प्यादे (बुद्धिबळ)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बुद्धिबळातील सोंगट्या | ||
---|---|---|
राजा | ||
राणी | ||
हत्ती | ||
उंट | ||
घोडा | ||
प्यादे |
प्यादे हा बुद्धिबळातील एक सैन्य प्रकार आहे.
पायदळाचे प्रतिनिधित्व करणारे प्यादे हे बुद्धिबळातील संख्येने विपूल, पण इतरांपेक्षा तुलनेने सर्वात कमी ताकदीचे सैन्य आहे.
दोन्ही खेळाडूंकडे प्रत्येकी ८ प्यादे असतात. खेळात प्याद्यांची जागा दुसऱ्या रांगेत असते. पहिल्या रांगेतल्या प्रत्येक मोहोऱ्या पुढील घरांत एक प्यादे असते.
अधिकृत नियमावलीत प्रत्यक्ष उल्लेख नसला तरी इतरांपेक्षा वेगळे असलेल्या प्याद्यांना "मोहोरे" म्हणून संबोधले जात नाही.
चाल
[संपादन]
प्याद्याच्या चालीचे नियम इतर मोहोऱ्यांपेक्षा बरेच वेगळे आहेत.
प्याद्याला कोणत्याही परिस्थितीत माघारी येता येत नाही.
प्यादे फक्त सुरुवातीची पहिली चाल दोन घरे पुढे चालू शकते (ते सुद्धा पुढची दोन्ही घरे मोकळी असली तरच).
इतर वेळी प्याद्याला फक्त एक घर पुढे चालता येते.
पुढच्या घरांत स्वपक्ष किंवा शत्रू पक्षाचे कोणतेही मोहोरे / प्यादी असल्यास प्याद्याला पुढे जाता येत नाही, कारण प्याद्याला पुढील सरळ रेषेतील घरात असलेल्या मोहोऱ्यावर वार करण्याची मुभा नसते.
वार
[संपादन]शत्रू पक्षाचे मोहोरे जर प्याद्याच्या पुढच्या दिशेला तिरक्या रेषेतील (उजवी कडे किंवा डावी कडे) पहिल्या घरांत असेल तरच प्यादे वार करू शकते.