Jump to content

"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ३०: ओळ ३०:
*[http://www.sahityasagarsangli.com/index.php?option=com_content&task=view&id=18&Itemid=30 ८१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सांगली]
*[http://www.sahityasagarsangli.com/index.php?option=com_content&task=view&id=18&Itemid=30 ८१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सांगली]
*[http://www.mahabaleshwarsahityasammelan.com/ ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,महाबळेश्वर]
*[http://www.mahabaleshwarsahityasammelan.com/ ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,महाबळेश्वर]
*[http://www.masapaonline.org/ मसाप]
*[http://www.mssindore.org/] महाराष्ट्र साहित्य सभा इंदूर


[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने| ]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने| ]]

२३:०७, २० सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

१८६५ साली न्या.रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतलेला दिसतो. त्यानुसार ४३१ गद्य आणि २३० पद्य पुस्तकांची निर्मिती झाल्याचे दिसते. ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या.रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश (फेब्रुवारी ७ १८७८) मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार मे ११ १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले.

इतिहास

दुसरे ग्रंथकार संमेलन १८८५ साली पुण्यातच भरले. या संमेलनाला पहिल्याच्या मानाने चांगली म्हणजे शे-सव्वाशे नामवंत ग्रंथकारांनी उपस्थिती लावली होती. मे २१ १८८५ रविवार, दुपारी ४ वाजता पुणे सार्वजनिक सभेच्या (दाणे आळी, बुधवार पेठ) जोशी हॉलमध्ये भरले होते. या नंतर जवळ जवळ वीस वर्षांनी तिसरे ग्रंथकार संमेलन १९०५ च्या मे महिन्यात सातारा येथे भरले. लो.टिळकांचे एक सहकारी साताऱ्यातले सुप्रसिद्ध वकील र.पां.ऊर्फ दादासाहेब करंदीकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. २३ मे च्या केसरीत या संमेलनाचा त्रोटक वृत्तान्त प्रसिद्ध झाला होता. साताऱ्याचा पाठोपाठ चौथे ग्रंथकार संमेलन पुणे येथे २७-२८ मे १९०६ शनिवार, रविवार यां दिवशी सदाशिव पेठेत नागनाथपाराजवळच्या मयेकर वाड्यात भरले होते. हे संमेलन आधीच्या संमेलनांपेक्षा जास्त यशस्वी व विधायक स्वरूपाचे झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी, ग्रंथकार आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर होते. त्या वेळची अनेक मान्यवर ग्रंथकार मंडळी संमेलनासाठी एकत्र आलेली होती. निबंध वाचन, भाषणे, ठराव यामुळे संमेलन दोन दिवस गाजले.[]

साहित्य संमेलनांचे अध्यक्ष

अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने ३६ साहित्य संमेलने घेतली असून महाबळेश्वर येथे होत असलेले साहित्य संमेलन, ते भरवत असलेले ३७ वे साहित्य संमेलन होय. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी कुसुमावती देशपांडे या एकच लेखिका अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर दुर्गा भागवत, शांता शेळके,विजया राजाध्यक्ष या तीन लेखिका अध्यक्ष झालेल्या आहेत. तसेच शंकरराव खरात आणि केशव मेश्राम हे दोन दलित लेखक आणि यू.म. पठाण हे मुसलमान लेखक अध्यक्ष झालेले आहेत.

राज्य मराठी विकास संस्थेचे निमंत्रित सदस्य

अ. भा. मराठी साहित्य महामंडळातर्फे भरणारे साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य परिषदेतर्फे भरणारे नाट्य संमेलन व मराठी विज्ञान परिषदेतर्फे भरणारे विज्ञान संमेलन या तिन्ही संमेलनाचे अध्यक्ष हे राज्य मराठी विकास संस्थेचे विशेष निमंत्रित सदस्य असतात

८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा तर्फे भरवले जाणारे ८४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात २५, २६, २७ डिसेंबर २०१० या तारखांना झाले. .दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि गडकरी रंगायतन या नियोजित ठिकाणी संमेलनाचे कार्यक्रम झाले. मराठी ग्रंथसंग्रहालय (ठाणे) ही या ८४ व्या साहित्य संमेलनाची यजमान संस्था होती व उत्तम कांबळे हे या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. []

हेसुद्धा पाहा

मराठी साहित्य संमेलने

संदर्भ

  1. ^ http://www.masapaonline.org/node/1
  2. ^ Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6076870.cms. It is a snapshot of the page as it appeared on 28 Aug 2010 23:49:10 GMT.

बाह्य दुवे

खालील ओळींत संदर्भाशिवाय असणारे दुवे येथून कालांतराने काढावेत.