"यशवंत गोपाळ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
||
ओळ १७: | ओळ १७: | ||
==य.गो. जोशी यांचे कथासंग्रह== |
==य.गो. जोशी यांचे कथासंग्रह== |
||
* अनंता परत आला (कादंबरी) |
* अनंता परत आला (कादंबरी) |
||
* अनौपचारिक मुलाखती |
|||
* आवडत्या गोष्टी |
* आवडत्या गोष्टी |
||
* औदुंबर आणि पारिजात |
|||
* गजरा मोतियाचा |
|||
* जाईजुई - कथासंग्रह; एकूण सोळा कथा; त्यांतील वहिनींच्या बांगड्या, अन्न आणि अन्न, आणि शेवग्याच्या शेंगा या तीन कथांवर चित्रपट निघाले. |
* जाईजुई - कथासंग्रह; एकूण सोळा कथा; त्यांतील वहिनींच्या बांगड्या, अन्न आणि अन्न, आणि शेवग्याच्या शेंगा या तीन कथांवर चित्रपट निघाले. |
||
* तुळशीपत्र आणि इतर गोष्टी |
* तुळशीपत्र आणि इतर गोष्टी |
||
ओळ २४: | ओळ २७: | ||
* पडसाद (कादंबरी) |
* पडसाद (कादंबरी) |
||
* पुनर्भेट भाग १ ते १० |
* पुनर्भेट भाग १ ते १० |
||
* भेळ |
|||
* महाराष्ट्र परिचय अर्थात संयुक्त महाराष्ट्राचा ज्ञानकोश (संपादक; सहसंपादक [[चिं.ग. कर्वे]], [[स.आ. जोशी]] |
|||
* मायेच्या सावल्या |
* मायेच्या सावल्या |
||
* मीलन (कादंबरी) |
* मीलन (कादंबरी) |
||
* मुद्रण व्यवस्थापन मंत्र व तंत्र |
|||
* य.गो. जोशी यांच्या निवडक कथा (संपादक : [[शांता शेळके]]) |
* य.गो. जोशी यांच्या निवडक कथा (संपादक : [[शांता शेळके]]) |
||
* रेघोट्यांचे दैवत |
* रेघोट्यांचे दैवत |
||
* शेवग्याच्या शेंगा |
* शेवग्याच्या शेंगा |
||
* श्रीकांत |
|||
* संगीत श्रीमुखात (नाटक) |
|||
* साहित्यिकांची सफर |
* साहित्यिकांची सफर |
||
* सुपारी |
* सुपारी |
||
* सुबोध ज्ञानेश्वरी अध्याय १ ते १८ |
|||
* सात पावले |
|||
* होमकुंड |
|||
==य.गो.जोशी यांच्या साहित्याचा परामर्श घेणारी पुस्तके== |
==य.गो.जोशी यांच्या साहित्याचा परामर्श घेणारी पुस्तके== |
००:००, १९ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
य.गो. जोशी (यशवंत गोपाळ जोशी) (१७ डिसेंबर, इ.स. १९०१:भिगवण, भारत - ७ नोव्हेंबर, इ.स. १९६३:पुणे). हे मराठीतील एक लेखक आणि पटकथालेखक होते. ’अन्नपूर्णा’, वहिनींच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ या यशस्वी मराठी चित्रपटांची कथा आणि पटकथा य.गो. जोशींची होती.
य.गो. जोशी यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथे झाले. आर्थिक ओढगस्तीमुळे इंग्रजी पाचवीत असतानाच त्यांनी शिक्षण सोडले. त्यानंतर त्यांनी अनेक नोकऱ्या केल्या. शाई, सुगंधी तेले तयार करून विकण्याचा तसेच वृतपत्रे विकण्याचा व्यवसाय केला. पुढे लेखनास सुरुवात केली व १९३४ मध्ये प्रकाशन व्यवसायास आरंभ केला. हे प्रकाशन प्रामुख्याने वैचारिक वाङ्मय प्रकाशित करत असे. शिवराम महादेव परांजपे यांच्या ’काळातील निवडक निबंधां’चे १० भाग य.गो. जोशी प्रकाशनाने प्रसिद्ध केले होते.
य.गो. जोशी यांची ’एक रुपया दोन आणे’ ही पहिली कथा यशवंत या मसिकात १९२९ साली प्रसिद्ध झाली. आणि याच मासिकाच्या कथास्पर्धेत य.गो. जोशींच्या ’शेवग्याच्या शेंगा’ या कथेस पहिले पारितोषिक मिळाले.
जिवंत अनुभवातून प्रकटलेली जोशी यांची कथा पांढरपेशा मध्यमवर्गीय जीवनाचे, व्यक्ती–व्यक्तींतील भावसंबंधाचे जिव्हाळ्याचे चित्रण करते. परिणामाची उत्कटता, सहजसुंदर संवाद, साधी, प्रसन्न आणि अर्थपूर्ण भाषाशैली ही त्यांच्या कथालेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होती. तंत्र हे कथेच्या गळ्यात अडकलेले लेढणे, अशी त्यांची ठाम समजूत होती. ‘ग्यानबा तुकाराम आणि टेक्निक’ ह्या कथेतून त्यांनी तंत्राच्या हव्यासाचा उपहास केला आहे.
