"श्रेया सिंघल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: असभ्यता ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''श्रेया सिंघल''' ([[इ.स. १९९४]] - ) या दिल्लीत महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या एक विद्यार्थिनी आहेत. ब्रिस्टल विद्यापीठातून भौतिकशास्त्रातील पदवी घेऊन आल्यानंतर त्या कायद्याचाच अभ्यास करीत आहेत. सिंघल भारतातील माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६-अ कलमाविरुद्ध याचिका दाखल करणार्‍यांपैकी एक होत्या.
'''श्रेया सिंघल''' ([[इ.स. १९९४]] - ) या दिल्लीत महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या एक विद्यार्थिनी आहेत. ब्रिस्टल विद्यापीठातून भौतिकशास्त्रातील पदवी घेऊन आल्यानंतर त्या कायद्याचाच अभ्यास करीत आहेत. सिंघल भारतातील माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६-अ कलमाविरुद्ध याचिका दाखल करणार्‍यांपैकी पहिल्या होत्या.

{{बदल}}
{{बदल}}
ओळ ५: ओळ ५:

==घराणे==
==घराणे==
श्रेया सिंघल यांंच्या आईचे नाव मनाली सिंग, आणि आजीचे सुजाता भांंडारे. या आजी इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातील कायदेमंत्री हरिभाऊ रामचंद्र गोखले यांच्या धाकटय़ा कन्या व मोदी यांच्या उदयानंतर ओरिसाच्या राज्यपालपदावरून पायउतार झालेल्या मुरलीधर भांडारे यांच्या पत्‍नी असून भारताच्या उच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश होत. दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीशपदावर असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी कायदा या विषयावर 'न्यायमूर्ती सुनंदा भांडारे स्मृति व्याख्यान' आयोजित केले जाते.
श्रेया सिंघल यांंच्या आईचे नाव मनाली सिंग, आणि आजीचे सुजाता भांंडारे. या आजी इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातील कायदेमंत्री हरिभाऊ रामचंद्र गोखले यांच्या धाकटय़ा कन्या व मोदी यांच्या उदयानंतर ओरिसाच्या राज्यपालपदावरून पायउतार झालेल्या मुरलीधर भांडारे यांच्या पत्‍नी असून भारताच्या उच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश होत. दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीशपदावर असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी कायदा या विषयावर 'न्यायमूर्ती सुनंदा भांडारे स्मृति व्याख्यान' आयोजित केले जाते. नवी दिल्लीमधील पंदारा पार्कपासून दिल्ली उच्च न्यायालयाकडे जाणार्‍या रस्त्याला जस्टिस सुनंदा भांडारे मार्ग असे नाव दिले गेले आहे.

भांडारे दांपत्याला राहुल भांंडारे हा मुलगा व मिताली सिंघल ह्या कन्या आहेत.. राहुल हे आयात होणार्‍या कोळशाचे भारतातील एक बडे व्यापारी आहेत. मिताली सिंघल या दिल्ली उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात.

२२:१८, २८ मार्च २०१५ ची आवृत्ती

श्रेया सिंघल (इ.स. १९९४ - ) या दिल्लीत महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या एक विद्यार्थिनी आहेत. ब्रिस्टल विद्यापीठातून भौतिकशास्त्रातील पदवी घेऊन आल्यानंतर त्या कायद्याचाच अभ्यास करीत आहेत. सिंघल भारतातील माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६-अ कलमाविरुद्ध याचिका दाखल करणार्‍यांपैकी पहिल्या होत्या.

घराणे

श्रेया सिंघल यांंच्या आईचे नाव मनाली सिंग, आणि आजीचे सुजाता भांंडारे. या आजी इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातील कायदेमंत्री हरिभाऊ रामचंद्र गोखले यांच्या धाकटय़ा कन्या व मोदी यांच्या उदयानंतर ओरिसाच्या राज्यपालपदावरून पायउतार झालेल्या मुरलीधर भांडारे यांच्या पत्‍नी असून भारताच्या उच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश होत. दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीशपदावर असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी कायदा या विषयावर 'न्यायमूर्ती सुनंदा भांडारे स्मृति व्याख्यान' आयोजित केले जाते. नवी दिल्लीमधील पंदारा पार्कपासून दिल्ली उच्च न्यायालयाकडे जाणार्‍या रस्त्याला जस्टिस सुनंदा भांडारे मार्ग असे नाव दिले गेले आहे.

भांडारे दांपत्याला राहुल भांंडारे हा मुलगा व मिताली सिंघल ह्या कन्या आहेत.. राहुल हे आयात होणार्‍या कोळशाचे भारतातील एक बडे व्यापारी आहेत. मिताली सिंघल या दिल्ली उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात.

श्रेया सिंघल यांनी दिलेला अन्यायाविरुद्धचा लढा

नोव्हेंबर २०१२ मध्ये बाळ ठाकरे यांचे निधन झाले. त्या निमित्ताने मुंबई बंद पुकारण्यात आला होता. असे बंद करण्याने जनतेला तकलीफ होते अशा अर्थाचे एक मत पालघरच्या एका मुलीने, शाहीन धाडाने, फेसबुकवर व्यक्त केले होते. तिला दुसर्‍या मुलीने, रीनू श्रीनिवासनने, ’लाईक’ केले आणि जणू रानच पेटले. शिवसैनिकांनी या मुलींच्याविरोधात निदर्शने केली. परिणामी पोलिसांनी त्यांना माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६-अ कलमाखाली २० नोव्हेंबर २०१२ रोजी अटक केली.

दिल्लीत नुकतेच अण्णा हजारे यांचे आंदोलन झाले होते. दिल्लीतील तरुणांच्या मनात अजूनही ती विरोधाची ज्योत तेवत होती. सत्तेचा गैरवापर, निरंकुशत्व प्राप्त करण्यासाठी चाललेली सत्ताधार्‍यांची धडपड हे सगळे अनुभवत असलेले हे तरुण होते. समाजमाध्यम (मीडिया) हे त्यांच्याा हातातील लढय़ाचे हत्यार होते. तेच बोथट करण्याचा हा प्रयत्‍न असल्याचे श्रेयाला जाणवत होते.

ज्या कलमाद्वारे त्या दोन तरुणींना आणि त्यांच्यासारख्या अनेकांना गजांआड पाठविण्यात येत आहे ते घटनेच्या १४, १९ आणि २१ या कलमांना विसंगत आहे हे श्रेयाच्या लक्षात आले. या देशात कोणी सभ्य भाषेत आपली मते व्यक्त करू शकत नाही का, हा प्रश्न तिला सलत होता. याला विरोध करायलाच हवा, पण कसा? त्या रात्री जेवता जेवता श्रेयाने आपली शंका आईजवळ व्यक्त केली. आईने न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आणि श्रेया ही या प्रकरणातील एक जनहित याचिकाकर्ती बनली. आधी काँग्रेस आणि नंतर भाजपच्या सरकारने या कलमाची कसून पाठराखण केली. पण अखेर विजय घटनेचा झाला. सर्वोच्च न्यायालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्याचे ६६-अ कलम बेकायदेशीर ठवून रद्द केले. (२५-३-२०१५)

संदर्भ