"शिवाजी निबंधावली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: ’शिवाजी निबंधावली’ हा दोन-खंडी ग्रंथ इ.स. १९३० मध्ये प्रकाशित झाल... |
(काही फरक नाही)
|
२२:१५, १२ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
’शिवाजी निबंधावली’ हा दोन-खंडी ग्रंथ इ.स. १९३० मध्ये प्रकाशित झाला होता.
या ग्रंथात पांडुरंग वामन काणे, शंकर दामोदर पेंडसे गोविंद रामचंद्र राजोपाध्ये, रामकृुष्ण परशुराम सबनीस, यशवंत खुशाल देशपांडे, वासुदेव आत्माराम देशप्रभू, जनार्दन सखाराम करंदीकर, महामहोपाध्याय रायबहादूर गौरीशंकर ओझा, शंकर वामन दांडेकर, श्रीक्रुष्ण व्यंकटेश पुणतांबेकर, भास्कर वामन भट, शिवराम काशीनाथ ओक, सुरेंद्रनाथ सेन, पंडित वैद्यनाथन शास्त्री तसेच सर चार्ल्स मॅलेट अशा अनेक थोर इतिहास अभ्यासकांचे, शिवाजीच्या चरित्रावर अप्रत्यक्षपणे प्रकाश पाडणारे व शिवकालीन परिस्थितीचे वर्णन करणारे विविध विषयांवरील मराठी-हिंदी-इंग्रजी लेख समाविष्ट आहेत. तत्कालीन धनिक पांडूअण्णा शिराळकर व इंदूरच्या ग्रंथोत्तेजक मंडळ यांच्याकडून देणग्या घेऊन हा ग्रंथ प्रकाशित झाला होता.
शिवाजी निबंधावली या पुस्तकाला नरसिंह चिंतामण केळकर व दत्तात्रेय विष्णु आपटे यांची प्रस्तावना आहे. ग्रंथाचे संपादन न.चिं. केळकर, वा.गो. काळे व ना.गो. चाफेकर यांनी केले होते.
शिवाजी निबंधावलीमधील प्रमुख लेख
- (शिवकालीन राजपत्रांची लेखनपद्धती (लेखक - प्रा. ग.ह. खरे)
पुनर्मुद्रण
’शिवाजी निबंधावली’ हा १९३० सालचा ग्रंथ दुर्मीळ झाल्याने पुण्याच्या भारत संशोधक मंडळाने या ग्रंथाच्या दोन्ही खंडांचे एकत्रीकरण करून हा ग्रंथ फेब्रुवारी २०१५मध्ये पुनर्मुद्रित करून प्रकाशित केला आहे.
((अपूर्ण))