"ष्ट आणि ष्ठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३४: | ओळ ३४: | ||
* एकनिष्ठ |
* एकनिष्ठ |
||
* काष्ठ : काष्ठौषधी |
* काष्ठ : काष्ठौषधी |
||
* गोष्ठ, गोष्ठी, प्रगोष्ठ (सभागृह) |
* गोष्ठ, गोष्ठी, प्रगोष्ठ (सभागृह); गोष्ट म्हणजे कथा. |
||
* तिष्ठणे |
* तिष्ठणे |
||
* निष्ठा |
* निष्ठा |
||
ओळ ४७: | ओळ ४७: | ||
* विष्ठा |
* विष्ठा |
||
* शर्मिष्ठा |
* शर्मिष्ठा |
||
* सौष्ठव |
|||
* स्वादिष्ठ (हा शब्द मराठीत स्वादिष्ट असा लिहितात.) |
|||
==ष्ट== |
==ष्ट== |
||
ओळ ५२: | ओळ ५४: | ||
==ष्ट असलेले शब्द== |
==ष्ट असलेले शब्द== |
||
* आकृष्ट : हे आ+कृष् या संस्कृतमधील धातूचे कर्मणि भूतकालवाचक विशेषण आहे. अर्थ जवळ ओढलेला |
* आकृष्ट : हे आ+कृष् या संस्कृतमधील धातूचे कर्मणि भूतकालवाचक विशेषण आहे. अर्थ जवळ ओढलेला. यावरून अत्युत्कृष्ट, निकृष्ट वगैरे. |
||
* इष्ट : इष् (इच्छाकरणें) या धातूचे कभूधावि. इष्ट असलेले अन्य शब्द - अनिष्ट, अभीष्ट, |
* इष्ट : इष् (इच्छाकरणें) या धातूचे कभूधावि. इष्ट असलेले अन्य शब्द - अनिष्ट, अभीष्ट, |
||
* उत्कृष्ट : उत्+कृष् या धातूचे कभूधावि. वर ओढला गेलेला. म्हणू्न स्थूलार्थाने सर्वोत्तम. उत् म्हणजे वर. त्यावरून उत्तर(अधिक वर) उत्तम(सर्वात वर) |
* उत्कृष्ट : उत्+कृष् या धातूचे कभूधावि. वर ओढला गेलेला. म्हणू्न स्थूलार्थाने सर्वोत्तम. उत् म्हणजे वर. त्यावरून उत्तर(अधिक वर) उत्तम(सर्वात वर) |
||
* उद्दिष्ट : उद्+दिश् या धातूचे कभूधावि. ’उद्दिष्ट्य’ हा शब्द मराठीत नाही. |
* उद्दिष्ट : उद्+दिश् या धातूचे कभूधावि. ’उद्दिष्ट्य’ हा शब्द मराठीत नाही. |
||
* कोपिष्ट (रागीट).असेच शब्द क्रोधिष्ट, रागिष्ट, तापिष्ट वगैरे. हे शब्द कभूधावि नाहीत, आणि तमभावीसुद्धा नाहीत.. |
* कोपिष्ट (रागीट).असेच शब्द क्रोधिष्ट, रागिष्ट, तापिष्ट वगैरे. हे शब्द कभूधावि नाहीत, आणि तमभावीसुद्धा नाहीत.. |
||
* गोष्ट: गोष्टी(अनेकवचन), गोष्टीरूप |
|||
* क्रुष्ट : क्रुष्ट हा शब्द मराठीत वापरला जात नाही. |
* क्रुष्ट : क्रुष्ट हा शब्द मराठीत वापरला जात नाही. |
||
* तुष्ट : तुष् (आनंद घेणे)चे कभूधावि. यावरून संतुष्ट |
* तुष्ट : तुष् (आनंद घेणे)चे कभूधावि. यावरून संतुष्ट |
||
ओळ ६३: | ओळ ६६: | ||
* द्रष्टा : दृश् धातूचे अनद्यतन भविष्यकाळाचे (म्हणजे आजचा दिवस सोडून उद्याच्या आणि पुढच्या काळासाठी वापरावयाचे) तृतीय पुरुषी एकवचनी रूप. (द्रष्टा द्रष्टारौ द्रष्टार:). किंवा द्रष्टृ चे प्रथमपुरुषी एकवचन. |
