"बुद्धिबळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो robot Adding: af, am, an, ar, ast, az, bat-smg, bg, bn, br, bs, ca, cs, cy, da, de, el, eo, es, et, eu, fa, fi, fo, fr, ga, gl, he, hr, hu, hy, ia, id, io, is, it, ja, jbo, ka, kn, ko, la, lb, lt, lv, mk, ms, nds, nl, nn, no, pl, pt, ro, ru, scn, sd |
|||
ओळ १८६: | ओळ १८६: | ||
===आधुनिक खेळाची सुरुवात (१४५० - १८५०)=== |
===आधुनिक खेळाची सुरुवात (१४५० - १८५०)=== |
||
[[शतरंज]]मधील |
[[शतरंज]]मधील मोहर्यांच्या चाली मर्यादित होत्या. सध्याचा उंट (ज्याला पूर्वी हत्ती म्हटले जायचे) त्याकाळी फक्त तिरपी दोन घरे उडी मारू शकत असे. मंत्री (म्हणजे सध्याचा वझीर) फक्त तिरपे एक घर जाऊ शकत असे; प्यादी सुरुवातीला दोन घरे जाऊ शकत नव्हती, आणि किल्लेकोटाची संकल्पनाच नव्हती. प्याद्यांना बढती मिळून फक्त मंत्री होता येत असे. <ref>Davidson (1981), p. 9</ref> |
||
[[Image:JaquesCookStaunton.jpg|left|240px|thumb|[[नथानिएल कुक]] यांनी १८४९ मध्ये बनवलेले मूळ [[हॉवर्ड स्टाँटन|स्टाँटन]] मोहरे, डावीकडून: प्यादे, हत्ती, घोडा, उंट, वझिर आणि राजा.]] |
[[Image:JaquesCookStaunton.jpg|left|240px|thumb|[[नथानिएल कुक]] यांनी १८४९ मध्ये बनवलेले मूळ [[हॉवर्ड स्टाँटन|स्टाँटन]] मोहरे, डावीकडून: प्यादे, हत्ती, घोडा, उंट, वझिर आणि राजा.]] |
||
इ.स. १२०० च्या दरम्यान दक्षिण युरोपमध्ये नियम बदलण्यास सुरुवात झाली आणि १४७५ च्या आसपास काही महत्वाचे बदल केले गेले.<ref>Hooper and Whyld, 144-45 (first edition)</ref> चालींसाठीचे आधुनिक नियम [[इटली]]मध्ये तयार झाले.<ref>Davidson (1981), p. 13–17</ref> ( काही लोक हे [[स्पेन]]मध्ये झाले असे मानतात. <ref>Calvo, Ricardo. [http://www.goddesschess.com/chessays/ricardovalencia.html Valencia Spain: The Cradle of European Chess]. Retrieved [[10 December]] [[2006]]</ref>): प्याद्यांना पहिली २ घरांची चाल मिळाली आणि |
इ.स. १२०० च्या दरम्यान दक्षिण युरोपमध्ये नियम बदलण्यास सुरुवात झाली आणि १४७५ च्या आसपास काही महत्वाचे बदल केले गेले.<ref>Hooper and Whyld, 144-45 (first edition)</ref> चालींसाठीचे आधुनिक नियम [[इटली]]मध्ये तयार झाले.<ref>Davidson (1981), p. 13–17</ref> ( काही लोक हे [[स्पेन]]मध्ये झाले असे मानतात. <ref>Calvo, Ricardo. [http://www.goddesschess.com/chessays/ricardovalencia.html Valencia Spain: The Cradle of European Chess]. Retrieved [[10 December]] [[2006]]</ref>): प्याद्यांना पहिली २ घरांची चाल मिळाली आणि त्यातूनच [[एन पासंट]] सुरू झाले. उंट आणि वझीर यांना आज वापरल्या जाणार्या चाली मिळाल्या. त्यामुळेच वझीर सर्वात महत्त्वाचा मोहरा ठरला. या बुद्धिबळाला "वझिराचे(राणीचे) बुद्धिबळ" संबोधले जाऊ लागले.