य.गो. जोशी हे पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या ’प्रसाद’ मासिकाचे संपादक होते.
७ नोव्हेंबरला य.गो. जोशींची पुण्यतिथी असते. त्या दिवशी नामवंतांच्या उपस्थितीत ’यशवंत संध्या’ नावाचा संगीत कार्यक्रम करण्यात येतो.
य.गो. जोशी यांचे कथासंग्रह
- अनंता परत आला (कादंबरी)
- अनौपचारिक मुलाखती
- आवडत्या गोष्टी
- औदुंबर आणि पारिजात
- गजरा मोतियाचा
- जाईजुई - कथासंग्रह; एकूण सोळा कथा; त्यांतील वहिनींच्या बांगड्या, अन्न आणि अन्न, आणि शेवग्याच्या शेंगा या तीन कथांवर चित्रपट निघाले.
- तुळशीपत्र आणि इतर गोष्टी
- दुधाची घागर (आत्मचरित्र)
- दोन वजा एक
- पडसाद (कादंबरी)
- पुनर्भेट भाग १ ते १०
- भेळ
- महाराष्ट्र परिचय अर्थात संयुक्त महाराष्ट्राचा ज्ञानकोश (संपादक; सहसंपादक चिं.ग. कर्वे, स.आ. जोशी
- मायेच्या सावल्या
- मीलन (कादंबरी)
- मुद्रण व्यवस्थापन मंत्र व तंत्र
- य.गो. जोशी यांच्या निवडक कथा (संपादक : शांता शेळके)
- रेघोट्यांचे दैवत
- शेवग्याच्या शेंगा
- श्रीकांत
- संगीत श्रीमुखात (नाटक)
- साहित्यिकांची सफर
- सुपारी
- सुबोध ज्ञानेश्वरी अध्याय १ ते १८
- सात पावले
- होमकुंड
य.गो.जोशी यांच्या साहित्याचा परामर्श घेणारी पुस्तके
- य. गो. जोशी : जीवन आणि वाङ्मय - उषा गोखले
- य. गो. जोशी : व्यक्ती आणि वाङ्मय - सुनंदा दास
य.गो. जोशी प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली पुस्तके
- अभंग संकीर्तन, लेखक शं.वा. दांडेकर
- ईश्वरवाद, लेखक शं.वा. दांडेकर
- आचार्य अत्रे चरित्र आणि वाङ्मय, लेखक मा.का. देशपांडे
- आमची अकरा वर्षे, लेखिका लीलाबाई पटवर्धन
- आमच्य़ा देशाची स्थिती, लेखक विष्णुशास्त्री चिपळूणकर
- इंग्रजी-मराठी शब्दकोश, संपादक प्रा.रानडे
- उपहासिनी, संपादक विनायक दिनकर देव
- काळातील निवडक निबंध भाग १ ते १०, लेखक शिवराम महादेव परांजपे
- क्रांतीच्या वाटेवर, लेखक भा.द. खेर
- ग्रीक देश कसा स्वतंत्र झाला ?, लेखक शि.म. परांजपे
- छोटा सैनिक, लेखिका तारा पंडित
- टिळक भारत, लेखक शि.ल. करंदीकर
- तिचे अखेरचे पत्र व अघोर अहंकार, लेखक ना.म. पटवर्धन
- दरिद्री नारायण, लेखक वामन श्री. पुरोहित
- देहूरोड, लेखक गो.ल. आपटे
- नरसिंह केळकर, लेखक वि.तु. वैद्य
- महान क्रिकेट कर्णधार, लेखक रघुनाथ गोविंद सरदेसाई
- महाराष्ट्र आणि महागुजरात ह्यांच्या समग्र माहितीचा ज्ञानकोश, संपादक य.गो. जोशी आणि अनेकजण)
- महाराष्ट्र शब्दकोश खंड १ ते १८, संपादक दाते-कर्वे.
- प्रतिभालांच्छन, लेखक शंकर कृष्ण देवभक्त
- प्रतिबिंब, लेखक वामन कृष्ण परांजपे
- बाबू कुँवर सिंह यांचे चरित्र, लेखक गणेश सीताराम जोशी
- महाराष्ट्रातील पाच संप्रदाय, लेखक पं.रा. मोकाशी
- मेघदूतावर नवा प्रकाश, लेखक वामन कृष्ण परांजपे
- रशियातील राज्यक्रांती, लेखक पां.वा. गाडगीळ
- राईट बंधूंचे गागारीन, लेखक प्र,न, जोशी
- लक्ष्मीबाई वैद्य एक व्यक्तिरेखा, लेखक य.ब.पटवर्धन
- व्यक्ति आणि वाङ्मय, लेखक श्री.के. क्षीरसागर
- शास्त्रज्ञांचा चरित्रकोश, लेखक प्र,न, जोशी
- सवाई गंधर्व, लेखक पांडुरंग हरि देशपांडे
- साहित्य संग्रह भाग १ ते ३, लेखक शिवराम महादेव परांजपे
- सोशॅलिझम अर्थात सुलभ समाजवाद, लेखक पां.वा. गाडगीळ
- हायडी, लेखक मिखेल शोलोखोव्ह
- ज्ञानेश्वरी, संपादक सोनोपंत दांडेकर