"युवा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४६: ओळ ४६:


विदर्भ साहित्य संघातर्फे यापूर्वी पुसद आणि लाखनी येथे विदर्भ पातळीवरील दोन युवा साहित्य संमेलने घेण्यात आली होती.
विदर्भ साहित्य संघातर्फे यापूर्वी पुसद आणि लाखनी येथे विदर्भ पातळीवरील दोन युवा साहित्य संमेलने घेण्यात आली होती.

==आणखी एक युवा साहित्य संमेलन==
नवोदित नवचैतन्य साहित्य, कलाश्री आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या सहयोगाने नवोदित नवचैतन्य साहित्य कलामंचाचे पाचवे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन अर्जुनी मोरगाव येथे १५ व १६ फेब्रुवारी २०१४ या काळात पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. या पाचव्या युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी युवा साहित्यिक प्रा. मिलिंद रंगारी होते.





१४:४५, ३१ मार्च २०१५ ची आवृत्ती

या नावाची संमेलने अनेक संस्था भरवितात. त्यांपैकी काही संमेलने :-

आंबेडकरी युवा साहित्य संमेलन

आतापर्यंत पाच आंबेडकरी युवा साहित्य संमेलने झाली. ६ जानेवारी २०११ला वर्धा येथे सतेश्वर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे युवा संमेलन झाले, तर चौथे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन दहा महिन्यांनीच, १२ व १३ नोव्हेंबर २०११ या तारखांना नागपूरला झाले. संजय पवार त्याचे संमेलनाध्यक्ष होते. त्या संमेलनामधील कविसंमेलन हे कवी रोहित नागदिवे यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.

पाचवे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन अकोला येथे २०-२१ एप्रिल २०१३ या तारखांना झाले. लोकोत्तम साहित्य, कला व सांस्कृतिक मंच तथा दीनबंधू फोरमने संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी आंबेडकरी लेखिका प्रा. प्रतिभा अहिरे होत्या.

ही संमेलने अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती महामंडळ (अमरावती) या संस्थेतर्फे होतात.

भारतीय युवा साहित्य संमेलन

हे संमेलन मराठी भाषेपुरते मर्यादित नाही.

साहित्य अकादमीतर्फे मुंबईत दादर (पूर्व) येथे, ३०-३१ मे २०१३ या तारखांना दोन दिवसीय भारतीय युवा साहित्य संमेलन झाले. डॉ. भालचंद्र नेमाडे संमेलनाध्यक्ष होते.

संमेलनात गुजराती साहित्यिक धीरुभाई पटेल यांचे उद्‌घाटनपर भाषण तर साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांचे स्वागतपर भाषण झाले. त्यानंतर गुजराती, कोकणी, मणिपुरी, मराठी, नेपाळी, सिंधी भाषेतील काव्यवाचनांचे आणि दुपारी विविध भाषांमधील कथाकथनांचे कार्यक्रम झाला. दुसर्‍या दिवशी सकाळी 'लेखक की कलम से - सृजनात्मक लेखन की मेरी प्रेरणाएँ' या विषयावर परिसंवाद आणि विविधभाषी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

पर्यावरणप्रेमी युवा साहित्य संमेलन

रत्‍नागिरीतील गोगटे-जोगळेकर कॉलेज व पेम संस्था यांनी आयोजित केलेल्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने ७ ते ९ डिसेंबर २०१३ या तारखांना ’पर्यावरणप्रेमी युवा साहित्य संमेलन’ झाले.

संमेलनाच्या निमित्ताने १४ लघुपट दाखविण्यात आले, विद्यार्थ्यांनी पर्यावरण, पाणी, निसर्गावर आधारित कविता ऐकवल्या आणि गरम पाण्याच्या झऱ्यांतील उष्णतेपासून प्रदूषणविरहित वीजनिर्मिती कशी करता येते हे भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. ए. अबसर यांनी सांगितले.

युवा साहित्य-नाट्य संमेलन

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे २३ ते २५ डिसेंबर २०११ दरम्यान पहिले युवा साहित्य-नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले. अच्युत गोडबोले हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.