<ref>An analysis from the feminist perspective: {{संदर्भ पुस्तक | author=Weissberger, Barbara F.| title=Isabel Rules: constructing queenship, wielding power |publisher=University of Minnesota Press| year=2003 | id=ISBN 0-8166-4164-1}} P. 152ff</ref> |
||
हे नियम लगेचच पश्चिम युरोपात पसरले. शिळ्या मातेबद्दलचे नियम मात्र १९ व्या शतकात निश्चित झाले. |
हे नियम लगेचच पश्चिम युरोपात पसरले. शिळ्या मातेबद्दलचे नियम मात्र १९ व्या शतकात निश्चित झाले. |
||
याच काळात बुद्धिबळावर ग्रंथ लिहिले जाऊ लागले. सर्वात जुने |
याच काळात बुद्धिबळावर ग्रंथ लिहिले जाऊ लागले. सर्वात जुने अजूनही टिकलेले छापील पुस्तक ''Repetición de Amores y Arte de Ajedrez'' (इंग्लिशमध्ये ''Repetition of Love and the Art of Playing Chess'') [[स्पेन]]च्या [[लुइस रामिरेझ दे लुसेना]] याने [[सालामांका]] येथे प्रसिद्ध केले..<ref>Calvo, Ricardo. [http://www.goddesschess.com/chessays/ricardovalencia.html Valencia Spain: The Cradle of European Chess]. Retrieved [[10 December]] [[2006]]</ref> लुसेना आणि त्यानंतरच्या १६ व्या आणि १७ व्या शतकातील तज्ज्ञांनी, उदाहरणार्थ, पोर्तुगालच्या [[पेद्रो दामिआनो]], [[इटली]]च्या [[जिओवान्नी लिओनार्दो डी बोना]], [[गिउलिओ सीझर पोलेरिओ]] आणि [[जिओअक्सिनो ग्रेको]] किंवा स्पेनचे धर्मगुरू [[रूय लोपेझ दे सेगुरा]] यांनी डावाची सुरुवातीला करावयाच्या चालींसंबंधीची मूलभूत तत्त्वे विकसित केली. त्यातूनच [[इटालियन गेम]], [[किंग्ज गँबिट]] आणि [[रूय लोपेझ]] सारख्या डावांची सुरुवात झाली. |
||
[[Image:André Philidor.jpg|right|thumb|caption|[[फ्रांस्वा-आंद्रे डॅनिकन फिलिडोर]], १८व्या शतकातील फ्रेंच बुद्धिबळ |
[[Image:André Philidor.jpg|right|thumb|caption|[[फ्रांस्वा-आंद्रे डॅनिकन फिलिडोर]], १८व्या शतकातील फ्रेंच बुद्धिबळ तज्ज्ञ]] |
||
१८ व्या शतकात युरोपातील बुद्धिबळाचे केंद्र दक्षिण युरोपातील [[ |
१८ व्या शतकात युरोपातील बुद्धिबळाचे केंद्र दक्षिण युरोपातील [[फ्रान्स]] बनले. दोन महत्त्वाचे फ्रेंच तज्ज्ञ, प्यांद्यांचे महत्त्व जाणणारे [[फ्रँकॉईस-आंद्रे डॅनिकन फिलिडोर]], व्यवसायाने संगीतकार, आणि [[लुइस चार्ल्स माहे दे ला बुर्दोनाईस]] यांनी ब्रिटिश तज्ज्ञ [[आलेक्झांडर मॅकडॉनेल]] याला १८३४ मध्ये विविध मालिकांमध्ये हरवले.<ref>[http://www.chessgames.com/perl/chessplayer?pid=31596 Louis Charles Mahe De La Bourdonnai.] ''Chessgames.com''. Retrieved [[30 November]] [[2006]].