Jump to content

"भारतातील दहशतवादाच्या घटना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भारतातील दशहतवादाच्या काही घटना :- ==१२ मार्च १९९३== या दिवशी मुंबई...
(काही फरक नाही)

१६:१४, ५ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

भारतातील दशहतवादाच्या काही घटना :-

१२ मार्च १९९३

या दिवशी मुंबईतील १२ ठिकाणी बाँबस्फोट झाले. त्यांत जव्हेरी बाजार, सहार विमानतळ, नरीमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत, सेंटॉर हॉटेल, मुंबई शेअरबाजारची इमारत आदी ठिकाणाचा समावेश होता. या घटनेत साडेतीनशे लोक ठार झाले., १२०० जखमी झाले.

२४ डिसेंबर १९९९

नेपाळहून नवी दिल्लीला येणार्‍या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे काठमांडूत अपहरण झाले. विमानात एकूण १७६ प्रवासी होते. दहशतवाद्यांनी हे विमान काठमांडूहून अमृतसरमार्गे दुबई व तेथून कंदाहारला नेले. ३१ डिसेंबरला १९९९ला तत्कालीन भारतीय जनता पक्षाच्या भारत सरकारने मौलाना मसूद अझर, मुश्ताक झरगर आणि अहमद उमर सईद या भारताच्या तुरुंगांत असलेल्या तीन कुख्यात दहशतवाद्यांना कंदाहारला नेऊन सोडून दिले आणि त्या मोबदल्यात विमानातील प्रवाशांची सुटका करवून विमान परत मिळवले. या घटनेत विमानातील रूपेन कत्याला नावाच्या प्रवाशाला मात्र दहशतवाद्यांनी ठार मारले.

१३ डिसेंबर २००९

३१ डिसेंबर १९९९ला विमान‍ अपहरण करून सुटका करून घेतलेल्या मौलाना मसूर अझर याच्या ’जैश ए मोहम्मद’च्या व लष्करे तैयबा या संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी दिल्लीत पार्लमेन्टच्या इमारतीवर हल्ला केला. सतर्क पोलिसांनी त्यांना इमारतीत जाण्यापासून रोखले. प्रतिकारात पाचही दहशतवादी मारले गेले, मात्र या घटनेत सहा पोलीस शहीद झाले.

११ जुलै २००६

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या धावत्या लोकल्समध्ये ११ मिनिटांत सात बाँबस्फोट घडवून आणले गेले. यांत २०९ लोक ठार झाले आणि ७०० जखमी झाले.

२६ नोव्हेंबर २००८

सुमारे १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गाने येऊन मुंबईवर हल्ला केला. बोरीबंदर रेल्वे स्टेशन, कॅफे लिओपोल्ड, नरीमन हाऊस, ताजमहाल व ट्रायडेन्ट ही दोन हॉटेले, यांवर हल्ले करून बेछूट गोळीबार करण्यात आला. तीन दिवस हा हल्ला चालू होता. पोलीस प्रतिकारात नऊ दहशतवादी मारले गेले. दहावा हल्लेकरी अजमल कसाब याला पकडण्यात आले, आणि त्याच्यावर रीतसर खटला चालवून अंती त्याला फाशी दिले. या हल्ल्यांत एकूण १६६ लोकांनी प्राण गमावले.