मा.का. देशपांडे
Appearance
प्रा. माधव काशीनाथ देशपांडे (इ.स. १९१० - इ.स. १९७४) हे मराठी कथालेखक आणि कादंबरीकार होते.
देशपांडे १९३३-३९ या काळात पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात, आणि १९३९-४१ या काळात अहमदाबादच्या कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये इंग्लिशचे प्राध्यापक होते. कॉलेजांतील नोकरी सोडल्यानंतर ते पुण्यात इंग्लिशचे वर्ग चालवीत.
चरित्र ग्रंध
[संपादन]- अत्रे-चरित्र आणि वाङ्मय (आचार्य अत्रे यांचे चरित्र आणि त्यांच्या वाङ्मयाची समीक्षा, १९४०)
- कादंबरीकार फडके
- केळकर-चरित्र आणि वाङ्मय (न.चिं. केळकर यांचे चरित्र आणि त्यांच्या वाङ्मयाची समीक्षा, १९४९)
- खांडेकर-चरित्र आणि वाङ्मय (वि.स. खांडेकर यांचे चरित्र आणि त्यांच्या वाङ्मयाची समीक्षा)
- पंडित जवाहरलाल नेहरू
- पंडित जवाहरलाल नेहरू विचार आणि व्यक्तिमत्त्व
- प्रा. फडके यांचे वाङ्मय दर्शन
- प्रो. फडके-चरित्र आणि वाङ्मय - (ना.सी. फडके यांचे चरित्र) आणि त्यांच्या वाङ्मयाची समीक्षा, १९४६)
- माडखोलकर-वाङ्मय आणि समीक्षा (ग.त्र्यं. माडखोलकर यांचे चरित्र आणि त्यांच्या वाङ्मयाची समीक्षा)
- वा.म. जोशी-चरित्र आणि वाङ्मय (वामन मल्हार जोशी यांचे चरित्र आणि त्यांच्या वाङ्मयाची समीक्षा)
- यांशिवाय मा.का. देशपांडे यांच्या नावावर इंग्रजी भाषा शिकणाऱ्यासाठी त्यांनी लिहिलेली अशी काही खास पुस्तके आहेत. ती अशी -
- आंग्ल संभाषण कला
- आंग्ल संभाषण कलेचा ओनामा
- इंग्रजी उच्चार कोश
- इंग्रजी संभाषणाचा ओनामा
- इंग्लिश उच्चार
- English for Ladies
- इंग्लिश सुवचनांचा कोश (A Dictionary of English Quotations and Proverbs)
- डिक्शनरी
- तुमचा शब्दसंग्रह वाढवा
- तुमचे इंग्रजी सांभाळा
- A New Comprehensive English मराठी English Dictionary
- A Pre-Degree English Grammar And Composition for Poona and Shivaji Universities, In English and Marathi
- भाषांतर कला
- मराठी-इंग्रजी शब्दकोश (१९६७)
- महिलांसाठी इंग्रजी
- वाक्यप्रचाराचा कोश इंग्लिश-मराठी-इंग्लिश
- संपूर्ण मराठी शेक्सपिअर (मॅक्बेथ, ..., ..., ...)
- सहा महिन्यांत इंग्लिश
- हसत खेळत इंग्रजी
- हसत खेळत इंग्रजी ग्रामर
इतर पुस्तके
[संपादन]- अंधार (कादंबरी, १९५३)
- जीवन वृत्तान्त
- धूम्रतरंग (निबंधसंग्रह, १९३९)
- नवी फुले
- पहिला पगार
- प्रिय कविते (कवितासंग्रह, १९७२)
- संत आणि सायन्स (१९७०)
- साहित्य साधना (समीक्षा)