आँ पासाँ
Appearance
(एन पासंट या पानावरून पुनर्निर्देशित)
एन पासंट हा बुद्धिबळातील एक नियम आहे. फ्रेंच भाषेतील एन पासंट (जाताजाता) या शब्दावरून या नियमाला नाव दिले गेले.
हा नियम समजण्यासाठी बाजूचे चित्र बघा. हा नियम लागू होण्याकरता ३ गोष्टी होणे गरजेचे असते.
- नियम केवळ प्यादांसाठी लागू होतो.
- एक प्यादे त्याच्या मूळ ठिकाणी आणि दुसरे आजू-बाजूच्या रांगेत २ घरांनी पुढे असणे आवश्यक आहे. (उदा. बाजूच्या चित्रातील पांढरे प्यादे - a2, आणि काळे प्यादे - b4)
- बाजूच्या उदाहरणात अशा परिस्थितीत जर पांढरे प्यादे जर काळ्या प्याद्याकडून मात टाळण्याकरीता १ ऐवजी २ घरे पुढे गेले (उदा. a2 वरून a4),
तर काळ्या प्याद्याकडून पांढऱ्या प्याद्याला "जाता-जाता" (en-passant) मात दिली जाऊ शकते. अशा वेळी पांढरे प्यादे दोनऐवजी एकच घर चालले आहे असे समजले जाते, आणि त्यानुसार काळे प्यादे एक घर तिरपे सरकते. (चित्राप्रमाणे b4 वरून a3)
सशर्त ऐच्छिकता
[संपादन]हा नियम लागू करायचा की नाही याचा निर्णय मात देणाऱ्या (वरील उदाहरणाप्रमाणे काळ्या सोंगट्यांनी खेळणाऱ्या) खेळाडूने घ्यायचा असतो. मात्र त्यासाठीही २ गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक असते.
- हा नियम केवळ लगोलग पुढच्या चालीपुरताच लागू असतो. म्हणजेच जर वरच्या उदाहरणात, काळ्या बाजूने खेळणाऱ्याने समजा पांढरे प्यादे २ घर पुढे गेल्यावर एन पासंट नियम न वापरता इतर कुठलीही खेळी खेळली, तर त्याला नंतरच्या कुठल्याही खेळीत त्या पांढऱ्या प्याद्यासाठी हा नियम वापरता येत नाही.
- आणि तसेच जर हा नियम वापरण्याऐवजी इतर कुठलीही खेळी उपलब्ध नसेल (उदा. स्टेलमेट), तर हा नियम वापरणे अनिवार्य असते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |