"अशोक जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४२: ओळ ४२:
अशोक जैन यांनी कलंदर या टोपणनावाने 'कानोकानी' हे राजकीय-सामाजिक-साहित्यिक-सांस्कृतिक घटना-घडामोडींवर मिश्कील टिप्पणी करणारे सदर लिहायला सुरुवात केली. पुढे 'कानोकानी' या त्यांच्या सदरातील लेखांचे त्याच नावाचे पुस्तक झाले. पुस्तकाचा पुढचा भागही 'आणखी कानोकानी' या नावाने प्रकाशित झाला.

इंग्रजीतील अनेक चांगल्या चांगल्या पुस्तकांचे त्यांनी सुबोध मराठीत अनुवाद केले आहेत. 'इंडिया टुडे'च्या दोन अंकांत इंदिरा गांधींवरील पुपुल जयकर यांच्या आगामी चरित्राचे भाग आले होते. ते वाचल्यावर [[राजहंस प्रकाशन]]च्या [[दिलीप माजगावकर]] हे त्या पुस्तकाच्या अनुवादाचे हक्क घेण्यासाठी प्रयत्न करू लागले. तेव्हा त्याच्या अनुवादासाठी श्रीकांत लागू यांचे नाव आले. माजगावकर त्यांच्याकडे गेले. पण लागूंनी 'याचा माझ्यापेक्षा अशोक जैन चांगला अनुवाद करतील' असे सुचविले <ref name="लोकसत्ता २०१४०२१९"/>. तेव्हा जैन दिल्लीत होते. त्यामुळे त्यांनी लेखकाने अनुभवलेला सगळा काळ, माहोल अनुवादात उतरवण्याचा प्रयत्न केला आणि तो अनुवाद चांगलाच यशस्वी ठरला.
इंग्रजीतील अनेक चांगल्या चांगल्या पुस्तकांचे त्यांनी सुबोध मराठीत अनुवाद केले आहेत. 'इंडिया टुडे'च्या दोन अंकांत इंदिरा गांधींवरील पुपुल जयकर यांच्या आगामी चरित्राचे भाग आले होते. ते वाचल्यावर [[राजहंस प्रकाशन]]च्या [[दिलीप माजगावकर]] हे त्या पुस्तकाच्या अनुवादाचे हक्क घेण्यासाठी प्रयत्‍न करू लागले. तेव्हा त्याच्या अनुवादासाठी श्रीकांत लागू यांचे नाव आले. माजगावकर त्यांच्याकडे गेले. पण लागूंनी 'याचा माझ्यापेक्षा अशोक जैन चांगला अनुवाद करतील' असे सुचविले <ref name="लोकसत्ता २०१४०२१९"/>. तेव्हा जैन दिल्लीत होते. त्यामुळे त्यांनी लेखकाने अनुभवलेला सगळा काळ, माहोल अनुवादात उतरवण्याचा प्रयत्‍न केला आणि तो अनुवाद चांगलाच यशस्वी ठरला.

अशोक जैन यांच्या पत्नीचे नाव सुनीती जैन. शेवटची दहा वर्षे अर्धांगवायूने आजारी असणाऱ्या अशोक जैन यांच्याकडून अपुरे राहिलेले अनुवाद पूर्ण करवून घेण्यात त्यांची मोठीच मदत झाली.
अशोक जैन यांच्या पत्नीचे नाव सुनीती जैन. शेवटची दहा वर्षे अर्धांगवायूने आजारी असणाऱ्या अशोक जैन यांच्याकडून अपुरे राहिलेले अनुवाद पूर्ण करवून घेण्यात त्यांची मोठीच मदत झाली.

==अशोक जैन यांचे गाजलेले लेख==
==अशोक जैन यांचे गाजलेले लेख==
* नाट्य-चित्र अभिनेते डॉ. [[श्रीराम लागू]] यांच्या 'परमेश्वराला रिटायर करा' हा लेख.
* नाट्य-चित्रअभिनेते डॉ. [[श्रीराम लागू]] यांच्या 'परमेश्वराला रिटायर करा' हा लेख.

== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
ओळ ७४: ओळ ७४:
|-
|-
| कानोकानी || लेखसंग्रह || || १९९६ || मराठी ||
| कानोकानी || लेखसंग्रह || || १९९६ || मराठी ||
|-
| डॉक्युमेन्ट || कादंबरी || अनुवादित || || मराठी || मूळ लेखक : आयर्विंग वॉलेस
|-
|-
| फॅन्टॅस्टिक फेलुदा || अनुवादित पुस्तक मालिका || || || मराठी || मूळ लेखक : [[सत्यजित राय]]
| फॅन्टॅस्टिक फेलुदा || अनुवादित पुस्तक मालिका || || || मराठी || मूळ लेखक : [[सत्यजित राय]]
ओळ ८१: ओळ ८३:
| राजधानीतून || लेखसंग्रह || || २००३ || मराठी ||
| राजधानीतून || लेखसंग्रह || || २००३ || मराठी ||
|-
|-
| लतादीदी || अनुवादित || || || मराठी || मूळ लेखक : हरीश भिमानी
| लतादीदी || अनुवादित || || || मराठी || मूळ लेखक : हरीश भिमाणी
|-
|-
| लक्ष्मणरेषा || अनुवादित || || १९९८ || मराठी || [[आर.के. लक्ष्मण]] यांचे आत्मचरित्र
| लक्ष्मणरेषा || अनुवादित || || १९९८ || मराठी || [[आर.के. लक्ष्मण]] यांचे आत्मचरित्र
ओळ ८९: ओळ ९१:
| व्योमकेश बक्षी - रहस्यकथा || अनुवादित || || || मराठी || मूळ लेखक : शरदिंदू बंदोपाध्याय
| व्योमकेश बक्षी - रहस्यकथा || अनुवादित || || || मराठी || मूळ लेखक : शरदिंदू बंदोपाध्याय
|-
|-
| लालबहादूर शास्त्री-राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम || अनुवादित || || || मराठी || मूळ लेखक : पी.पी. श्रीवास्तव
| लालबहादूर शास्त्री-राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम || अनुवादित || || || मराठी || मूळ लेखक : सी.पी. श्रीवास्तव
|-
| शेषन || चरित्र || अनुवादित || || मराठी || मूळ लेखक : के.गोविंदन कुट्टी
|-
|-
| स्वामी व त्याचे दोस्त || अनुवादित || || || मराठी || मूळ लेखक : [[आर.के. नारायण]]
| स्वामी व त्याचे दोस्त || अनुवादित || || || मराठी || मूळ लेखक : [[आर.के. नारायण]]
|}
|}

==पुरस्कार==

== संदर्भ व नोंदी ==
== संदर्भ व नोंदी ==

१४:१५, १९ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

अशोक जैन
जन्म नाव अशोक चंदनमल जैन
जन्म ११ एप्रिल, इ.स. १९४४
घोडेगाव, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत
मृत्यू १८ फेब्रुवारी, इ.स. २०१४
मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र पत्रकारिता, साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार अनुवाद
प्रसिद्ध साहित्यकृती राजधानीतून, कानोकानी
पत्नी सुनीति अशोक जैन

अशोक चंदनमल जैन (११ एप्रिल, इ.स. १९४४; घोडेगाव, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत - १८ फेब्रुवारी, इ.स. २०१४; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी पत्रकार, लेखक होते. हे काही काळ महाराष्ट्र टाइम्स या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक होते.

आरंभिक जीवन

अशोक जैन यांचा जन्म ११ एप्रिल, इ.स. १९४४ रोजी पुण्याजवळील घोडेगाव येथे झाला [१].

पत्रकारिता आणि साहित्यिक कारकीर्द

इ.स. १९६४ साली जैन यांनी बी.ए.ची पदवी मिळवली [२]. महाविद्यलयात असतानाच त्यांनी पुण्यातील दैनिक सकाळमधून पत्रकारितेचे धडे गिरवायला सुरुवात केली. पुढे पुण्यातील दैनिक तरुण भारतमध्ये काम केल्यानंतर ते केसरीमध्ये रुजू झाले [२]. इ.स. १९६६ साली जैनांनी मुंबईला स्थलांतर करून महाराष्ट्र टाइम्समध्ये काम मिळविले.

मुंबईत १२ वर्षे काम केल्यावर अशोक जैन हे महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी म्हणून दिल्लीला गेले. इ.स. १९७८ ते इ.स. १९८९ या काळात त्यांनी दिल्लीहून 'राजधानीतून' या नावाने साप्ताहिक वार्तापत्रे लिहिली. जैनांची चौफेर दृष्टी, विचक्षणपणा, आणि त्यांच्या खेळकर शैलीने ही वार्तापत्रे चांगलीच गाजली. इ.स. १९८९ साली महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक झाल्यावर मटाच्या 'मैफल' या साप्ताहिक पुरवणीची जबाबदारी अशोक जैन यांना देण्यात आली. विषयवैविध्य आणि नावीन्य यांमुळे या पुरवणीला त्यांच्या काळात प्रतिष्ठा मिळाली. अशोक जैन पुढे महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहसंपादक आणि कार्यकारी संपादकही [१] झाले.

