"बाल साहित्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Mvkulkarni23 (चर्चा | योगदान) No edit summary |
|||
ओळ १८: | ओळ १८: | ||
* सीमंतिनी खेर : सुभाषितांच्या गोष्टी |
* सीमंतिनी खेर : सुभाषितांच्या गोष्टी |
||
* [[साने गुरुजी]] : गोड गोष्टी (बाग १ ते १०), श्यामची आई(आत्मचरित्रात्मक कादंबरी) |
* [[साने गुरुजी]] : गोड गोष्टी (बाग १ ते १०), श्यामची आई(आत्मचरित्रात्मक कादंबरी) |
||
* [[दत्ता टोळ]] : बागुलबुवा गेला, संस्कारकथा |
|||
⚫ | |||
* विजय देवधर : प्राण्यांचा डॉक्टर |
|||
⚫ | |||
* [[माधुरी पुरंदरे]] : काकूचे बाळ, चित्रवाचन, झाडं लावणारा माणूस, बाबांच्या मिशा, राधाचं घर, वाचू आनंदे |
* [[माधुरी पुरंदरे]] : काकूचे बाळ, चित्रवाचन, झाडं लावणारा माणूस, बाबांच्या मिशा, राधाचं घर, वाचू आनंदे |
||
* [[वसंत बापट]] : परीच्या राज्यात |
* [[वसंत बापट]] : परीच्या राज्यात |
||
* [[भा.रा.भागवत]] : खजिन्याचा शोध, पिझारोचे थैमान, फस्टर फेणे(संच), ब्रम्हदेशातील खजिना, भुताळी जहाज, रॉबिनहुड, हाजीबाबाच्या गोष्टी |
* [[भा.रा.भागवत]] : खजिन्याचा शोध, पिझारोचे थैमान, फस्टर फेणे(संच), ब्रम्हदेशातील खजिना, भुताळी जहाज, रॉबिनहुड, हाजीबाबाच्या गोष्टी |
||
* निर्मला माने : अस्वलाची शेपटी आणि गडबड गोष्टी, उंटाची मान आणि जंमत गोष्टी, खट्याळ खलाशी आणि गडबड गोष्टी, गाढवाचं गाणं आणि जंमत गोष्टी, घड्याळ्यातली कोकिळा आणि गडबड गोष्टी, जादूचं तळं आणि इतर गोष्टी, जादूचं बटण, जादूचं रबर, तल्लख मोती आणि जंमत गोष्टी, पिंटू पेलिकन आणि जंमत गोष्टी, लाल तोंडी चोर आणि जंमत गोष्टी, सिंहाचं उड्डाण आणि जंमत गोष्टी, सोनेरी चोच आणि जंमत गोष्टी, |
* निर्मला माने : अस्वलाची शेपटी आणि गडबड गोष्टी, उंटाची मान आणि जंमत गोष्टी, खट्याळ खलाशी आणि गडबड गोष्टी, गाढवाचं गाणं आणि जंमत गोष्टी, घड्याळ्यातली कोकिळा आणि गडबड गोष्टी, जादूचं तळं आणि इतर गोष्टी, जादूचं बटण, जादूचं रबर, तल्लख मोती आणि जंमत गोष्टी, पिंटू पेलिकन आणि जंमत गोष्टी, लाल तोंडी चोर आणि जंमत गोष्टी, सिंहाचं उड्डाण आणि जंमत गोष्टी, सोनेरी चोच आणि जंमत गोष्टी, |
||
* इंदुमती शिरवाडकर : उत्तम कथा |
|||
* [[शांता शेळके]] : मांजरांचा गाव |
* [[शांता शेळके]] : मांजरांचा गाव |
||
पहा : [[बाल नाट्य]] |
|||
[[वर्ग:साहित्य]] |
[[वर्ग:साहित्य]] |
||
[[en:Children's literature]] |
[[en:Children's literature]] |
२२:१७, १८ जून २०१२ ची आवृत्ती
बालसाहित्य म्हणजे मोठ्या माणसांनी लहान मुलांसाठी लिहिलेले वाङ्मय. या वाङ्मयात, राजा-राणी, राजकन्या, पऱ्या, देवदूत, बोलणारे प्राणी, जादुगार, राक्षस आणि सद्गुणी- दुर्गुणी माणसे असतात. असे वाङ्मय लिहिणारे जगात अनेक लेखक होऊन गेले. हॅन्स ख्रिश्चन ॲन्डरसन हा त्या लेखकांतला एक प्रख्यात लेखक. त्याने लिहिलेल्या परीकथांची जगातल्या सर्व भाषांत भाषांतरे झाली आहेत. लेविस कॅरोलचे ’ॲलिस इन् वंडरलॅन्ड, मार्क ट्वेनचे ’टॉम सॉयर’ आणि ’ॲडव्हेन्चर्स ऑफ हकरबरी फिन’, फिलिपा पिअर्सचे ’मिडनाईट गार्डन’, इ. यांशिवाय थोड्या मोठ्या मुलांसाठी हार्डी बॉइज, नॅन्सी ड्ऱ्यू, हॅरी पॉटर वगैरे पुस्तके जगप्रसिद्ध आहेत.
मराठीतही बालसाहित्य लिहिणारे अनेक लेखक आहेत. बालसाहित्यात अगदी छोट्या बाळांसाठी बडबडगीते, वाचता येणाऱ्या लहान मुलांसाठी कविता, नीतिकथा, साहसकथा, अन्य गमतीदार कथा, प्रवासवर्णने, आणि कधीकधी छोट्या कादंबऱ्या असतात.
