विवेका बाबाजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विवेका बाबाजी
जन्म विवेका बाबाजी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

विवेका बाबाजी (मे २३, १९७३:मॉरिशसजून २५, २०१०:वांद्रे, मुंबई, महाराष्ट्र) ही मॉरिशसमध्ये जन्मलेली भारतीय वंशाची मॉडेलअभिनेत्री होती. चित्रपटात येण्यापूर्वी विवेका मिस मॉरिशस वर्ल्ड (१९९३) व मिस मॉरिशस युनिव्हर्स (इ.स. १९९४) ह्या दोन्ही स्पर्धांची मानकरी होती. तिचा जन्म मॉरिशसमध्ये झाला होता व ती तिच्या चार बहिणींपैकी सर्वात लहान बहिण होती.

विवेकेची आई महाराष्ट्रीय होती जिचा जन्म हैदराबादचा होता. १९९० च्या कामसूत्र काँडोम्सच्या जाहिरातीमुळे विवेका प्रकाशझोतात आली. २५ जून २०१० रोजी विवेकेने आपल्या वांद्रे मुंबई येथील राहत्या घरी पंख्याला गळा आवळून आत्महत्या केली.