</ref> त्यावेळी बुद्धिबळ युरोपातील मोठ्या शहरातील कॉफीघरांतून खेळले जात असे. उदाहरणार्थ: [[कॅफे दे ला रेजंस]], [[पॅरीस]]<ref>{{संदर्भ पुस्तक | author=Metzner, Paul| title=Crescendo of the Virtuoso: Spectacle, Skill, and Self-Promotion in Paris during the Age of Revolution |publisher=Berkeley: University of California Press| year=1998 | id=ISBN 0-520-20684-3}} [http://ark.cdlib.org/ark:/13030/ft438nb2b6/ Online version]</ref> आणि [[सिम्पसन्स दिवान]], [[लंडन]] .<ref>[[Henry Edward Bird|Bird, Henry Edward]]. [http://www.gutenberg.org/etext/4902 Chess History and Reminiscences]. Retrieved [[10 December]] [[2006]] </ref> |
||
१९ व्या शतकात विविध संघटना स्थापल्या गेल्या. बरेच क्लब्ज, पुस्तके आणि जर्नल्स प्रसिद्ध होऊ लागली. पत्रांद्वारे बुद्धिबळ सामनेही खेळले जाऊ लागले. उदा: लंडन चेस |
१९ व्या शतकात विविध संघटना स्थापल्या गेल्या. बरेच क्लब्ज, पुस्तके आणि जर्नल्स प्रसिद्ध होऊ लागली. पत्रांद्वारे बुद्धिबळ सामनेही खेळले जाऊ लागले. उदा: लंडन चेस क्लब आणि एडिंबरो चेस क्लब यांमधील १८२४ मध्ये झालेला सामना.<ref>[http://www.chessgames.com/perl/chessplayer?pid=80740 London Chess Club.] ''Chessgames.com''. Retrieved [[30 November]] [[2006]].</ref> वर्तमानपत्रातून येणारी बुद्धिबळातील कोडीही लोकप्रिय होऊ लागली. [[बर्नार्ड हॉरविट्झ]], [[जोसेफ किंग]] आणि [[सॅम्युएल लॉईड]] यांनी एकापेक्षा एक सरस कोडी रचली. १८४३ मध्ये [[जर्मनी]]च्या [[पॉल रुडॉल्फ वॉन बिल्गुएर]] आणि [[टासिलो हेडेब्रांड उंड डेर लासा]] . |
||
या तज्ज्ञांनी लिहिलेल्या ''[[Handbuch des Schachspiels]]'' या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. |
|||
===स्पर्धात्मक खेळाची सुरुवात (१८५० - १९४५)=== |
===स्पर्धात्मक खेळाची सुरुवात (१८५० - १९४५)=== |
२१:०१, १ सप्टेंबर २००७ ची आवृत्ती
बुद्धिबळ (इंग्लिशमध्ये चेस व हिंदीमध्ये शतरंज) हा दोन खेळाडूंनी एका तक्त्यासारख्या पटाच्या दोन्ही बाजूला बसून खेळावयाचा बैठा खेळ आहे. बुद्धिबळाची सुरूवात भारतातून झाली असे मानण्यात येते. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जाणारे बुद्धिबळ हे पाश्चिमात्य बुद्धिबळ म्हणून ओळखले जाते.
बुद्धिबळ सध्या जगातील सर्वात प्रसिद्ध खेळांपैकी एक मानला जातो. जगभरात अदमासे ६० कोटी हौशी किंवा व्यावसायिक लोक क्लब्जमध्ये, पत्राने, आंतरजालावर व विविध स्पर्धांमधून बुद्धिबळ खेळतात. बुद्धिबळात कला आणि शास्त्र यांचा मिलाप झालेला दिसतो.