अशोक जैन यांनी कलंदर या टोपणनावाने 'कानोकानी' हे राजकीय-सामाजिक-साहित्यिक-सांस्कृतिक घटना-घडामोडींवर मिश्कील टिप्पणी करणारे सदर लिहायला सुरुवात केली. पुढे 'कानोकानी' या त्यांच्या सदरातील लेखांचे त्याच नावाचे पुस्तक झाले. पुस्तकाचा पुढचा भागही 'आणखी कानोकानी' या नावाने प्रकाशित झाला.

इंग्रजीतील अनेक चांगल्या चांगल्या पुस्तकांचे त्यांनी सुबोध मराठीत अनुवाद केले आहेत. 'इंडिया टुडे'च्या दोन अंकांत इंदिरा गांधींवरील पुपुल जयकर यांच्या आगामी चरित्राचे भाग आले होते. ते वाचल्यावर राजहंस प्रकाशनच्या दिलीप माजगावकर हे त्या पुस्तकाच्या अनुवादाचे हक्क घेण्यासाठी प्रयत्‍न करू लागले. तेव्हा त्याच्या अनुवादासाठी श्रीकांत लागू यांचे नाव आले. माजगावकर त्यांच्याकडे गेले. पण लागूंनी 'याचा माझ्यापेक्षा अशोक जैन चांगला अनुवाद करतील' असे सुचविले [२]. तेव्हा जैन दिल्लीत होते. त्यामुळे त्यांनी लेखकाने अनुभवलेला सगळा काळ, माहोल अनुवादात उतरवण्याचा प्रयत्‍न केला आणि तो अनुवाद चांगलाच यशस्वी ठरला.

अशोक जैन यांच्या पत्नीचे नाव सुनीती जैन. शेवटची दहा वर्षे अर्धांगवायूने आजारी असणाऱ्या अशोक जैन यांच्याकडून अपुरे राहिलेले अनुवाद पूर्ण करवून घेण्यात त्यांची मोठीच मदत झाली.

अशोक जैन यांचे गाजलेले लेख

  • नाट्य-चित्रअभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या 'परमेश्वराला रिटायर करा' हा लेख.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशक / प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.) भाषा टिप्पणी
अंतस्थ अनुवादित मराठी मूळ लेखक : पी.व्ही. नरसिंह राव
अत्तराचे थेंब लेखसंग्रह २००९ मराठी
आणखी कानोकानी लेखसंग्रह २००३ मराठी
इंदिरा- अंतिम पर्व अनुवादित मराठी मूळ लेखक : पी. सी. अलेक्झांडर
इंदिरा गांधी अनुवादित मराठी मूळ लेखक : पुपुल जयकर
इंदिरा गांधी, आणीबाणी आणि भारतीय लोकशाही अनुवादित मराठी मूळ लेखक : पी.एन. धर
कस्तुरबा - शलाका तेजाची अनुवादित मराठी मूळ लेखक : अरुण गांधी
कानोकानी लेखसंग्रह १९९६ मराठी
डॉक्युमेन्ट कादंबरी अनुवादित मराठी मूळ लेखक : आयर्विंग वॉलेस
फॅन्टॅस्टिक फेलुदा अनुवादित पुस्तक मालिका मराठी मूळ लेखक : सत्यजित राय
बॅचलर ऑफ आर्ट्‌स अनुवादित मराठी मूळ लेखक : आर.के. लक्ष्मण
राजधानीतून लेखसंग्रह २००३ मराठी
लतादीदी अनुवादित मराठी मूळ लेखक : हरीश भिमाणी
लक्ष्मणरेषा अनुवादित १९९८ मराठी आर.के. लक्ष्मण यांचे आत्मचरित्र
वॉकिंग विथ द लायन अनुवादित मराठी मूळ लेखक : नटवरसिंग
व्योमकेश बक्षी - रहस्यकथा अनुवादित मराठी मूळ लेखक : शरदिंदू बंदोपाध्याय
लालबहादूर शास्त्री-राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम अनुवादित मराठी मूळ लेखक : सी.पी. श्रीवास्तव
शेषन चरित्र अनुवादित मराठी मूळ लेखक : के.गोविंदन कुट्टी
स्वामी व त्याचे दोस्त अनुवादित मराठी मूळ लेखक : आर.के. नारायण

पुरस्कार

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/ashok-jain/articleshow/30647964.cms. २७ फेब्रुवारी, इ.स. २०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ a b c http://www.loksatta.com/mumbai-news/journalist-ashok-jain-life-journey-377367/. १ मार्च, इ.स. २०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)