* द्रष्टा : दृश् धातूचे अनद्यतन भविष्यकाळाचे (म्हणजे आजचा दिवस सोडून उद्याच्या आणि पुढच्या काळासाठी वापरावयाचे) तृतीय पुरुषी एकवचनी रूप. (द्रष्टा द्रष्टारौ द्रष्टार:). किंवा द्रष्टृ चे प्रथमपुरुषी एकवचन. |
||
* धृष्ट : धृष् (धजणे)चे कभूधावि. |
* धृष्ट : धृष् (धजणे)चे कभूधावि. |
||
* नतद्रष्ट |
|||
* नष्ट : नश् धातूचे कभूधावि. |
* नष्ट : नश् धातूचे कभूधावि. |
||
* निकृष्ट |
|||
* पुष्ट : पुष् (पोसणे) या धातूचे कभूधावि. यावरून पुष्टी. |
* पुष्ट : पुष् (पोसणे) या धातूचे कभूधावि. यावरून पुष्टी. |
||
* भ्रष्ट : भ्रस्ज् या धातूचे कभूधावि. यावरून भ्रष्टाचरण, भ्रष्टाचारी, भष्टाचारमुक्त,भ्रष्टाचारमुक्ती वगैरे. |
* भ्रष्ट : भ्रस्ज् या धातूचे कभूधावि. यावरून भ्रष्टाचरण, भ्रष्टाचारी, भष्टाचारमुक्त, भ्रष्टाचारमुक्ती वगैरे. |
||
* रुष्ट : रुष् (रागावणे) या धातूचे कभूधावि. |
* रुष्ट : रुष् (रागावणे) या धातूचे कभूधावि. |
||
* वेष्टित : विश् धातूचे कभूधावि. यावरून वेष्टण, [[भूपरिवेष्टित देश|परिवेष्टित]] वगैरे |
* वेष्टित : विश् धातूचे कभूधावि. यावरून वेष्टण, [[भूपरिवेष्टित देश|परिवेष्टित]] वगैरे |
||
ओळ १०७: | ओळ ११२: | ||
* यष्टी |
* यष्टी |
||
* रागिष्ट |
* रागिष्ट |
||
* राष्ट्र |
* राष्ट्र, राष्ट्रीय(संस्कतमध्ये आणि हिंदीत हा शब्द राष्ट्रिय असा लिहिला जातो.), अराष्ट्रीय, परराष्ट्र, मित्रराष्ट्र, शत्रुराष्ट्र |
||
* विशिष्ट : विशेषपासून बनलेला शब्द. या शब्दाचा ’शिष्ट’ या शब्दाशी संबंध नाही. |
* विशिष्ट : विशेषपासून बनलेला शब्द. या शब्दाचा ’शिष्ट’ या शब्दाशी संबंध नाही. |
||
* वेष्टि (लुंगी) |
* वेष्टि (लुंगी) |
||
* वैशिष्ट्य : विशिष्टपासून बनलेले भाववाचक नाम. |
* वैशिष्ट्य : विशिष्टपासून बनलेले भाववाचक नाम. |
||
* शिष्ट(मराठीत, स्ततःला ’खास’ समजणारा), अशिष्ट, शिष्टाचार |
|||
* षष्ट. यावरून षष्ट्याब्दी, षष्ट्याब्दीपूर्ती(ब्दी दीर्घ!) |
* षष्ट. यावरून षष्ट्याब्दी, षष्ट्याब्दीपूर्ती(ब्दी दीर्घ!) |
||
* सुष्ट : संस्कृत अव्यय सुष्ठु पासून मराठीसाठी बनलेला शब्द. याचा दुष्ट या शब्दाशी व्याकरणिक संबंध नसावा. |
* सुष्ट : संस्कृत अव्यय सुष्ठु पासून मराठीसाठी बनलेला शब्द. याचा दुष्ट या शब्दाशी व्याकरणिक संबंध नसावा. |
||
* स्पष्ट : यावरून, अस्पष्ट, सुस्पष्ट वगैरे |
|||
* स्पष्ट |
|||
* स्वादिष्ट : मुळात स्वादिष्ठ. |
* स्वादिष्ट : मुळात स्वादिष्ठ. |
||
ओळ १२०: | ओळ १२६: | ||
* अस्त, अस्तर, अस्ताई, अस्तुरी, |
* अस्त, अस्तर, अस्ताई, अस्तुरी, |
||
* अस्त्र |
* अस्त्र |
||
* इस्त्री : इस्तरी |
* इस्त्री : इस्तरी |
||