बुद्धिबळ एका चौरस पटावर खेळला जातो. या ८ X ८ च्या पटावर ६४ घरे असतात व ती आलटून पालटून क्रमाने काळ्या-पांढर्या रंगाची असतात. पहिला खेळाडू पांढर्या तर दुसरा काळ्या सोंगट्यांनी खेळतो. या सोंगट्यांना मोहरे म्हणतात. प्रत्येक खेळाडूचे एका रंगाचे सोळा मोहरे असतात.:- एक राजा, एक वजीर(राणी), दोन हत्ती(रुक), दोन घोडे(सरदार, नाइट), दोन उंट(बिशप) आणि आठ प्यादी(पॉन). प्रतिस्पर्ध्याच्या राजाला शह, म्हणजे मृत्यूचा धाक देऊन मात करणे हा खेळाचा उद्देश असतो. राजाला शह मिळाल्यानंतर कुठलीही खेळी करून जेव्हा त्याला शहातून बाहेर पडता येत नाही त्यावेळी राजावर मात झाली असे मानले जाते. विचारवंतांनी बराच अभ्यास करून मात करण्यासाठी विविध क्रमांच्या चालींच्या खेळी रचल्या आहेत.
स्पर्धात्मक बुद्धिबळाची परंपरा १६ व्या शतकात युरोपमध्ये सुरू झाली. पहिला अधिकृत बुद्धिबळ विश्वविजेता विल्हेल्म स्टेइनिट्झ हा इ.स. १८८६ साली बनला. आज व्लादिमीर क्रॅमनिक हा रशियन खेळाडू १४ वा जगज्जेता आहे. बुद्धिबळाच्या सांघिक स्पर्धा "बुद्धिबळ ऑलिंपीयाड" दर दोन वर्षातून एकदा भरवल्या जातात. दोन आंतराष्ट्रीय संस्था फेडेरेशन इंटरनॅशनाले देस इचेक्स (फिडे) आणि इंटरनॅशनल करस्पाँडंस चेस फेडेरेशन जगातील महत्त्वाच्या स्पर्धा भरवतात.
संगणकतज्ञ बुद्धिबळ खेळणार्या संगणकाच्या निर्मितीसाठी पहिल्यापासून प्रयत्नशील होते. त्यामुळेच अलीकडील बुद्धिबळावर संगणकाचा प्रभाव पडलेला दिसतो. इ.स. १९९७ मध्ये गॅरी कास्पारोव्ह, त्यावेळचा जगज्जेता आणि आय्.बी.एम् कंपनीचा डीप ब्ल्यू संगणक यांच्यातील सामन्यातून सर्वात बुद्धिमान/कुशल माणसाला बुद्धिबळात हरवणारी संगणक-प्रणाली तयार करता येते हे सिद्ध झाले.
नियम
बुद्धिबळातील सोंगट्या | ||
---|---|---|
राजा | ||
राणी | ||
हत्ती | ||
उंट | ||
घोडा | ||
प्यादे |
बुद्धिबळ एका ८ स्तंभ आणि ८ ओळींच्या चौरसाकृती पटावर खेळला जातो. स्तंभांना इंग्लिश a पासून h पर्यंत तर पंक्तींना १ ते ८ अशी नावे असतात. ६४ चौरसांचे रंग काळे-पांढरे असतात. सोंगट्या एकसारख्या काळ्या आणि पांढर्या अशा दोन संचात विभागलेल्या असतात. प्रत्येक संचात १६ मोहरे असतात. १ राजा, १ वझीर, २ उंट, २ घोडे, २ हत्ती आणि ८ प्यादी.
खेळाडू काळा किंवा पांढरा संच नाणेफेक करून निवडतात किंवा स्पर्धेच्या नियमानुसार कुणी कुठला संच घेऊन खेळायचे ते ठरते. प्रत्येक खेळाडूच्या उजव्या हाताच्या कोपर्यात पांढरा चौरस येईल अशा पद्धतीने पट मांडला जातो. काळ्या संचातील वझीर काळ्या घरात तर पांढरा वझीर पांढर्या घरात असतो.
पांढरा पहिली चाल करतो. नंतर प्रत्येक खेळाडू स्वत:चे मोहरे वापरून एकानंतर एक चाली करतात. मोहरे रिकाम्या घरात किंवा प्रतिस्पर्ध्याच्या मोहर्याला मारून त्याच्या घरात ठेवता येतात. मेलेला मोहरा डावाबाहेर काढला जातो.
