  • शंकरराव चाफेकरांच्या कलेचे पहिले जाहीर कौतुक केले ते तात्यासाहेब केळकरांनी. त्यांनी एका सार्वजनिक गणपतीसमोर झालेल्या गाण्याच्या कार्यक्रमात चाफेकरांना सुवर्णपदक दिले.
  • ’वीरकुमारी’ या नाटकातील शंकररावांची भूमिका पाहून लोकमान्य टिळकांनीही चाफेकरांना सुवर्णपदक प्रदान केले होते.
  • शं.नी. चाफेकरांच्या ’स्मृतिधन’ या आत्मचरित्राला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट ग्रंथलेखनासाठीचा पुरस्कार मिळाला आहे.
  • १९६२ साली नागपुरात झालेल्या ४४व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान शंकरराव नीळकंठ चाफेकरांना मिळाला.