* उस्तवार |
* उस्तवार |
||
* कास्तकार |
* कास्तकार |
||
ओळ १२९: | ओळ १३५: | ||
* जस्त, जस्ती |
* जस्त, जस्ती |
||
* तस्त |
* तस्त |
||
* दस्त |
* दस्त. दस्तावेज, दुरुस्त-स्ती, |
||
* दोस्त |
* दोस्त, दोस्ती |
||
* नस्त |
* नस्त, नस्तर |
||
* नेमस्त, नेस्तनाबूद |
* नेमस्त, नेस्तनाबूद |
||
* पुस्तक |
* पुस्तक, पुस्तकी, पुस्तके |
||
* पेस्तनजी |
* पेस्तनजी |
||
* पोस्त |
* पोस्त |
||
* प्रस्ताव |
* प्रस्ताव |
||
* फस्त |
* फस्त |
||
* बस्ता |
* बस्ता, बस्तर, बाडबिस्तरा |
||
* मास्तर, मास्तरी, मास्तरकी |
* मास्तर, मास्तरी, मास्तरकी, हेडमास्तर |
||
* रस्ता |
* रस्ता, रास्त |
||
* वस्तरा, वस्तू, वास्तू, वास्तुशास्त्र, |
* वस्तरा, वस्तू, वास्तू, वास्तुशास्त्र, |
||
* वस्त्र, वस्त्रदालन, निर्वस्त्र, वस्त्रांकित, शुभ्रवस्त्रावृता |
|||
⚫ | |||
* वस्तू, वस्तुशः, वास्तव, वास्तविक, वास्तविकरीत्या |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* सुखवस्तू |
|||
⚫ | |||
* स्तबक |
* स्तबक |
||
* स्तब्ध |
* स्तब्ध |
||
* स्तर |
* स्तर, प्रस्तर, प्रस्तरारोहण |
||
* स्तवनीय |
|||
* स्तुती : स्तुत्य |
|||
* स्तिमित |
|||
* स्त्री : यावरून स्त्रीवादी, स्त्रीशक्ती, स्त्रीसुलभ, स्त्रैण, |
|||
* स्तुती : यावरून स्तुतिपाठक, स्तुतिप्रिय, स्तुत्य |
|||
* स्तूप |
|||
* स्तोत्र |
* स्तोत्र |
||
* स्वस्त |
* स्वस्त |
||
* स्वस्तिक |
* स्वस्तिक |
||
==स्थ असलेले शब्द== |
|||
* प्रस्थ, आस्थापना, प्रस्थापना, विस्थापित, स्थापना, स्थितिस्थापक |
|||
* स्थगित, स्थगिती |
|||
* स्थल, स्थलांतरित, मरुस्थल |
|||
* स्थान, स्थानिक, स्थानीय, प्रस्थान, संस्थान, संस्थानिक |
|||
* स्थायी, अस्थायी, स्थायिक, स्थायिभाव |
|||
* स्थाली |
|||
* स्थावर |
|||
* स्थित, व्यवस्थित, स्थिती, परिस्थिती, स्थितिस्थापक(त्व) |
|||
* स्थिर, स्थिरता, स्थिरस्थावर, स्थैर्य, अस्थिर |
|||
* स्थूल, स्थूलता, स्थूलपणा, स्थौल्य |
|||
==इंग्रजीमधून आलेले ष्ट/स्त== |
==इंग्रजीमधून आलेले ष्ट/स्त== |
||
ओळ १६९: | ओळ १९४: | ||
* मोस्ट |
* मोस्ट |
||
* रेस्ट : रेस्ट हाऊस |
* रेस्ट : रेस्ट हाऊस |
||
* स्टूल |
|||
* स्टेशन |
* स्टेशन |
||
* स्टोअर : स्टोअर्स |
* स्टोअर : स्टोअर्स |
१५:०९, ४ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती
ष, ट, ठ, आणि ण ही मूर्धन्य व्यंजने आहेत. त्यामुळे ही व्यंजने आणि ष्म आणि ष्य हे अपवाद वगळता यांचीच एकमेकांत जोडाक्षरे बनतात. ष्त, श्त, श्ट, श्ण अशी जोडाक्षरे मराठीत सापडत नाहीत.