जर राजाला विरोधी मोहरा एका खेळीत मारू शकत असेल तर राजाला शह मिळाला असे म्हटले जाते. खेळाडू स्वत:च्या राजास शह बसेल अशी कोणतीही चाल खेळू शकत नाही तसेच स्वत:च्या राजास शह बसेल अशी कोणतीही चाल प्रतिस्पर्धी खेळाडूला शक्यतो करू देत नाही. इतके करून जर एखाद्या खेळाडूच्या राजाला शह मिळालाच तर त्याला राजाला एका खेळीत शहातून बाहेर काढणारी चाल करावी लागते. जर अशी चाल खेळता येत नसेल तर त्या खेळाडूची हार झाली असे मानले जाते. प्रत्येक खेळाडू दुसर्याचा राजावर मात करून त्याला हरवण्यासाठी चिकाटीने खेळतो. जो पहिल्य़ांदा यशस्वी होतो तो जिकला.
|
|
|
|
|
|
बुद्धिबळाचा प्रत्येक मोहरा विशिष्ट पद्धतीने चाली करतो.
- राजा उभ्या, आडव्या आणि तिरप्या दिशेने एक घर जाऊ शकतो. प्रत्येक डावात राजा फक्त एकदाच एक विशेष चाल "किल्लेकोट" करू शकतो. किल्लेकोटामध्ये राजा दोन घरे हत्तीकडे जातो आणि हत्ती राजाला लागून पलीकडे सरकतो.
किल्लेकोट फक्त खालील अटींवर करता येतो :
- राजा किंवा किल्लेकोटात सहभागी असलेला हत्ती यापूर्वी या डावात कधीच हाललेला नसेल,
- राजा आणि हत्तीमध्ये कुठलाही मोहरा नसेल,
- राजाला शहाच्या धाकाखाली नसेल, किल्लेकोट करताना राजा ज्या घरांतून सरकतो त्यावर विरोधी मोहर्यांचा रोख नसेल आणि किल्लेकोट झालेल्या स्थितीत राजा शहाच्या धाकाखाली नसेल.
किल्लेकोट झाल्यावर राजाला शह देणे अवघड होते.
- हत्ती आडव्या किंवा उभ्या दिशेने कितीही रिकामी घरे जाऊ शकतो.
- उंट तिरप्या दिशेने कितीही रिकामी घरे जाऊ शकतो. तिरपी घरे एकाच रंगाची असल्याने मूळ पांढर्या घरातला उंट पांढर्या व दुसरा नेहमी काळ्या घरातूनच हिंडतो. प्रत्येक खेळाडूच्या दोन उंटांपैकी एक पांढर्या तर दुसरा काळ्या घरात असतो.
- वझीर आडव्या, उभ्या किंवा तिरप्या दिशेने कितीही रिकामी घरे जाऊ शकतो.
- घोडा रिकाम्या किंवा भरलेल्या घरांवरुन उड्या मारू शकतो. तो दोन घरे आडव्या दिशेने आणि एक घर उभ्या दिशेने किंवा दोन घरे उभ्या दिशेने आणि एक घर आडव्या दिशेने जातो. याला अडीच घरांची चाल असेही म्हटले जाते. प्रत्येक चालीनंतर घोड्याच्या घराचा रंग बदलतो.
- प्यादयांच्या चाली सर्वात गुंतागुंतीच्या आहेत:
- प्यादे एक घर पुढे रिकाम्या घरात सरकू शकते. जर प्याद्याची पहिलीच चाल असेल तर ते दोन रिकाम्या घरातून जाऊ शकते. प्यादे मागे जाऊ शकत नाही.
- जर प्याद्याने पहिली दोन घरांची चाल केली आणि त्याच्या शेजारील घरात जर विरोधी प्यादे असेल तर विरोधी प्यादे "एन पासंट" वापरून पहिले प्यादे मारू शकते. ही चाल जणू पहिले प्यादे एकच घर चालले अशी होते. हे फक्त दोन घरांच्या चालीनंतरच्या पहिल्या चालीवर शक्य आहे.
