Jump to content

"बबनराव नावडीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
बबनराव नावडीकर हे [[बालगंधर्व|बालगंधर्वांचे]] भक्त असल्याने त्यांनी [[बालगंधर्व|बालगंधर्वांची]] गायकी तरुण पिढीपुढे नेण्यासाठी अतोनात परिश्रम केले. [[बालगंधर्व|गंधर्वांचे]] फोटो आणि माहिती यांचे एक प्रदर्शन नावडीकरांनी गावोगाव नेऊन सुमारे बाराशे ठिकाणी भरवले.

==नावडीकर कुटुंब==
नावडीकरांच्या परिवारात मेधा नावडीकर, मुग्धा नावडीकर या दोघी गायिका आहेत, तर प्रा. विजय नावडीकर हे हार्मोनिअमवादक आहेत.

==बबनराव नावडीकर यांनी गायिलेली आणि ध्वनिमुद्रित झालेली भावगीते==
==बबनराव नावडीकर यांनी गायिलेली आणि ध्वनिमुद्रित झालेली भावगीते==
* आम्ही दोघं राजाराणी
* आम्ही दोघं राजाराणी
* उदास तू आवर ते नयनांतिल पाणी (गीतरामायणातील गाणे)
* उदास तू आवर ते नयनांतिल पाणी (गीत रामायणातील गाणे)
* कुणीआलं कुणी गेलं
* कुणीआलं कुणी गेलं
* जा रे चंद्रा क्षणभर जा
* जा रे चंद्रा क्षणभर जा

२२:४६, ४ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

बबनराव नावडीकर (मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी) (जन्म : नावडी, १९ ऑगस्ट, १९२२; मृत्यू : २९ मार्च, २००६) हे मराठी गायक, कवि, लेखक व कीर्तनकार होते. त्यांचे वडीलही कीरने करीत. बालगंधर्वांबरोबर त्यांनी काही नाटकांत भूमिकाही केल्या होत्या. बबनराव नावडीकरांनी ३०-४० वर्षे स्वतःच्या आवाजात गीतरामायणाचे कार्यक्रम केले होते. सुधीर फडके यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आकाशवाणीने बबनरावांना ’उदास तो आवरे ते’ ही गाणे म्हणायला सांगितले होते. एकेकाळी पुण्यातील कोणताही लग्नसमारंभ बबनराव नावडीकरांच्या मंगलाष्टकांशिवाय होत नसे. गायक हृषीकेश रानडे यांच्या प्राजक्ता जोशीशी झालेल्या लग्नात मंगलाष्टका म्हणायला बबनराव नावडीकर होते.

बबनराव नावडीकर हे बालगंधर्वांचे भक्त असल्याने त्यांनी बालगंधर्वांची गायकी तरुण पिढीपुढे नेण्यासाठी अतोनात परिश्रम केले. गंधर्वांचे फोटो आणि माहिती यांचे एक प्रदर्शन नावडीकरांनी गावोगाव नेऊन सुमारे बाराशे ठिकाणी भरवले.

नावडीकर कुटुंब

नावडीकरांच्या परिवारात मेधा नावडीकर, मुग्धा नावडीकर या दोघी गायिका आहेत, तर प्रा. विजय नावडीकर हे हार्मोनिअमवादक आहेत.

बबनराव नावडीकर यांनी गायिलेली आणि ध्वनिमुद्रित झालेली भावगीते

  • आम्ही दोघं राजाराणी
  • उदास तू आवर ते नयनांतिल पाणी (गीत रामायणातील गाणे)
  • कुणीआलं कुणी गेलं
  • जा रे चंद्रा क्षणभर जा
  • तुझ्या डोळ्याचं न्यारं पानी
  • नक्जो बघूस येड्यावाणी
  • पडले स्वप्‍न पहाटेला
  • राधिके ऐक जरा बाई
  • रानात सांग कानात
  • सांग पोरी सांग सारे
  • सुरत सावळी साडी जांभळी
  • ही नाव रिकामी उभी किनार्‍याला

बबनराव नावडीकर यांची पुस्तके

  • गीत दासायन (धार्मिक; सहलेखक श्रीधरस्वामी निगडीकर)
  • निरांजनातील वात (कवितासंग्रह)
  • मी पाहिलेले बालगंधर्व (व्यक्तिचित्रण)