मराठीमध्ये संस्कृतमधून आलेले ष्ट आणि ष्ठ हे प्रत्यय आहेत.यांच्या उपयोगाविषयी ही माहिती :
ष्ठ
संस्कृतमध्ये विशेषणाला 'तर' किंवा ’ईयसुन्’ हे प्रत्यय comparative degreeसाठी आणि ’तम’ किंवा ’इष्ठन्’हा superlative degreeसाठी लागतो. उदा० उच्च, उच्चतर (तुलनेने अधिक उच्च) आणि उच्चतम (सर्वात अधिक उच्च); गुरु गरीयस् गरिष्ठ, वगैरे. इंग्रजीमध्ये यासाठी अनुक्रमे 'er' आणि 'est' हे प्रत्यय लागतात. उदा० high, higher आणि highest. म्हणजे इंग्रजी est ऐवजी संस्कृतमध्ये इष्ठ आहे. संस्कृतमधून मराठीत न आलेल्या किंवा तद्भव(बदल होऊन आलेल्या) शब्दांसाठी असे प्रत्यय मराठी भाषेत नाहीत. इच्छित अर्थ मिळविण्यासाठी मराठीत ’अधिक’ आणि ’सर्वात जास्त’ हे किंवा अशा अर्थाचे शब्द वापरले जातात. उदा० उंच, अधिक उंच आणि सर्वात (जास्त) उंच.
या तर-तम वरून मराठीत धोरण किंवा सारासार विचार अशा अर्थाचा तारतम्य हा शब्द आला आहे.
==संस्कृतमधून मराठीत न आलेले शब्द==
उदा० गुरुपासून बनलेला सर्वात मोठा अशा अर्थाचा गरिष्ठ (गुरु गुरुतर/गरीयस् गुरुतम/गरिष्ठ). असे आणखीही काही शब्द आहेत. उदा० कर्तृपासून करिष्ठ, कृशपासून क्रशिष्ठ, पटुपासून पटिष्ठ, मतिमत् पासून मतिष्ठ, महत् पासून महिष्ठ, मृदु पासून म्रदिष्ठ, स्तविष्ठ, स्रविष्ठ, वगैरे अनेक. पण हे शब्द मराठीत आले नाहीत.
मराठीत आलेले शब्द
संस्कृतमधून मराठीत आलेले तत्सम शब्द हे जसेच्या तसे आल्याने, त्यांच्यांमध्ये ष्ट आणि ष्ठ हे प्रत्यय लावून बनलेले शब्द मराठी भाषेत समाविष्ट आहेत.
संस्कृत विशेषणांना ’ष्ठ’ हा प्रत्यय superlative degree दाखविण्यासाठी वापरला जात असल्याने, हा प्रत्यय लागलेले आणि मराठीत आलेले शब्द असे :
- कनिष्ठ (सर्वात खालचा; रूढार्थाने खालच्या पदावरचा) (धाकटा) (मूळ - अल्प अल्पतर/कनीयस् अल्पिष्ठ/कनिष्ठ)
- गर्विष्ठ (गुरु गरीयस् गर्विष्ठ-सर्वात मोठा; मराठी अर्थ : स्वतःला मोठा समजणारा, गर्व करणारा)
- ज्येष्ठ (सर्वात मोठा; रूढार्थाने वयाने मोठा) (महत्त्वाचा हिंदू महिना) (यावरून ज्येष्ठतर - अधिक ज्येष्ठ, ज्येष्ठतम - सर्वात वडील) (प्रशस्य श्रेयस्/ज्यायस् श्रेष्ठ/ज्येष्ठ)
- ज्येष्ठा (आकाशातील एक सर्वात मोठे वाटलेले नक्षत्र)
- ज्येष्ठागौरी (ज्येष्ठ महिन्यात घरांत पूजिल्या जाणाऱ्या गौरी)
- ज्येष्ठी (ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा)
- घनिष्ठ (सर्वात अधिक घट्ट; खूप घट्ट) (घन घनतर/घनीयस् घनतम/घनिष्ठ)
- धनिष्ठ (सर्वात जास्त धनवान) (श्रीमंत) (धनिन् धनितर/धनीयस् धनितम/धनिष्ठ)
- धनिष्ठा (श्रीमंत(?) नक्षत्र)
- वरिष्ठ (सर्वात वरचा; रूढार्थाने वरच्या पदावरचा) (वरम् वरीयस् वरिष्ठ); किंवा उरु(=मोठा)+इष्ठ.
- श्रेष्ठ (सर्वात अधिक श्रेयस; रूढार्थाने वरच्या दर्जाचा) (यापासून श्रेष्ठतर-अधिक श्रेष्ठ, श्रेष्ठतम फारच श्रेष्ठ) (प्रशस्य श्रेयस्/ज्यायस् श्रेष्ठ/ज्येष्ठ)
- श्रेष्ठी (श्रेष्ठ व्यक्ती; सावकार; नगरश्रेष्ठी, पक्षश्रेष्ठी ) (यावरून - शेट्टी, शेट, शेटजी, शेठ, शेठजी)
- स्वादिष्ठ : स्वादु स्वादीयस् स्वादिष्ठ. (मराठीत स्वादिष्ट असेही लिहितात).
तमभाव नसलेले पण ’ष्ठ’असलेले शब्द
- अंगुष्ठ
- अधिष्ठाता
- एकनिष्ठ
- काष्ठ : काष्ठौषधी
- गोष्ठ, गोष्ठी, प्रगोष्ठ (सभागृह); गोष्ट म्हणजे कथा.
- तिष्ठणे
- निष्ठा
- पृष्ठ : पृष्ठभाग, मलपृष्ठ, मुखपृष्ठ, वगैरे.
- प्रतिष्ठा : प्रति+स्था
- प्रतिष्ठान : प्रति+स्थान
- प्रतिष्ठित : प्रति+स्था या धातूचे कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण past participle.(कभूधावि.)
- मंजिष्ठ
- युधिष्ठिर : युधि(=युद्धात)+स्थिर, युद्धातही स्थिर राहणारा
- लोभिष्ठ : लोभी+इष्ठ
- वसिष्ठ : वसुमत्+इष्ठ
- विष्ठा
- शर्मिष्ठा
- सौष्ठव
- स्वादिष्ठ (हा शब्द मराठीत स्वादिष्ट असा लिहितात.)
ष्ट
’ष्ट’ हा तमभाववाचक प्रत्यय नाही. त्यामुळे हे अक्षर अंती असलेले शब्द superlative degree दाखवत नाहीत. मात्र असे अनेक शब्द बहुधा कर्मणि भूतकालवाचक विशेषणे (कभूधावि) past participle असतात.
ष्ट असलेले शब्द
- आकृष्ट : हे आ+कृष् या संस्कृतमधील धातूचे कर्मणि भूतकालवाचक विशेषण आहे. अर्थ जवळ ओढलेला. यावरून अत्युत्कृष्ट, निकृष्ट वगैरे.
- इष्ट : इष् (इच्छाकरणें) या धातूचे कभूधावि. इष्ट असलेले अन्य शब्द - अनिष्ट, अभीष्ट,
- उत्कृष्ट : उत्+कृष् या धातूचे कभूधावि. वर ओढला गेलेला. म्हणू्न स्थूलार्थाने सर्वोत्तम. उत् म्हणजे वर. त्यावरून उत्तर(अधिक वर) उत्तम(सर्वात वर)
- उद्दिष्ट : उद्+दिश् या धातूचे कभूधावि. ’उद्दिष्ट्य’ हा शब्द मराठीत नाही.
- कोपिष्ट (रागीट).असेच शब्द क्रोधिष्ट, रागिष्ट, तापिष्ट वगैरे. हे शब्द कभूधावि नाहीत, आणि तमभावीसुद्धा नाहीत..
- गोष्ट: गोष्टी(अनेकवचन), गोष्टीरूप
- क्रुष्ट : क्रुष्ट हा शब्द मराठीत वापरला जात नाही.
- तुष्ट : तुष् (आनंद घेणे)चे कभूधावि. यावरून संतुष्ट
- दुष्ट : दुष् चे कभूधावि. यावरून तर्कदुष्ट.
- दृष्ट : दृश् चे कभूधावि. यावरून अदृष्ट, दृष्टिहीन, दृष्टी.
- द्रष्टा : दृश् धातूचे अनद्यतन भविष्यकाळाचे (म्हणजे आजचा दिवस सोडून उद्याच्या आणि पुढच्या काळासाठी वापरावयाचे) तृतीय पुरुषी एकवचनी रूप. (द्रष्टा द्रष्टारौ द्रष्टार:). किंवा द्रष्टृ चे प्रथमपुरुषी एकवचन.
- धृष्ट : धृष् (धजणे)चे कभूधावि.
- नतद्रष्ट
- नष्ट : नश् धातूचे कभूधावि.
- निकृष्ट
- पुष्ट : पुष् (पोसणे) या धातूचे कभूधावि. यावरून पुष्टी.
- भ्रष्ट : भ्रस्ज् या धातूचे कभूधावि. यावरून भ्रष्टाचरण, भ्रष्टाचारी, भष्टाचारमुक्त, भ्रष्टाचारमुक्ती वगैरे.
- रुष्ट : रुष् (रागावणे) या धातूचे कभूधावि.
- वेष्टित : विश् धातूचे कभूधावि. यावरून वेष्टण, परिवेष्टित वगैरे
- शिष्ट : शास् चे कभूधावि. यावरून अवशिष्ट, अशिष्ट, शिष्टमंडळ, शिष्टसंप्रदाय, शिष्टसंभावना, शिष्टसंमत, शिष्टाई, शिष्टाचार, शिष्टाशिष्टभेद, वगैरे.
- सृष्ट : सृज् धातूचे कभूधावि. यावरून सृष्टी, सृष्टिज्ञान, सृष्टिसौंदर्य, स्रष्टा(=ब्रह्मदेव)
- हृष्ट : हृष् (संतोष पावणे) या धातूचे कभूधावि. यावरून हृष्टपुष्ट.
कर्मणि भूतकालवाचक विशेषणे नसलेले परंतु ’ष्ट’ असलेले शब्द
- अंत्येष्टी
- अरिष्ट
- अष्ट : अष्टक, अष्टकोन, अष्टावक्र
- उष्टावणे
- उष्टे
- उष्ट्र (उंट)
- कष्ट
- काष्टा : कासोटाचे बोली रूप.
- कुष्ट (रोग)
- कोष्टी
- कोपिष्ट
- क्रोधिष्ट
- खाष्ट
- गोष्ट
- चविष्ट
- चेष्टा
- झरथ्रुष्ट
- छांदिष्ट (संस्कृतमध्ये छांदिष्ठ-वेद पढलेला; छंदांचे(वृत्तांचे ज्ञान असलेला), मराठीत छंद/नाद असलेला.
- त्वष्टा
- धष्टपुष्ट
- धारिष्ट(संस्कृत धार्ष्ट्यचे मराठीकरण)
- धृतराष्ट्र
- धृष्टकेतु
- धृष्टद्युम्न
- नादिष्ट
- नाष्टा
- धष्टपुष्ट
- पिष्ट. यावरून पिष्टमय
- भ्रमिष्ट
- महाराष्ट्र : महाराष्ट्रीय
- यष्टिचीत, यष्टिबाद
- यष्टिरक्षक
- यष्टी
- रागिष्ट
- राष्ट्र, राष्ट्रीय(संस्कतमध्ये आणि हिंदीत हा शब्द राष्ट्रिय असा लिहिला जातो.), अराष्ट्रीय, परराष्ट्र, मित्रराष्ट्र, शत्रुराष्ट्र
- विशिष्ट : विशेषपासून बनलेला शब्द. या शब्दाचा ’शिष्ट’ या शब्दाशी संबंध नाही.
- वेष्टि (लुंगी)
- वैशिष्ट्य : विशिष्टपासून बनलेले भाववाचक नाम.
- शिष्ट(मराठीत, स्ततःला ’खास’ समजणारा), अशिष्ट, शिष्टाचार
- षष्ट. यावरून षष्ट्याब्दी, षष्ट्याब्दीपूर्ती(ब्दी दीर्घ!)
- सुष्ट : संस्कृत अव्यय सुष्ठु पासून मराठीसाठी बनलेला शब्द. याचा दुष्ट या शब्दाशी व्याकरणिक संबंध नसावा.
- स्पष्ट : यावरून, अस्पष्ट, सुस्पष्ट वगैरे
- स्वादिष्ट : मुळात स्वादिष्ठ.
’स्त’ असलेले शब्द
- अस्त, अस्तर, अस्ताई, अस्तुरी,
- अस्त्र
- इस्त्री : इस्तरी
- उस्तवार
- कास्तकार
- किस्त, किस्तबंदी, किस्ती, वगैरे.
- ख्रिस्त, ख्रिस्ती
- गस्त, गस्ती, अगस्ती,
- चुस्त
- जस्त, जस्ती
- तस्त
- दस्त. दस्तावेज, दुरुस्त-स्ती,
- दोस्त, दोस्ती
- नस्त, नस्तर
- नेमस्त, नेस्तनाबूद
- पुस्तक, पुस्तकी, पुस्तके
- पेस्तनजी
- पोस्त
- प्रस्ताव
- फस्त
- बस्ता, बस्तर, बाडबिस्तरा
- मास्तर, मास्तरी, मास्तरकी, हेडमास्तर
- रस्ता, रास्त
- वस्तरा, वस्तू, वास्तू, वास्तुशास्त्र,
- वस्त्र, वस्त्रदालन, निर्वस्त्र, वस्त्रांकित, शुभ्रवस्त्रावृता
- वस्तू, वस्तुशः, वास्तव, वास्तविक, वास्तविकरीत्या
- शास्ती, शिस्त, बेशिस्त,
- शस्त्र : यावरून सशस्त्र, निःशस्त्र, शस्त्रास्त्र. शास्त्र, शास्त्री, शास्त्रीय, सशास्त्र, शास्त्रोक्त
- सुखवस्तू
- सुस्त : यावरून सुस्ती
- स्तबक
- स्तब्ध
- स्तर, प्रस्तर, प्रस्तरारोहण
- स्तवनीय
- स्तिमित
- स्त्री : यावरून स्त्रीवादी, स्त्रीशक्ती, स्त्रीसुलभ, स्त्रैण,
- स्तुती : यावरून स्तुतिपाठक, स्तुतिप्रिय, स्तुत्य
- स्तूप
- स्तोत्र
- स्वस्त
- स्वस्तिक
स्थ असलेले शब्द
- प्रस्थ, आस्थापना, प्रस्थापना, विस्थापित, स्थापना, स्थितिस्थापक
- स्थगित, स्थगिती
- स्थल, स्थलांतरित, मरुस्थल
- स्थान, स्थानिक, स्थानीय, प्रस्थान, संस्थान, संस्थानिक
- स्थायी, अस्थायी, स्थायिक, स्थायिभाव
- स्थाली
- स्थावर
- स्थित, व्यवस्थित, स्थिती, परिस्थिती, स्थितिस्थापक(त्व)
- स्थिर, स्थिरता, स्थिरस्थावर, स्थैर्य, अस्थिर
- स्थूल, स्थूलता, स्थूलपणा, स्थौल्य
इंग्रजीमधून आलेले ष्ट/स्त
- ऑगस्ट
- केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट
- चेस्ट
- पामिस्ट
- पेस्ट : टूथपेस्ट, पेस्टकंट्रोल
- पोष्ट/पोस्ट. हा शब्द पोस्त (पोस्टमनला दिलेली बक्षिसी) असाही वापरला जातो.
- फास्ट
- बूस्ट
- बेस्ट
- मस्ट
- मास्ट
- मास्टर
- मिस्टर
- मोस्ट
- रेस्ट : रेस्ट हाऊस
- स्टूल
- स्टेशन
- स्टोअर : स्टोअर्स
- स्टोरी : स्टोरीरायटर
श्ट, श्त वगैरे
अरबी, फार्सी, बंगाली, आणि युरोपातल्या भाषांतले शब्द मराठीत लिहिताना कधीकधी श्ट, किंवा श्त ही अक्षरे येतात. उदा०
- काश्तकार (=शेतकरी)
- गोश्त (=गोमांस)
- पश्तू (अफगाणिस्तानची भाषा)
- मिखाएल श्टिश (एक जर्मन टेनिसपटू)
(अपूर्ण)