- प्यादी विरोधी मोहरा मारण्यासाठी एक घर तिरपी चाल करतात. पण ती घरे रिकामी असतील तर तेथे जाऊ शकत नाहीत.
- जर प्यादे सरकत शेवटाच्या पंक्तीत पोचले तर त्याला बढती मिळून खेळाडूच्या इच्छेनुसार ते वझीर, हत्ती, उंट किंवा घोडा बनू शकते. सहसा खेळाडू वझीर घेणे पसंत करतात.
घोडा सोडून कोणताही मोहरा दुसर्याला ओलांडून पलीकडे उडी मारू शकत नाही. स्वत:च्याच मोह्र्यांना मारता येत नाही पण विरोधी मोहर्यांना मारता येते. ज्यावेळी एखादा मोहरा मारला जातो त्यावेळी मारेकरी मोहरा त्याची जागा घेतो. ( याला "एन पासंट" चा अपवाद आहे.) मेलेला मोहरा डावातून बाद होतो. प्याद्याला बढती मिळाल्यानंतर तो नवीन मोहरा म्हणून वापरला जातो. पण बढती मिळाल्यावर मेलेलाच मोहरा घ्यावा अशी बंदी नाही. राजा मारला जाऊ शकत नाही त्याला शह देता येतो. राजाला शहातून बाहेर काढता येत नसल्यास खेळाडू हरतो.
बुद्धिबळाचा डाव शह-मात शिवाय अजूनही काही प्रकारे संपू शकतो --- पटावर वाईट परिस्थिती असल्यास खेळाडू राजीनामा देतो ( हार मान्य करतो.) डाव अनिर्णित राहू शकतो. यात शिळी मात, तीनदा पुनरावृत्ती, ५० चालींचा नियम किंवा शह-मात न होण्याची शक्यता यापैकी एखादी गोष्ट असेल तर खेळ अनिर्णित ठरवला जातो.
इतिहास
सुरुवात
जरी अनेक देश बुद्धिबळाच्या शोधाचा दावा करत असले तरी बुद्धिबळ ह्या खेळाची सुरुवात प्रथम भारतात झाली असे सध्यातरी मानले जाते.[१] बुद्धिबळासाठी विविध भाषांत वापरले जाणारे शब्द भारतीय चतुरंग या शब्दापासून तयार झाले आहेत यावरून हे स्पष्ट होते. चतुरंग म्हणजे "सैन्याची चार अंगे" पायदळ, घोडदळ, हत्ती आणि रथ. तसेच प्राचीन काळात फक्त भारतातच सैन्यांमध्ये घोडे, उंट आणि हत्ती हे तीनही प्राणी वापरले जात होते.
साहित्यामध्ये बुद्धिबळाचा पहिला संदर्भ इ.स. पूर्व ५०० मध्ये भारतात दिघ निकय मध्ये ब्रह्मजल सुत्त या ग्रंथात आढळतो.[२] पर्शियामधील पहिला संदर्भ इ.स. ६०० च्या दरम्यान आढळतो; येथे त्याला शतरंज असे म्हटले आहे. सातव्या शतकात मोहर्यांचे वर्णन केलेले आढळते. इ.स. ८०० पर्यंत खेळ चीनमध्ये शिआंकी नावाने पोचला होता. मुस्लीम जगाने शतरंज पर्शियाच्या विजयानंतर उचलला. मोहोर्यांची पर्शियन नावे तशीच राहिली.
स्पेनमध्ये त्याला ajedrez "अजेद्रेझ", पोर्तुगीजमध्ये xadrez आणि ग्रीकमध्ये "zatrikion" तर बाकीच्या युरोपमध्ये पर्शियन "शाह" शब्दाच्या विविध रूपांनी ओळखले जाऊ लागले. खेळ पश्चिम युरोप आणि रशियामध्ये तीन वेगवेगळ्या मार्गांनी पोचला. पहिल्यांदा नवव्या शतकात सुरुवात झाली. १००० पर्यंत सर्व युरोपभर पसरला. [३] इबेरियन पठारावर मुर यांनी दहाव्या शतकात खेळाची ओळख करून दिली. [४]
आणि एका विचारानुसार बुद्धिबळ, चीनमधील शिआंकी पासून सुरू झाले असावे. [५]
आधुनिक खेळाची सुरुवात (१४५० - १८५०)
शतरंजमधील मोहर्यांच्या चाली मर्यादित होत्या. सध्याचा उंट (ज्याला पूर्वी हत्ती म्हटले जायचे) त्याकाळी फक्त तिरपी दोन घरे उडी मारू शकत असे. मंत्री (म्हणजे सध्याचा वझीर) फक्त तिरपे एक घर जाऊ शकत असे; प्यादी सुरुवातीला दोन घरे जाऊ शकत नव्हती, आणि किल्लेकोटाची संकल्पनाच नव्हती. प्याद्यांना बढती मिळून फक्त मंत्री होता येत असे. [६]
इ.स. १२०० च्या दरम्यान दक्षिण युरोपमध्ये नियम बदलण्यास सुरुवात झाली आणि १४७५ च्या आसपास काही महत्वाचे बदल केले गेले.[७] चालींसाठीचे आधुनिक नियम इटलीमध्ये तयार झाले.[८] ( काही लोक हे स्पेनमध्ये झाले असे मानतात. [९]): प्याद्यांना पहिली २ घरांची चाल मिळाली आणि त्यातूनच एन पासंट सुरू झाले. उंट आणि वझीर यांना आज वापरल्या जाणार्या चाली मिळाल्या. त्यामुळेच वझीर सर्वात महत्त्वाचा मोहरा ठरला. या बुद्धिबळाला "वझिराचे(राणीचे) बुद्धिबळ" संबोधले जाऊ लागले.[१०] हे नियम लगेचच पश्चिम युरोपात पसरले. शिळ्या मातेबद्दलचे नियम मात्र १९ व्या शतकात निश्चित झाले.
याच काळात बुद्धिबळावर ग्रंथ लिहिले जाऊ लागले. सर्वात जुने अजूनही टिकलेले छापील पुस्तक Repetición de Amores y Arte de Ajedrez (इंग्लिशमध्ये Repetition of Love and the Art of Playing Chess) स्पेनच्या लुइस रामिरेझ दे लुसेना याने सालामांका येथे प्रसिद्ध केले..[११] लुसेना आणि त्यानंतरच्या १६ व्या आणि १७ व्या शतकातील तज्ज्ञांनी, उदाहरणार्थ, पोर्तुगालच्या पेद्रो दामिआनो, इटलीच्या जिओवान्नी लिओनार्दो डी बोना, गिउलिओ सीझर पोलेरिओ आणि जिओअक्सिनो ग्रेको किंवा स्पेनचे धर्मगुरू रूय लोपेझ दे सेगुरा यांनी डावाची सुरुवातीला करावयाच्या चालींसंबंधीची मूलभूत तत्त्वे विकसित केली. त्यातूनच इटालियन गेम, किंग्ज गँबिट आणि रूय लोपेझ सारख्या डावांची सुरुवात झाली.
