"समतोल फाउंडेशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: समतोल फाउंडेशन ही विविध कारणांमुळे डोक्यात राख घालून घराचा त्या... खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
(काही फरक नाही)
|
२२:१०, ६ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
समतोल फाउंडेशन ही विविध कारणांमुळे डोक्यात राख घालून घराचा त्याग करणाऱ्या कोवळ्या वयातील मुलांना आधार आणि आसरा देणारी ठाणे शहरातील एक संस्था आहे.
घरदार सोडून आलेल्या यांतील बहुतेक मुलांनी मायानगरी मुंबईची वाट धरलेली असते. मुंबईत आल्यावर खऱ्या परिस्थितीची जाणीव होईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. मग भीक मागणे, बुटपॉलिश करणे अथवा पडेल ती कामे करून पोटाची खळगी भरण्याशिवाय त्यांच्यापुढे गत्यंतरच उरत नाही. घरातून परागंदा झालेल्या अशा मुलांना संस्थेत आणून त्यांच्यात पुन्हा घराची ओढ निर्माण करण्याचे कार्य २००५ सालापासून समतोल फाउंडेशन करत आहे. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममधील एका छोट्याशा गाळ्यात सुरू असलेल्या या संस्थेचे काम मात्र मोठे आहे. आजवर सहा हजार मुलांना समतोलने पुन्हा आपल्या घरट्याकडे सुखरूप पाठवले आहे.
पहा: प्रतिष्ठाने