"केशव रामराव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Mvkulkarni23 (चर्चा | योगदान) छोNo edit summary खूणपताका: विशेषणे टाळा |
No edit summary खूणपताका: विशेषणे टाळा |
||
ओळ २२: | ओळ २२: | ||
| वांशिकत्व = |
| वांशिकत्व = |
||
| नागरिकत्व = भारतीय |
| नागरिकत्व = भारतीय |
||
| शिक्षण = |
| शिक्षण = एम.ए.पीएच.डी |
||
| प्रशिक्षणसंस्था = |
| प्रशिक्षणसंस्था = नागपूर विद्यापीठ, |
||
| पेशा = |
| पेशा =प्राध्यापक |
||
| कारकीर्द_काळ = |
| कारकीर्द_काळ = |
||
| मालक = |
| मालक = |
||
| प्रसिद्ध_कामे = |
| प्रसिद्ध_कामे = संस्कृत अध्यापन आणि ग्रंथलेखन |
||
| मूळ_गाव = |
| मूळ_गाव = |
||
| पगार = |
| पगार = |
||
ओळ ३४: | ओळ ३४: | ||
| वजन = |
| वजन = |
||
| ख्याती = |
| ख्याती = |
||
| पदवी_हुद्दा =डॉक्टर, काव्यतीर्थ,साहित्याचार्य; विद्यापीठात शाखाप्रमुख |
|||
| पदवी_हुद्दा = |
|||
| कार्यकाळ = |
| कार्यकाळ = |
||
| पूर्ववर्ती = |
| पूर्ववर्ती = |
||
ओळ ४१: | ओळ ४१: | ||
| विरोधक = |
| विरोधक = |
||
| संचालकमंडळ = |
| संचालकमंडळ = |
||
| धर्म = |
| धर्म = हिंदू |
||
| जोडीदार = |
| जोडीदार = |
||
| अपत्ये = |
| अपत्ये =एक पुत्र, पाच मुली |
||
| वडील = |
| वडील = |
||
| आई = |
| आई = |
||
| नातेवाईक = |
| नातेवाईक = |
||
| पुरस्कार = |
| पुरस्कार = राष्ट्रपति पुरस्कार |
||
| स्वाक्षरी = |
| स्वाक्षरी = |
||
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय = |
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय = |
१३:४६, १७ जून २०१२ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
केशव रामराव जोशी | |
---|---|
जन्म |
७ मार्च इ. स. १९२८ छिंदवाडा जिल्हा |
मृत्यू |
१२ जून इ. स. २०१२ नागपूर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | एम.ए.पीएच.डी |
प्रशिक्षणसंस्था | नागपूर विद्यापीठ, |
पेशा | प्राध्यापक |
प्रसिद्ध कामे | संस्कृत अध्यापन आणि ग्रंथलेखन |
पदवी हुद्दा | डॉक्टर, काव्यतीर्थ,साहित्याचार्य; विद्यापीठात शाखाप्रमुख |
धर्म | हिंदू |
अपत्ये | एक पुत्र, पाच मुली |
पुरस्कार | राष्ट्रपति पुरस्कार |
डॉ.के.आर. जोशी यांचे संपूर्ण नाव केशव रामराव जोशी. हे संस्कृत मधले प्रकांड पंडित होते.
बालपण आणि शिक्षण
डॉ.के.रा.जोशी जन्म महाराष्ट्रातल्या विदर्भातील छिंदवाडा जिल्ह्यात ७ मार्च इ. स. १९२८ रोजी झाला. ते नागपूर विद्यापीठातून एम.ए.पीएच.डी. झाले. त्यानंतर साहित्याचार्य (जयपूर), काव्यतीर्थ (कोलकाता), साहित्योत्तमा (बडोदा), संपूर्ण दर्शन मध्यमा (वाराणसी) या पदव्याही त्यांनी संपादन केल्या.