साने गुरुजी स्मारक समितीच्या सहकार्याने हे संमेलन झाले. पुण्यात झालेल्या ८३ व्या मराठी साहित्य संमेलनानंतर पुण्यभूषण फाउंडेशनकडून जो ८३ लाख रुपयांचा निधी मसापला मिळाला त्याच्या व्याजातून हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचाच हे संमेलन एक भाग आहे. महाविद्यालयीन स्तरावर कार्यरत असलेली वाड्मय मंडळे, कलामंडळे, तसेच अन्य उपक्रमांशी हे संमेलन जोडले जाईल असे संमेलनादरम्यान परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. म्हणाले त्यावेळी परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, की ’युवा प्रतिभेला मातृभाषेतील साहित्याकडे आकर्षित करणे आणि नव्या प्रतिभेचा शोध घेणे, या हेतूने मसापने हा युवा साहित्य-नाट्य संमेलनाचा उपक्रम आयोजित केला आहे’.

२रे युवा साहित्य-नाट्य संमेलन सातारा येथे २४-११-२०१३ला झाले.

युवा साहित्य संमेलन

नवोदित नवचैतन्य साहित्य कलामंच व प्रबुद्ध विनायती (मिशन) कल्याणकारी संस्था गोंदियाच्या संयुक्त विद्यमाने दुसरे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन १२ फेब्रुवारी २०११ला अर्जुनी मोरगाव येथील प्रसन्न सभागृहात आयोजित करण्यात आले होते.

नवोदित नवचैतन्य साहित्य कलामंच व प्रबुद्ध विनायती कल्याणकारी संस्थेतर्फे तिसरे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन २२ जानेवारी २०१४ रोजी गोंदिया येथील भवभूती रंगमंदिरात झाले. सेंलनाध्यक्ष म्हणून युवा साहित्यिक प्रमोद अणेराव होते.

फुले, शाहू, आंबेडकर आणि मार्क्‍सवादी युवा सांस्कृतिक साहित्य संमेलन

निर्मिती विचारमंचच्यावतीने कोल्हापूरला ८ डिसेंबर २०१३ रोजी सहावे फुले, शाहू, आंबेडकर आणि मार्क्‍सवादी युवा सांस्कृतिक साहित्य संमेलन झाले. संमेलनादरम्यान, प्रमिला गुरव-डॉ. बाबूराव गुरव व डॉ.जयश्री चव्हाण - डॉ. राजीव चव्हाण या जोडप्यांना सावित्री-जोतिबा पुरस्कार देण्यात आले. पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळीतील शंभर ग्रंथ, मानचिन्ह व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण महाजन आणि स्वागताध्यक्ष अकबर मकानदार होते. या संमेलनाच्या उद्‌घाटनानंतर लक्ष्मण माने यांचा ‘खेळ साडेतीन टक्क्यांचा’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर दुपारी ४ वाजता ‘जाती अंत’ या विषयावर डॉ. भारत पाटणकर यांची प्रकट मुलाखत घेतली गेली.

हे संमेलन झाल्यानंतर, काही दिवसांनी लैंगिक अत्‍याचाराचे आरोप असलेल्या लक्षण माने यांना संमेलनात समाविष्ट केल्याबद्दल विद्रोही साहित्यिक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. (संदर्भ : लोकसत्ता, पुणे, ११-१२-२०१३, लक्ष्मण मानेंच्या कार्यक्रमांना विद्रोही चळवळीचा विरोध)

अखिल भारतीय मराठी युवा साहित्य संमेलन

पुणे शहरात नव्या पेठेतील एस.एम. जोशी सभागृहात १७-१८ मार्च २०१५ या दिवसांत हे तथाकथित पहिले अखिल भारतीय मराठी युवा साहित्य संमेलन भरले होते. संमेलनाध्यक्ष गोव्याचे साहित्यिक सचिन परब होते. टेकरेल अकॅडमीने हे संमेलन पुरस्कृत केले होते.

राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन

विदर्भ साहित्य संघाच्या वर्धा शाखेतर्फे १४ व १५ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत वर्धा येथील स्वाध्याय मंदिरात हे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन भरले होते. संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातून साठ ते सत्तर लेखक, कवी आणि वक्ते सहभागी झाले होते.

विदर्भ साहित्य संघातर्फे यापूर्वी पुसद आणि लाखनी येथे विदर्भ पातळीवरील दोन युवा साहित्य संमेलने घेण्यात आली होती.

आणखी एक युवा साहित्य संमेलन

नवोदित नवचैतन्य साहित्य, कलाश्री आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या सहयोगाने नवोदित नवचैतन्य साहित्य कलामंचाचे पाचवे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन अर्जुनी मोरगाव येथे १५ व १६ फेब्रुवारी २०१४ या काळात पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. या पाचव्या युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी युवा साहित्यिक प्रा. मिलिंद रंगारी होते.





पहा : साहित्य संमेलने