बालसाहित्याला पहिले मुद्रित स्वरूप १८०६ साली मिळाले ते ‘बाळबोध मुक्तावली’च्या रूपाने. इसापनीती, पंचतंत्र, हितोपदेश अशी पुस्तके म्हणजे थेट उपदेश करणाऱ्या बोधकथा होत्या. बालसाहित्याची संकल्पना ही जागतिक स्तरावरची असली तरी भारतामध्ये आणि महारा]ष्ट्रात बालमानसशास्त्र आणि बालसाहित्य यांचा गांभीर्याने विचार सुरू होण्यास मादाम मॉन्टेसरी यांची १९४४ची पुणे भेट कारणीभूत आहे, असे म्हणतात.
बालसाहित्याचा प्रथम कालखंड हा छत्रे, दामले, ओक, आपटे यांचा मानला जातो. त्यानंतर साने गुरुजी, महादेवशास्त्री जोशी, ना. ह. आपटे, भा. रा भागवत, गंगाधर गाडगीळ, दत्ता टोळ, अमरेंद्र गाडगीळ, राजीव तांबे, शंकर सारडा यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. सत्तरच्या दशकामध्ये एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू संपुष्टात येऊ लागल्याने नव्या पिढीला आजी-आजोबांच्या गोष्टी दुष्प्राप्य होऊ लागल्या. काळाची नेमकी गरज म्हणून संस्कारक्षम बालसाहित्याला याच काळात सुगीचे दिवस आले. सत्तरच्या दशकानंतर बालसाहित्याची मागणी वाढून दुर्गा भागवत, पिरोज आनंदकर, सुधा करमरकर, शांता शेळके, लीला भागवत, सरिता पदकी यांची अनेक पुस्तके याच काळात पुढे आली. ऐंशीच्या दशकामध्ये शैलजा काळे या एकट्या लेखिकेची बालसाहित्याची शंभर पुस्तके प्रकाशित झाली होती. भा.रा.भागवतांचीही एकूण पुस्तके साधारणपणे तितकीच असावीत.
प्रसिद्ध मराठी बालसाहित्यकार आणि त्यांची पुस्तके
- प्र.के.अत्रे : कावळ्यांची शाळा
- वासुदेव गोविंद आपटे : बाल(महा)भारत, बाल विनोदमाला, मनी आणि मोत्या, मुलांचा विविध ज्ञानसंग्रह
- विंदा करंदीकर : अडमतडम, परी गं परी, राणीची बाग
- शैलजा काळे : आजीच्या गोष्टी, आजीची पत्रं, आनदी आनंद गडे, कथा चातुर्याच्या, कर्मयोगी, खण खण कुदळी, गऽ गऽ गऽऽ विंचू चावला, गणपती बाप्पा मोरया, छान माणसास छान भेट, छाया, टिंगू(भाग १ ते ६), टिंगूच्या कथा, ठोंब्या, पोलीस माझा दोस्त, माणसाची कमाल बिबटयाची धमाल, वाचवा !,
- गिरिजा कीर : इटुकल्या पिटुकल्या गोष्टी, कुमारांच्या साहसकथा, छान छान गोष्टी, प्रकाशाची दारे, फुलं फुलवणारा म्हातारा आणि इतर गोष्टी
- भा.द.खेर : श्रमाचे मोल आणि इतर संस्कार कथा, सत्याची कास कधी सोडू नये आणि इतर संस्कार कथा
- सीमंतिनी खेर : सुभाषितांच्या गोष्टी
- साने गुरुजी : गोड गोष्टी (बाग १ ते १०), श्यामची आई(आत्मचरित्रात्मक कादंबरी)
- दत्ता टोळ : बागुलबुवा गेला, संस्कारकथा
- विजय देवधर : प्राण्यांचा डॉक्टर
- मंगेश पाडगावकर : अफाटराव, आता खेळा नाचा, चांदोमामा, झुले बाई झुला, फुलपाखरू निळं निळं, वाढदिवसाची भेट, वेडं कोकरू
- माधुरी पुरंदरे : काकूचे बाळ, चित्रवाचन, झाडं लावणारा माणूस, बाबांच्या मिशा, राधाचं घर, वाचू आनंदे
- वसंत बापट : परीच्या राज्यात
- भा.रा.भागवत : खजिन्याचा शोध, पिझारोचे थैमान, फस्टर फेणे(संच), ब्रम्हदेशातील खजिना, भुताळी जहाज, रॉबिनहुड, हाजीबाबाच्या गोष्टी
- निर्मला माने : अस्वलाची शेपटी आणि गडबड गोष्टी, उंटाची मान आणि जंमत गोष्टी, खट्याळ खलाशी आणि गडबड गोष्टी, गाढवाचं गाणं आणि जंमत गोष्टी, घड्याळ्यातली कोकिळा आणि गडबड गोष्टी, जादूचं तळं आणि इतर गोष्टी, जादूचं बटण, जादूचं रबर, तल्लख मोती आणि जंमत गोष्टी, पिंटू पेलिकन आणि जंमत गोष्टी, लाल तोंडी चोर आणि जंमत गोष्टी, सिंहाचं उड्डाण आणि जंमत गोष्टी, सोनेरी चोच आणि जंमत गोष्टी,
- इंदुमती शिरवाडकर : उत्तम कथा
- शांता शेळके : मांजरांचा गाव
पहा : बाल नाट्य