कारकीर्द
त्यांचा प्राचीन , अर्वाचीन परंपराचा अभ्यास होता. गरिबीतून वर आलेल्या जोशी यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व स्वतःच घडवले होते. त्यांनी काशीला राहून शास्त्री पंडितांसमवेत परंपरागत अध्ययन केल्यानंतर तत्त्वज्ञान, व्याकरण आणि वेदाभ्यास यांत न अडकता शास्त्राभ्यास आणि ललित लेखनावरही आपले प्रभुत्व सिद्ध केले. त्यांनी हुंड्यासारख्या सामाजिक समस्यांचा ऊहापोहदेखील त्यांच्या संस्कृत साहित्यातून केला.
के.रा.जोशी नागपूरच्या संस्कृत भाषा प्रचारिणी सभेचे अनेक वर्ष उपाध्यक्ष होते. बिंझाणी कॉलेजात काही काळ प्राध्यापकी केल्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे प्रमुख म्हणून काम केले . विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यासमंडळाचे ते काही काळ अध्यक्ष होते . कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवरही ते सदस्य होते. तसेच ते नागपूरच्या संस्कृत भाषा प्रचारिणी सभेचे अनेक वर्ष उपाध्यक्ष होते. के.रा.जोशी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारा अनुदानित हिंदी भाषिक राज्यांमध्ये संस्कृत शिक्षणाच्या समस्या आणि स्वातंत्र्योत्तर काळात संस्कृत साहित्य या विषयावर अखिल भारतीय चर्चासत्र आयोजित केले होते. त्यांचा प्राचीन आणि अर्वाचीन परंपराचा अभ्यास होता.
संस्कृत प्रचारिणी सभेतर्फे प्रकाशित होत असलेल्या ’संस्कृत भवितव्यम्’ या मासिकाचे ते अनेक वर्ष संपादक होते.
त्यांनी ’शारीरिक भाष्यावरील विश्लेषण’, ’अभिनवम् शास्त्रत्रिदलम’ या पुस्तकांसह 'नीलकंठविजयम् व रहस्यमयी’ या नाटिकाही लिहिल्या. काँप्युयुटर ज्या लॉजिकवर चालतो त्या ' लॉजिक ' वर आधारित त्यांचे पुस्तक ' न्यायसिद्धान्त मुक्तावली ' खूपच गाजले . त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले.
दीर्घ आजारानंतर के.रा.जोशी यांचे नागपूर येथे १२ जून इ. स. २०१२ रोजी निधन झाले.
सन्मान आणि पुरस्कार
- भारताच्या राष्ट्रपतींनी, १५ ऑगस्ट इ. स. २००९ रोजी के.रा.जोशी यांचा अन्य पंडितांसमवेत सन्मान केला होता.
- अमेरिकेच्या बायोग्राफिकल इन्स्टिट्यूटने इ. स. २००५ साली 'मॅन ऑफ द इयर' हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान त्यांच्या निवासस्थानी जाऊन केला होता, यावरून त्यांच्या कार्याची मोठी दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली होती, हे ध्यानात येते.
- इ. स. १९८९मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारने संस्कृत पंडित पुरस्कार प्रदान केला.
- ज्ञान प्रबोधिनी पुणे, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, देवदेवेश्वर संस्थान, जयपूरची संस्कृत सेवा परिषद, शृंगेरी पीठ आदींचेही पुरस्कार त्यांना मिळाले.
डॉ.के.रा.जोशी यांची ग्रंथसंपदा
- गोष्टीरूप वेदान्त (इ.स.२००४)
- Nyaaya-siddhaant-muktavali (लेखक केशव रामराव जोशी आणि सदाशिव मोरेश्वर अयाचित)
- प्रा. बी.के.दलाई यांनी संपादित केलेल्या Studies in Indian Linguistics या ग्रंथातील एक प्रकरण
- Post-Independence Sanskrit Liturature हा ग्रंथ
- नीलकंठ दीक्षित व त्यांची काव्य संपदा (इ. स. १९७७)
- Problems of Sanskrit Education in Non Hindi States
- संस्कृतत्रिदलम (ललित लेख प्रवासवर्णने)
- अभिनव शास्त्रत्रिदलम् (शोध लेखसंग्रह)
- तीरे संस्कृताची गहने (इ. स. २००१)
- शारीरिक भाष्यातील विषयाचे विश्लेषणात्मक अध्ययन (इ. स. २००९)
- काव्यत्रिदलम्