समतोल फाउंडेशन
Appearance
समतोल फाउंडेशन ही विविध कारणांमुळे घरातून पळून जाणाऱ्या लहान वयातील मुलांना आधार आणि आसरा देणारी ठाणे शहरातील एक संस्था आहे.
भारतातील अनेक प्रांतांतून घरदार सोडून आलेल्या आणि भीक मागणे, बुटपॉलिश करणे अथवा पडेल ती कामे करून करणाऱ्या अशा मुलांना संस्थेत आणून त्यांच्यात पुन्हा घराची ओढ निर्माण करण्याचे कार्य २००५ सालापासून समतोल फाउंडेशन करत आहे. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममधील एका छोट्याशा गाळ्यात सुरू असलेल्या या संस्थेचे काम मात्र मोठे आहे. आजवर सहा हजार मुलांना समतोलने पुन्हा आपल्या घरट्याकडे सुखरूप पाठवले आहे.