१८ व्या शतकात युरोपातील बुद्धिबळाचे केंद्र दक्षिण युरोपातील फ्रान्स बनले. दोन महत्त्वाचे फ्रेंच तज्ज्ञ, प्यांद्यांचे महत्त्व जाणणारे फ्रँकॉईस-आंद्रे डॅनिकन फिलिडोर, व्यवसायाने संगीतकार, आणि लुइस चार्ल्स माहे दे ला बुर्दोनाईस यांनी ब्रिटिश तज्ज्ञ आलेक्झांडर मॅकडॉनेल याला १८३४ मध्ये विविध मालिकांमध्ये हरवले.[१२] त्यावेळी बुद्धिबळ युरोपातील मोठ्या शहरातील कॉफीघरांतून खेळले जात असे. उदाहरणार्थ: कॅफे दे ला रेजंस, पॅरीस[१३] आणि सिम्पसन्स दिवान, लंडन .[१४]
१९ व्या शतकात विविध संघटना स्थापल्या गेल्या. बरेच क्लब्ज, पुस्तके आणि जर्नल्स प्रसिद्ध होऊ लागली. पत्रांद्वारे बुद्धिबळ सामनेही खेळले जाऊ लागले. उदा: लंडन चेस क्लब आणि एडिंबरो चेस क्लब यांमधील १८२४ मध्ये झालेला सामना.[१५] वर्तमानपत्रातून येणारी बुद्धिबळातील कोडीही लोकप्रिय होऊ लागली. बर्नार्ड हॉरविट्झ, जोसेफ किंग आणि सॅम्युएल लॉईड यांनी एकापेक्षा एक सरस कोडी रचली. १८४३ मध्ये जर्मनीच्या पॉल रुडॉल्फ वॉन बिल्गुएर आणि टासिलो हेडेब्रांड उंड डेर लासा . या तज्ज्ञांनी लिहिलेल्या Handbuch des Schachspiels या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
स्पर्धात्मक खेळाची सुरुवात (१८५० - १९४५)
युद्धोत्तर पर्व (१९४५ च्या पुढे)
सांस्कृतिक महत्त्व
चालींची नोंद
व्यूहरचना
बुद्धिबळातील कोडी
स्पर्धात्मक खेळ
गणित आणि संगणक
मानसशास्त्र
हेसुद्धा पाहा
संदर्भ
- ^ Murray, H.J.R. (1913). A History of Chess. Benjamin Press (originally published by Oxford University Press). ISBN 0-936317-01-9.
- ^ या सुत्तात , बुद्ध बौद्ध भिक्षूंना समजावतो, "भिक्षूंनो, जरी बरेच साधू आठ/दहा पंक्तींचे चतुरंग, मानसिक चतुरंग, लंगडी, ठोकळे, मनातील शब्द/संख्या ओळखणे, चेंडूंचे खेळ सारख्य खेळांच्या आहारी गेले असले तरी गोतामा साधू अशा अनुपयोगी गोष्टींच्या मागे लागत नाहीत. " दिघ निकाय, मॉरिस वॉल्श, पान ७०
- ^ Hooper and Whyld, 144-45 (first edition)
- ^ Sonja Musser Golladay's English Translation of Alfonso X's Book of Games. Retrieved 11 December 2006
- ^ Li, David H. (1998). The Genealogy of Chess. Premier Pub. Co. ISBN 0-9637852-2-2.; Sam Sloan (1985). The Origin of Chess. Sloan Publishers. ISBN 0-9609190-1-5.The Origin of Chess Retrieved 27 February 2007
- ^ Davidson (1981), p. 9
- ^ Hooper and Whyld, 144-45 (first edition)
- ^ Davidson (1981), p. 13–17
- ^ Calvo, Ricardo. Valencia Spain: The Cradle of European Chess. Retrieved 10 December 2006
- ^ An analysis from the feminist perspective: Weissberger, Barbara F. (2003). Isabel Rules: constructing queenship, wielding power. University of Minnesota Press. ISBN 0-8166-4164-1. P. 152ff
- ^ Calvo, Ricardo. Valencia Spain: The Cradle of European Chess. Retrieved 10 December 2006
- ^ Louis Charles Mahe De La Bourdonnai. Chessgames.com. Retrieved 30 November 2006.
- ^ Metzner, Paul (1998). Crescendo of the Virtuoso: Spectacle, Skill, and Self-Promotion in Paris during the Age of Revolution. Berkeley: University of California Press. ISBN 0-520-20684-3. Online version
- ^ Bird, Henry Edward. Chess History and Reminiscences. Retrieved 10 December 2006
- ^ London Chess Club. Chessgames.com. Retrieved 30 November 2006.
बाह्य दुवे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |