Jump to content

"गीतरामायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Ravi Varma-Rama-breaking-bow.jpg|160px|right|राम धनुष्य तोडताना]]
[[चित्र:Ravi Varma-Rama-breaking-bow.jpg|160px|right|राम धनुष्य तोडताना]]
'''गीतरामायण''' हे एप्रिल,इ.स.१९५५ ते एप्रिल,इ.स.१९५६ या कालावधीत [[गजानन दिगंबर माडगूळकर]] यांनी [[रामायण|वाल्मिकी रामायणाचा]] आधार घेऊन रचलेले, [[सुधीर फडके]] यांनी संगीत दिलेले,आकाशवाणी,पुणे वरून प्रसारीत झालेले मराठी सुश्राव्य भावगीतकाव्य आहे.विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या 'गीतरामायणा'स भरीव लोकप्रतिसाद मिळाला.<ref name="मनसा नारायण">[http://www.navprabha.com/navprabha/node/8291 अजरामर गीतरामायण गदिमा, बाबूजी आणि सीताकांत लाड-ले.- मनसा नारायण हा लेख, नवप्रभा डॉट कॉम ह्या संकेतस्थळावर] दिनांक २९/६/२०१३ रोजी सकाळी ११.३० वाजता जसे अभ्यासला</ref>
'''गीतरामायण''' हे एप्रिल,इ.स.१९५५ ते एप्रिल,इ.स.१९५६ या कालावधीत [[गजानन दिगंबर माडगूळकर]] यांनी [[रामायण|वाल्मिकी रामायणाचा]] आधार घेऊन रचलेले, [[सुधीर फडके]] यांनी संगीत दिलेले, आणि आकाशवाणीच्या पुणे केद्रावरून प्रसारित झालेले मराठी सुश्राव्य भावगीतकाव्य आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या 'गीतरामायणा'स भरीव लोकप्रतिसाद मिळाला.<ref name="मनसा नारायण">[http://www.navprabha.com/navprabha/node/8291 अजरामर गीतरामायण गदिमा, बाबूजी आणि सीताकांत लाड-लेखक- मनसा नारायण हा लेख, नवप्रभा डॉट कॉम ह्या संकेतस्थळावर] दिनांक २९/६/२०१३ रोजी सकाळी ११.३० वाजता जसा अभ्यासला</ref>

==गीतरचना आणि संकल्पनेचा जन्म ==
==गीतरचना आणि संकल्पनेचा जन्म ==
सीताकांत लाड इ.स.१९५४ च्या काळात पुणे आकाशवाणी केंद्रावर स्टेशन डायरेक्टर होते. त्यांना समाजप्रबोधन असलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित करायचा होता. त्यांचे अगदी जवळचे मित्र गदिमा यांना लाडांनी आपली कल्पना सुचवली. गदिमांनाही कल्पना भावली आणि वाल्मिकींच्या ‘रामायणा’वरून गीतरामायणाची निर्मिती झाली.
सीताकांत लाड इ.स.१९५४ च्या काळात पुणे आकाशवाणी केंद्रावर स्टेशन डायरेक्टर होते. त्यांना समाजप्रबोधन असलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित करायचा होता. त्यांचे अगदी जवळचे मित्र गदिमा यांना लाडांनी आपली कल्पना सुचवली. गदिमांनाही कल्पना भावली आणि वाल्मिकींच्या ‘रामायणा’वरून गीतरामायणाची निर्मिती झाली.
<ref name="मनसा नारायण" /> आनंद माडगूळकर यांच्या म्हणण्यानुसार १९३६ साली रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर यांच्या घरी मोरोपंतांचा 'एकशे आठ रामायणं' ह्या ग्रंथाचे वाचन केले तेव्हा पासून रामायणावर काही लेखन व्हावे अशी गदिमांची मनीषा होती.<ref>[http://anandmadgulkar.com/mazeshabda/geetramayan3.asp आनंद माडगूळकर डॉट कॉम या संकेतस्थळावर] माझे शब्द >> गीतरामायणाचे रामायण >> भाग ३ हा लेख, दिनांक २९जून २०१३ भाप्रवे दुपारी १३ वाजून १० मिनीटांनी जसा दिसला </ref>
<ref name="मनसा नारायण" /> आनंद माडगूळकर यांच्या म्हणण्यानुसार १९३६ साली रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर यांच्या घरी मोरोपंतांच्या 'एकशे आठ रामायणं' ह्या ग्रंथाचे वाचन केले तेव्हा पासून रामायणावर काही लेखन व्हावे अशी गदिमांची मनीषा होती.<ref>[http://anandmadgulkar.com/mazeshabda/geetramayan3.asp आनंद माडगूळकर डॉट कॉम या संकेतस्थळावर] माझे शब्द >> गीतरामायणाचे रामायण >> भाग ३ हा लेख, दिनांक २९जून २०१३ भाप्रवे दुपारी १३ वाजून १० मिनिटांनी जसा दिसला </ref>


गीत रामायणातील गीतांची रचना ...... छंद.... वृत्तात केली गेली. ..... अलंकारांचा समावेश गीतातून आढळून येतो.अमित करमरकरांच्या मतानुसार गीत रामायण ही एक शृंखला आहे. बऱ्याच गीतांचा शेवट पुढील प्रसंगासाठी किंवा गाण्यासाठी जोडलेला आहे. उदाहरणार्थ अकारण जीवन हे वाटले - उदास का तू आवर वेडे नयनातील पाणी ; इप्सित ते तो देईल अग्नी अनंत हातांनी - दशरथा घे हे पायसदान. <ref name="अमित करमरकर">[http://maharashtratimes.indiatimes.com/edit/spiritual/--/articleshow/19627153.cms? गीत रामायण: गम्य आणि रम्य -लेखक:अमित करमरकर;मटाApr 19, 2013, 01.02AM IST महाराष्ट्र टाईम्स संकेतस्थळावरील] लेखक:अमित करमरकरयांचे गीतरामायणावरील रसग्रहण जसे दिनांक २९जून २०१३ भाप्रवे दुपारी १३ वाजून १० मिनीटांनी जसे अभ्यासले</ref> . गीतरामायणात मादकते सहीत कवी गदी माडगूळकर मानवी प्रवृत्तींच आणि भावनांच दर्शन; बालगीत , आज्ञा , मागणी , आर्जव , हट्ट , स्त्री-हट्ट , दुराग्रह , हाव , संताप , समर्पण , काळजी , संशय , सूड , कर्तव्यभाव , मैत्रभाव , कानउघाडणी , विजयोत्सव आणि भक्तिभाव अशा विवीधांगी रसांनी परिपूर्ण स्वरूपात घडवतात.<ref name="अमित करमरकर"/>
गीत रामायणातील गीतांची रचना ...... छंदवृत्तात केली गेली. ..... गीतांत अनेक शब्दालंकार आणि अर्थालंकार सुयोग्य वापर असल्याने गीतरामायण हे एक सुश्राव्य काव्य झाले आहे.व झाले. गीत रामायण ही एक गीतांची शृंखला आहे. बऱ्याच गीतांचा शेवट पुढील प्रसंगासाला किंवा गाण्याला जोडलेला आहे. उदाहरणार्थ अकारण जीवन हे वाटले - उदास का तू आवर वेडे नयनातील पाणी ; इप्सित ते तो देईल अग्नी अनंत हातांनी - दशरथा घे हे पायसदान. <ref name="अमित करमरकर">[http://maharashtratimes.indiatimes.com/edit/spiritual/--/articleshow/19627153.cms? गीत रामायण: गम्य आणि रम्य -लेखक:अमित करमरकर;मटाApr 19, 2013, 01.02AM IST महाराष्ट्र टाइम्स संकेतस्थळावरील] लेखक:अमित करमरकरयांचे गीतरामायणावरील रसग्रहण जसे दिनांक २९जून २०१३ भाप्रवे दुपारी १३ वाजून १० मिनिटांनी जसे अभ्यासले</ref> . गीतरामायणात मादकतेसहित अन्य सर्व मानवी प्रवृत्तींचे आणि भावनांचे दर्शन होते. गीतरामायणात बालगीत आहे, आणि आज्ञा, मागणी, आर्जव, हट्ट, स्त्री-हट्ट, दुराग्रह, हाव, संताप, समर्पण, काळजी, संशय, सूड, कर्तव्यभाव, मित्रभाव, कानउघाडणी, विजयोत्सव आहे, आणि भक्तिभावही आहे. ग.दि. माडगूळकरांनी विविधांगी रसांनी परिपूर्ण अशा स्वरूपात गीतरामायण घडविले आहे.<ref name="अमित करमरकर"/>


'निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली','भावास्तव मी वधिले भावा','तुझ्या कृपेची शिल्प सत्कृति माझी मज ये पुन्हा आकृती' या पदात शाब्दिक समृद्धी; 'हीरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो','मोत्यांचा चूर नभी भरून राहिला' अशा शब्दरचनातून कल्पनारम्यता;'फुलापरी ते ओठ उमलती','ये अश्रूंचा पट डोळ्यावर' अशा रचनातून चित्रमयता, तर "तव अधराची लालस कांती पिऊ वाटते मज एकांती" (कोण तू कुठला राजकुमार) या कडव्यातून सौम्य शृंगाररसाचे दर्शन कवी करवतो, असे अमित करमरकर म्हणतात <ref name="अमित करमरकर"/> (अपूर्ण)
'निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली','भावास्तव मी वधिले भावा','तुझ्या कृपेची शिल्प सत्कृति माझी मज ये पुन्हा आकृती' या पदात शाब्दिक समृद्धी; 'हीरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो','मोत्यांचा चूर नभी भरून राहिला' अशा शब्दरचनातून कल्पनारम्यता;'फुलापरी ते ओठ उमलती','ये अश्रूंचा पट डोळ्यावर' अशा रचनातून चित्रमयता, तर "तव अधराची लालस कांती पिऊ वाटते मज एकांती" (कोण तू कुठला राजकुमार) या कडव्यातून सौम्य शृंगाररसाचे दर्शन कवी करवतो, असे अमित करमरकर म्हणतात <ref name="अमित करमरकर"/> (अपूर्ण)

१९:४७, २९ जून २०१३ ची आवृत्ती

राम धनुष्य तोडताना
राम धनुष्य तोडताना

गीतरामायण हे एप्रिल,इ.स.१९५५ ते एप्रिल,इ.स.१९५६ या कालावधीत गजानन दिगंबर माडगूळकर यांनी वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन रचलेले, सुधीर फडके यांनी संगीत दिलेले, आणि आकाशवाणीच्या पुणे केद्रावरून प्रसारित झालेले मराठी सुश्राव्य भावगीतकाव्य आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या 'गीतरामायणा'स भरीव लोकप्रतिसाद मिळाला.[]

गीतरचना आणि संकल्पनेचा जन्म

सीताकांत लाड इ.स.१९५४ च्या काळात पुणे आकाशवाणी केंद्रावर स्टेशन डायरेक्टर होते. त्यांना समाजप्रबोधन असलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित करायचा होता. त्यांचे अगदी जवळचे मित्र गदिमा यांना लाडांनी आपली कल्पना सुचवली. गदिमांनाही कल्पना भावली आणि वाल्मिकींच्या ‘रामायणा’वरून गीतरामायणाची निर्मिती झाली. [] आनंद माडगूळकर यांच्या म्हणण्यानुसार १९३६ साली रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर यांच्या घरी मोरोपंतांच्या 'एकशे आठ रामायणं' ह्या ग्रंथाचे वाचन केले तेव्हा पासून रामायणावर काही लेखन व्हावे अशी गदिमांची मनीषा होती.[]

गीत रामायणातील गीतांची रचना ...... छंदवृत्तात केली गेली. ..... गीतांत अनेक शब्दालंकार आणि अर्थालंकार सुयोग्य वापर असल्याने गीतरामायण हे एक सुश्राव्य काव्य झाले आहे.व झाले. गीत रामायण ही एक गीतांची शृंखला आहे. बऱ्याच गीतांचा शेवट पुढील प्रसंगासाला किंवा गाण्याला जोडलेला आहे. उदाहरणार्थ अकारण जीवन हे वाटले - उदास का तू आवर वेडे नयनातील पाणी ; इप्सित ते तो देईल अग्नी अनंत हातांनी - दशरथा घे हे पायसदान. [] . गीतरामायणात मादकतेसहित अन्य सर्व मानवी प्रवृत्तींचे आणि भावनांचे दर्शन होते. गीतरामायणात बालगीत आहे, आणि आज्ञा, मागणी, आर्जव, हट्ट, स्त्री-हट्ट, दुराग्रह, हाव, संताप, समर्पण, काळजी, संशय, सूड, कर्तव्यभाव, मित्रभाव, कानउघाडणी, विजयोत्सव आहे, आणि भक्तिभावही आहे. ग.दि. माडगूळकरांनी विविधांगी रसांनी परिपूर्ण अशा स्वरूपात गीतरामायण घडविले आहे.[]

'निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली','भावास्तव मी वधिले भावा','तुझ्या कृपेची शिल्प सत्कृति माझी मज ये पुन्हा आकृती' या पदात शाब्दिक समृद्धी; 'हीरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो','मोत्यांचा चूर नभी भरून राहिला' अशा शब्दरचनातून कल्पनारम्यता;'फुलापरी ते ओठ उमलती','ये अश्रूंचा पट डोळ्यावर' अशा रचनातून चित्रमयता, तर "तव अधराची लालस कांती पिऊ वाटते मज एकांती" (कोण तू कुठला राजकुमार) या कडव्यातून सौम्य शृंगाररसाचे दर्शन कवी करवतो, असे अमित करमरकर म्हणतात [] (अपूर्ण)

संगीत

सुधीर फडके (उर्फ, बाबुजी) यांनी भारतीय रागांवर आधारीत संगीत देऊन स्वतः गीतरामायणाचे 'प्रथम गायन' केले.प्रभाकर जोग यांच्या वाद्यवृंदाने साथ दिली.[]मनसा नारायण यांच्या मतानुसार, मनाला भावविभोर करणारे संगीत व हृदयामध्ये भक्तीचा ओलावा करणारे शब्दसामर्थ्य, जनमानसाला गीतरामायणाने जणू नादावून सोडले होते.एकप्रकारे संस्कार करणार्‍या गीतरामायणाने तो काळ जिंकला होता.[]

आधारभूत रागांची संख्या आहे ३६. त्यातल्या मिश्रकाफी चार, मिश्र जोगिया चार, भैरवी चार. भीमपलास, मिश्रमोड, मिश्र पिलू, पुरिया धनाश्री, शंकरा, केदार व मारु बिहाग यातल्या प्रत्येकी दोन. अशा २६ रचना सोडल्या तर उर्वरित ३० स्वररचना या २६ रागांत एकेक व दोन लोकगीतांवर आधारित आणि दोन स्वतंत्रपणे निर्मित.

२६ राग असे आहेत - भूप, मिश्र देसकार, देस, बिभास, बिहाग, मिश्र भैरव, मिश्र बहार, मधुवंती, तोडी, मिश्र खमाज, जोगकंस, अडाणा, यमन कल्याण, मिश्र हिंडोल, शुद्ध सारंग, ब्रिंदावनी सारंग, मुलतानी, तिलंग, मालकंस, सारंग, हिंडोल, मिश्र आसावरी, यमनी बिलावल, शुद्ध कल्याण व मिश्र पहाडी. []


अमित करमरकर यांच्या मतानुसार,सुधीर फडक्यांना या गीतांच्या संवर्धनासाठी पुढे अनेक वर्षे मिळाली आहेत. त्यामुळे पुणे आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मूळ गाण्यांपेक्षा फडक्यांच्या आवाजातील ध्वनिमुद्रित झालेली (१९६५ आणि १९७९) गीते कितीतरी सरस आहेत. निव्वळ संगीतिक मुल्यांचा विचार करता गीत रामायणातील स्वररचना अत्युच्च दर्जाच्या नाहीत. परंतु त्या काळजाला अशाप्रकारे भिडतात की त्या-त्या प्रसंगासाठी , तो-तो भावार्थ व्यक्त करण्यासाठी त्या केवळ आदर्शच वाटतात.जर ही पदं लिहिताना गदिमा "माध्यम" झाले असतील तर ह्या पदांचे सादरीकरण करताना सुधीर फडके त्या-त्या व्यक्तिरेखा जगले आहेत. सुधीर फडके यांनी ती पदे , ते विचार , ते प्रसंग फक्त रसिकांपर्यंत पोचवले आहेत. मला गाण्यातील किती येतं , किती कळतं हे घुसडण्याचा अट्टाहास केलेला नाही. 'गदिमांचे ' पायसदान ' फडक्यांनी अगस्ती ऋषींच्या बाणात रुपांतरित केले आहे. त्यात सेवाभाव आहे , स्वत्वला दिलेली तिलांजली आहे.' []

आपल्या रसग्रहण लेखात अमित करमरकर पुढे म्हणतात, गीतरामायणातील रचना अगदी साध्या आहेत असा नाही. ' शुद्ध सारंग ' मधील ' धन्य मी शबरी श्रीरामा ' गाउन बघा. या कडव्यामधील स्वरलगाव आणि कणस्वर फक्त बाबुजीच घेऊ जाणोत . तसेच ' चला राघवा चला '. गदिमांनी त्यात ' ज्या शब्दांनी एका वाक्याची अखेर करायची त्याच शब्दांनी दुसऱ्या वाक्याची सुरुवात ' असा प्रयोग केला आहे. पण ते कानांना खटकत नाही. कारण ते ओढून-ताणून केलेले नाही. सहज स्फुरले आहे. []

गीतरामायणातील गीते डॉ. वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, सुरेश हळदणकर, राम फाटक, लता मंगेशकर गायिली आहेत. त्याशिवाय ललिता फडके, मंदाकिनी पांडे, प्रमोदिनी देसाई, बबन नावडीकर, जानकी अय्यर, सुमन माटे, कालिंदी केसकर इत्यादींनीही गीतरामायणातील गीते गायिली आहेत.

[]

आकाशवाणी प्रसारण

आकाशवाणी,पुणेच्या तत्कालीन स्टेशन डायरेक्टर सीताकांत लाड यांच्या पुढाकाराने या कार्यक्रम शृंखलेचे संयोजन झाले.[] १ एप्रिल १९५५ या वर्षी गीतरामायणातील पहिले गीत ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ आकाशवाणी,पुणे ने प्रसारित केले.गीतरामायणात एकुण ५६ गीते आहेत.गीत रामायणातील गीतांचे प्रसारण १९५५ सालच्या रामनवमीला सुरू होऊन १९५६ सालच्या रामनवमीपर्यंत, म्हणजे १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ या कालावधीत आकाशवाणी,पुणे वरून झाले.[]

प्रयोग

बाबूजींनी स्वतः त्यांच्या आयुष्यात गीतरामायणाचे जवळजवळ १८०० प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी देशात तसेच परदेशात केले.[]

गीतरामायणातील गीते

  • १. कुश लव रामायण गाती
  • २. सरयू-तीरावरी
  • ३. उगा का काळीज माझे उले
  • ४. उदास का तू?
  • ५. दशरथा, घे हे पायसदान
  • ६. राम जन्मला ग सखे
  • ७. सावळा ग रामचंद्र
  • ८. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा
  • ९. मार ही त्राटिका रामचंद्रा
  • १०. चला राघवा चला
  • ११. आज मी शापमुक्त जाहले
  • १२. स्वयंवर झाले सीतेचे
  • १३. व्हायचे राम अयोध्यापती
  • १४. मोडु नको वचनास
  • १५. नको रे जाऊ रामराया
  • १६. रामावीण राज्य पदी कोण बैसतो
  • १७. जेथे राघव तेथे सीता
  • १८. थांब सुमंता, थांबवि रे रथ
  • १९. जय गंगे, जय भागिरथी
  • २०. या इथे लक्ष्मणा बांध कुटी
  • २१. बोलले इतुके मज श्रीराम
  • २२. दाटला चोहीकडे अंधार
  • २३. माता न तू वैरिणी
  • २४. चापबाण घ्या करी
  • २५. दैवजात दु:खे भरता
  • २६. तात गेले, माय गेली, भरत आता पोरका
  • २७. कोण तूं कुठला राजकुमार?
  • २८. सूड घे त्याचा लंकापती
  • ३०. याचका थांबू नको दारात
  • ३१. कोठे सीता जनकनंदिनी
  • ३२. ही तिच्या वेणींतील फुले
  • ३३. पळविली रावणें सीता
  • ३४. धन्य मी शबरी श्रीराम!
  • ३५. सन्मीत्र राघवाचा सुग्रीव आज झाला
  • ३६. वालीवध ना, खलनिर्दालन
  • ३७. असा हा एकच श्री हनुमान
  • ३८. हीच ती रामांची स्वामीनी
  • ३९. नको करुंस वल्गना
  • ४०. मज सांग अवस्था दूता, रघुनाथांची
  • ४१. पेटवी लंका हनुमंत
  • ४२. सेतू बांधा रे सागरी
  • ४३. रघुवरा बोलता का नाही?
  • ४४. सुग्रीवा हे साहस असले
  • ४५. रावणास सांग अंगदा
  • ४६. नभा भेदूनी नाद चालले
  • ४७. लंकेवर काळ कठीण आज पातला
  • ४८. आज का निष्फळ होती बाण
  • ४९. भूवरी रावण वध झाला
  • ५०. किती यत्नें मी पुन्हां पाहिली
  • ५१. लोकसाक्ष शुद्धी झाली
  • ५२. त्रिवार जयजयकार रामा
  • ५३. प्रभो, मज एकच वर द्यावा
  • ५४. डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
  • ५५. मज सांग लक्ष्मणा, जाऊ कुठे?
  • ५६. गा बाळांनो, श्री रामायण

मराठी साहित्यातून आणि ग्रंथातून घेतलेली दखल

गीतरामायणाच्य्या पहिल्या पुस्तिकेचे प्रकाशन आकाशवाणी पुणे ने केले.[ संदर्भ हवा ] विद्याताई माडगुडकर (गदिमांच्या पत्नी) यांनी त्यांच्या ‘आकाशाशी जडले नाते’ या आत्मचरित्रात विद्याताईंनी गीत रामायण घडतानाच्या काही आठवणींची दखल घेतली आहे.[] गीत रामायणाची निर्मिती चा वेध 'गीत रामायणाचे रामायण' नावाचा ग्रंथ घेतो.त्याचे लेखन आनंद माडगूळकर यांनी केले.[] .अजरामर 'गीत रामायण शब्द-स्वर-स्मृती मधुकोष' हा ग्रंथ अरूण गोडबोले यांनी लिहीला आहे.[]

आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्य दृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली. त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्य सृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्वयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे. गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबर माडगूळकरांचे नाव देखील. -- कविवर्य बा. भ. बोरकर[ संदर्भ हवा ]

गीतरामायणाचे अनुवाद

गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी भाषा, गुजराथी, कन्नड, बंगाली, आसामी भाषा, तेलुगु, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. या सर्व भाषांतरांचे वैशिष्ठ्य म्हणजे भाषांतरकर्त्यांनी एका मात्रेचाही फरक केलेला नाही. ही सर्व भाषांतरे मूळ बाबूजींनी दिलेल्या चालीवरच गायली जातात.[]

संदर्भ

  1. ^ a b c d e f g h अजरामर गीतरामायण गदिमा, बाबूजी आणि सीताकांत लाड-लेखक- मनसा नारायण हा लेख, नवप्रभा डॉट कॉम ह्या संकेतस्थळावर दिनांक २९/६/२०१३ रोजी सकाळी ११.३० वाजता जसा अभ्यासला
  2. ^ आनंद माडगूळकर डॉट कॉम या संकेतस्थळावर माझे शब्द >> गीतरामायणाचे रामायण >> भाग ३ हा लेख, दिनांक २९जून २०१३ भाप्रवे दुपारी १३ वाजून १० मिनिटांनी जसा दिसला
  3. ^ a b c d e गीत रामायण: गम्य आणि रम्य -लेखक:अमित करमरकर;मटाApr 19, 2013, 01.02AM IST महाराष्ट्र टाइम्स संकेतस्थळावरील लेखक:अमित करमरकरयांचे गीतरामायणावरील रसग्रहण जसे दिनांक २९जून २०१३ भाप्रवे दुपारी १३ वाजून १० मिनिटांनी जसे अभ्यासले
  4. ^ a b c अजरामर 'गीत रामायण शब्द-स्वर-स्मृती मधुकोष लेखक:अरूण गोडबोले; बूकगंगा डॉटकॉम संकेतस्थळ मजकुर दिनांक २९/६/२०१३ रोजी भाप्रवे दुपारी १५ .४० वाजता जसा अभ्यासला
  5. ^ http://www.maayboli.com/node/8739 पिवळी पडलेली कात्रणे - गीतरामायण लेखक:गजानन | 20 June, 2009 - 13:01 मायबोली संकेतस्थळावरील लेख
  6. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13042293.cms?prtpage=1 गीतरामायण हे चिरंतन टिकणारे वाङ्मय-मटा प्रतिनिधी पुणे मटा संकेतस्थळ वृत्त] दिनांक २९/६/२०१३ रोजी भाप्रवे सकाळी ११.३० वाजता जसे अभ्यासले